नोबेल शांतता पुरस्कार विजेते
हेन्री ला फोन्टेन
Henri La Fontaine
जन्म : 22 एप्रिल 1854
मृत्यू : 14 मे 1943
राष्ट्रीयत्व : बेल्जियम
पुरस्कार वर्ष: 1913
हेन्री ला फोन्टेन हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवक्ते होते. 1907 ते 1943 पर्यंत सलग 36 वर्षे ते आंतरराष्ट्रीय शांतता संघटनेचे अध्यक्ष राहिले. त्यांनी विश्वशांतीसाठी ‘आंतरराष्ट्रीय केंद्र’ स्थापन केले होते. त्यांनी शांतता आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य प्रस्थापित करण्याच्या हेतूने एक पुस्तकही लिहिले. विश्व संसद आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील न्यायालयाची कल्पना मांडली. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक (1913) देण्यात आले.