नोबेल शांतता पुरस्कार विजेते
नानसेन आंतरराष्ट्रीय शरणार्थी कार्यालय
Nansen International Office for Refugees
स्थापना : 1921, स्वित्झर्लंड
पुरस्कार वर्ष : 1938
नानसेन कार्यालयाची स्थापना राष्ट्रसंघाने केली होती. पहिल्या महायुद्धानंतर निर्वासितांचे आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींची पुनर्स्थापना करण्याची जबाबदारी या संस्थेवर सोपविलेली होती. या निर्वासितांमध्ये रूस आणि आर्मिनिया येथील लोकांची संख्या जास्त होती. हे कार्यालय इतर देशांतील शरणार्थीच्या समस्यांकडेदेखील लक्ष पुरवत होते. या कार्यालयातर्फे दुसऱ्या महायुद्धानंतर निर्वासितांना मित्र राष्ट्रांमध्ये जाता यावे यासाठी ‘नानसेन पासपोर्ट’ उपलब्ध करून दिला.