Medieval India: मध्ययुगीन भारताचा इतिहास

*मध्ययुगीन भारत: भारत आणि जग 

• इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास असे तीन भाग पडतात.

• इतिहासाचे कालखंड मानवी प्रगतीचे विविध टप्पे आहेत.

• भारताच्या मध्ययुगाची सुरुवात ढोबळभारत आणि जगमानाने इसवी सनाच्या नवव्या शतकाच्या सुमारास होते.

• इसवी सनाच्या अठराव्या शतकाच्या अखेरीस मध्ययुग संपते.

• युरोपात मध्ययुगाचा काळ इसवी सनाचे पाचवे शतक ते अठरावे शतक असा आहे.

*राजकीय सत्तेचे बदलते स्वरूप :

• वर्धन व चालुक्य या प्राचीन व प्रबळ सत्तांचा ऱ्हास होऊन मध्ययुगाच्या सुरुवातीस गुर्जर प्रतिहार, परमार, राष्ट्रकूट, चोळ, पांड्य, होयसळ, यादव यासारख्या प्रादेशिक सत्तांचा उदय झाला.

• नंतरच्या काळात भारतात सुलतानशाही अस्तित्वात आली.

• सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुघल सत्तेची स्थापना होऊन त्यांचा प्रबळ एकछत्री अंमल प्रस्थापित झाला.

• युरोपात इसवी सनाच्या पाचव्या शतकापर्यंत रोमन साम्राज्याची सत्ता होती.

• इ. स. 476 मध्ये रोमन साम्राज्याचा ऱ्हास होऊन प्रादेशिक सत्तांचा उदय झाला.

• कॉन्स्टेंटिनोपल ही रोमन साम्राज्याची राजधानी होती.

• इसवी सनाच्या आठव्या शतकात पश्चिम आशियात अरबांचे साम्राज्य उदयास आले.

*सरंजामशाही:

• मध्ययुगाच्या सुरुवातीस मध्यवर्ती सत्तांचा ऱ्हास होऊन प्रादेशिक सत्तांचा उदय झाला.

• प्रादेशिक सत्तांना लष्करी व अन्य सेवा पुरवण्याचे कार्य सामंतांनी केले.

• पुढे राजाचे नाममात्र सार्वभौमत्व मान्य करून सामंत आपापल्या प्रदेशात स्वतंत्रपणे राहू लागले.

• यातून एक नवी व्यवस्था अस्तित्वात आली. तिला ‘सामंतशाही’ असे म्हणत.

• युरोपातील सामंत आपापल्या प्रदेशात तटबंदी असलेले वाडे बांधून राहत. या वाड्याला ‘गढी’ असे म्हणत.

• सामंतशाहीत शेतकरी ‘भूदास’ झाले. त्यांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नसे.

*युरोपात व्यापारी वर्गाचा उदय :

● मध्ययुगात युरोपचा व्यापार वाढून व्यापारविषयक विविध कामे करणारा व्यापारी वर्ग उदयास आला.

• त्यांचे अनेक देशाशी व संस्कृतींशी संबंध येऊ लागले.

*अरबांचा उदय:

• अरब हे पश्चिम आशियातील अरबांचे रहिवासी आहेत.

• प्राचीन काळात अरब टोळ्याटोळ्यांनी राहात.

• इसवी सनाच्या सातव्या शतकात अरबांच्या जीवनाला मूलगामी कलाटणी मिळाली.

• अरबांनी प्रेषित मुहम्मद यांनी उपदेश केल्याप्रमाणे इस्लामचा स्वीकार केला आहे.

• पैगंबरांच्या नेतृत्वाखाली अरब लोक एकत्र आले.

• पैगंबरांचे वारसदार म्हणजे खलिफा.

• खलिफांच्या काळात अरबांची सत्ता वृद्धिंगत झाली.

• कला, विज्ञान, साहित्य या क्षेत्रात मध्ययुगीन अरबांनी लक्षणीय कामगिरी केली.

• खगोलशास्त्र व गणितविषयक भारतीय कल्पना अरबांमुळे पाश्चात्त्य जगाला परिचित झाल्या.

• कार्डोवा व कैरो यांसारख्या विद्यापीठांची स्थापना झाली.

• ‘बगदाद’ हे त्यांचे राजधानीचे शहर जगातील एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र बनले.

• इ. स. 712 मध्ये मंहमद बिन कासिम या अरब सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली व तेथील दाहीर राजाचा पराभव केला.

• महंमद बिन कासिमच्या स्वारीमुळे भारत आणि अरब यांचा राजकीय संबंध प्रथमच आला.

Leave a comment