साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
नादिन गार्डिमर
Nadine Gardimer
जन्म : 20 नोव्हेंबर 1923
मृत्यू : 13 जुलै 2014
राष्ट्रीयत्व : दक्षिण आफ्रिकन
पुरस्कार वर्ष : 1991
नेडीन गार्डीनर ह्या दक्षिण आफ्रिकेच्या कादंबरी लेखिका होत्या. त्यांनी गोऱ्या सरकारच्या वर्णद्वेषी धोरणाला विरोध केला. विशेष म्हणजे त्या गौरवर्णीय होत्या. त्यांच्या ‘अ वर्ल्ड ऑफ स्ट्रेंजर्स’, ‘द लेट बुर्जआ वर्ल्ड’, ‘द बर्गर्स डॉटर’ या कादंबऱ्या खूप गाजल्या. त्यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून सामाजिक प्रश्नाला वाचा फोडली. त्यांच्या या लिखाणाबद्दल त्यांना 1991 चा नोबेल पुरस्कार मिळाला.