नोबेल शांतता पुरस्कार विजेते
सर नॉर्मन एंजल (राल्फ लेन)
Sir Norman Angel
जन्म : 26 डिसेंबर 1872
मृत्यू : 7 ऑक्टोबर 1967
राष्ट्रीयत्व : ब्रिटिश
पुरस्कार वर्ष: 1933
सर नॉर्मन एंजल हे इंग्लंडचे सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ होते. त्याशिवाय जागतिक शांततेसाठी ते काम करत होते. त्यांनी लिहिलेल्या युद्धविरोधी पुस्तकामुळे ते अधिक प्रसिद्ध पावले. ‘द ग्रेट इल्यूजन’ (The Great Illusion) हे त्यांचे सुप्रसिद्ध पुस्तक त्यांनी 1910 साली लिहिले होते. हे पुस्तक अनेक भाषांत प्रकाशित झाले आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकाद्वारे युद्धविरोधी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना 1933 साली शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला.