नोबेल शांतता पुरस्कार विजेते
फ्रेड्रिक बजेर
Fredrik Bajer
जन्म : 21 एप्रिल 1837
मृत्यू : 22 जानेवारी 1922
राष्ट्रीयत्व : डेनिश
पुरस्कार वर्ष: 1908
फ्रेड्रिक बजेर हे एक कुशल राजनीतिज्ञ होते. त्यांनी आपले जीवन महिलांच्या कल्याणासाठी आणि जगात शांतता प्रस्थापित होण्यासाठी खर्च केले. फ्रेड्रिक बजेर आणि क्लास पोण्टस अरनॉल्डसन यांना 1908 चा शांततेचा नोबेल पुरस्कार विभागून दिला होता. फ्रेड्रिक बजेर यांनी स्कँडिनेव्हियन देशात परस्पर सहकार्य वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले होते. त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय शांतता ब्युरो’ची स्थापना केली. 1891 ते 1907 पर्यंत ते या संघटनेचे अध्यक्ष होते.