Russia-US tensions: Possibility of World War III?-रशिया अमेरिका तणाव- तिसऱ्या महायुद्धाची शक्यता? 

सध्या रशिया आणि अमेरिका यांच्यात वाक्युद्ध चालू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर जहरी टीका केल्यामुळे ही टीका रशियाच्या जिव्हारी लागली. त्यामुळे रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी अमेरिकेला तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे. रशिया-अमेरिका यांच्या तणाव वाढला तर जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यातील असलेल्या युद्धाचा परिणाम-The consequences of the Russia-Ukraine war

गेली सात-आठ महिने रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. सध्या हे युद्ध अंतिम टप्प्यात आले असून युद्ध थांबण्याची शक्यता वाढली आहे. युक्रेनमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यानंतर अनेकांचा मृत्यू झाला.त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर नव्याने बंदी लागण्याचा विचार करीत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर रशियाच्या माजी अध्यक्षाने म्हणजे दिमित्री मेदवेदेव यांनी तिसऱ्या महायुद्धाचा इशारा थेट अमेरिकेला दिला आहे. दिमित्री म्हणतात की,तुम्ही आगीशी घेऊ नका. तिसरे महायुद्ध झाले तर ही गोष्ट सर्वांसाठी वाईटच असणार आहे. त्यामुळे अमेरिकेने आपल्या तोंडाला लगाम घालावा असेही त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेला न जुमानता झेलेन्सकी यांची बर्लिनमध्ये भेट -Zelensky meets in Berlin despite US objections

युक्रेन-रशिया युद्ध अंतिम टप्प्यात आले असले तरी युद्धात कधीही काहीही होऊ शकते. हे ओळखून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नुकतीच बर्लिनला भेट दिली आहे. रशियाबरोबर चालू असलेल्या युद्धात आपल्याला आणखी लष्करी मदत मिळावी या हेतूने नवीन जर्मन चान्सलर फेडरिक मर्झ यांची त्यांनी भेट घेतली आहे.अमेरिकेच्या नेतृत्वाखाली युद्ध समाप्त करण्याच्या प्रयत्नांना न जुमानता त्यांनी हे पाऊल उचलले आहे. एका अर्थाने अमेरिकेला हा एक मोठा शहच आहे.

आतापर्यंत अमेरिकेनंतर जर्मनीने युक्रेनला लष्करी मदत देण्यासाठी ठोस पावले उचललेली आहेत. युद्धबंदी करण्यासाठी व युक्रेनचा पाश्चात्त्य पाठिंबा आबादित ठेवण्यासाठी मर्झ हे सक्रियपणे प्रयत्न करीत आहेत. पुतीन यांनी शांतता चर्चेला खिळ घातल्याचा आरोप युरोपियन नेत्यांनी केला आहे. त्यामुळे युद्धबंदी होण्याची शक्यता मावळत चाललेली आहे.

आगीशी खेळत आहात: ट्रम्प- You are playing with fire: Trump

युद्ध संपावण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्याला वेग आलेला असला तरी पुतीन यांनी युद्धबंदीसाठी आवश्यक असणारी चर्चा थांबवल्याचा आरोप अमेरिकेचा आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी तुम्ही आगीशी खेळत आहात अशा प्रकारे रशियाला एक प्रकारची धमकीच दिली आहे. यावर पुतीन म्हणाले की समानता आणि अविभाज्यतेच्या तत्त्वांवर आधारित नवीन जागतिक सुरक्षा संरचना हवी आहे. सर्व देशांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेची ठोस हमी मिळाली पाहिजे असे पुतीन यांनी म्हटले आहे.

Leave a comment