नोबेल शांतता पुरस्कार विजेते
आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समिती
International Committee of the Red Cross
स्थापना : 24 जून 1863
पुरस्कार वर्ष: 1917
ICRC ची स्थापना हेन्री दुनान्त यांनी 1863 साली केली होती. मानवतावादी दुनान्त यांना या कामासाठी 1901 साली शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता. सुरुवातीला दुनान्त यांच्यासह पाच सदस्यांची समिती होती. युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जखमी झालेल्या लोकांना मानवतावादी दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. पहिल्या महायुद्धाच्या काळात ICRC या संघटनेने अनेक देशांशी संपर्क साधून युद्धबंदीसाठी प्रयत्न केले.