Importance of fasting and diet: उपवास म्हणजे काय? त्याचे आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी काय उपयोग आहे जाणून घ्या एका क्लिक मध्ये

उपवासाचे महत्व आणि आहार

भारतीय संस्कृतीत आहाराचे खूप महत्त्व आहे. कोणता आहार कधी घ्यावा? त्याचे फायदे तोटे काय? यावर विपुल प्रमाणात प्राचीन काळापासून ग्रंथ आढळतात. आहाराबरोबरच उपवासालाही भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व आहे. म्हणून आपण उपवास म्हणजे काय? त्याचे आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी काय उपयोग आहे, तेही आपण पाहणार आहोत.

उपवास म्हणजे काय

उपवास म्हणजे कोणताही पदार्थ सेवन न करता अनाशी पोटी राहणे होय. अनाशी पोटी म्हणजे पोटात अन्नाचा कणही न घेणे होय. हा उपवासाचा एक प्रकार झाला. या प्रकारात दिवसभर उपवास करताना लिंबू पाणी घेतात. जेणेकरून आपणाला थकवा येणार नाही किंवा डीहायड्रेशन होणार नाही. या प्रकारच्या उपवासामुळे शरीरातील आतड्यांना विश्रांती मिळते आणि ते पुन्हा जोमाने कार्य करण्यास प्रवृत्त होतात. म्हणून हा उपवास हा खूप महत्त्वाचा आहे.

उपवासाच्या दुसऱ्या प्रकारात आपण सवारी किंवा एकादशी दिवशी उपवास धरतो. त्यालाही उपवास म्हणतात. या उपवासाला अनेक पदार्थ खातात. काही जण हलका आहार घेतात, तर काही जण शाबू खिचडी सारखे जड पदार्थ घेतात.

या दुसऱ्या प्रकारच्या उपवासामुळे एकतर कमी फायदा होतो आणि जड पदार्थ घेतल्यामुळे आपल्या शरीरास काहीच फायदा होत नाही. उलट तोटाच होतो.

म्हणून ज्यांना उपवास धरायचा आहे त्यांनी पूर्णतः अनाशी पोटी राहावे, पण दिवसभर पूर्ण उपवाशी राहिल्यामुळे जर तुमचे पित्त वाढत असेल तर मात्र तुम्ही हलका आहार घेणे हिताचे आहे.

उपवासाचे महत्त्व

1 तुम्ही जर पहिल्या प्रकारातील उपवास करत असाल, म्हणजे दिवसभर पूर्ण उपवास धरत असाल आणि केवळ लिंबू पाणी पीत असाल तर तुम्हाला उपवासाचे खूप फायदे होतात. पोटाला पूर्ण विश्रांती मिळते. आतड्यांना पूर्ण विश्रांती मिळते. पोटाची, पचनक्रियेची आणि आतड्यांची कार्यक्षमता वाढते. पोटात अनावश्यक साचलेला गाळ, चरबी, अनावश्यक घटक कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जे लिंबू पाणी घेऊन उपवास करतात त्यांना या उपवासाचा अधिक फायदा होतो.

2 दुसऱ्या प्रकारातील उपवासामध्ये जर तुम्ही हलका आहार घेत असाल तर त्याचाही तुमच्या शरीराला आणि मानसिक स्वास्थ्य राखण्याला फायदा होतो. हलका आहार म्हणजे ताजी फळे, रताळे, ताक, गोड दही, ताकापासून बनवलेली आंबील, नाचणीची आंबील, वरईचा भात किंवा भाकरी, उकडलेला बटाटा इत्यादी पदार्थ कमी प्रमाणात सेवन केल्याने तोही एक चांगला उपवास ठरतो. अशा हलक्या पदार्थाच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. अपचन, अजीर्णता, पोटात गॅस होणे इत्यादी गोष्टी टाळता येतात. उपवासाचे हे पदार्थ आपणास आणि आपल्या शरीराच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी खूप उपयुक्त आहे. अशा प्रकारचा उपवास आठवड्यातून दोन वेळा केला तरी हरकत नाही.

एकादशी आणि दुप्पट खाशी

एकादशी आणि दुप्पट खाशी किंवा उपवास धरशी आणि दुप्पट खाशी, अशा काही म्हणी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्या म्हणी खूप प्रचलित आहेत आणि उपवासा दिवशी असेच काहीतरी संपूर्ण महाराष्ट्रात घडत आहे.

Leave a comment