IPL 2025: Virat Kohli is the king-विराट कोहलीच किंग 

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे आयोजित केलेल्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या संघाने दणदणीत विजय मिळवून एक नवा इतिहास घडवला. आय पी एल स्पर्धा सुरू होऊन 17 वर्षे पूर्ण झाली. या काळात एकूण 18 आयपीएल स्पर्धा झाल्या आणि अठराव्या आयपीएल स्पर्धेमध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील बंगळूरू संघाने नेत्रदीपक विजय मिळवला आणि श्रेयस अय्यरच्या पंजाबच्या संघाला पाणी पाजले.

श्रेयश अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या संघाने 2025 च्या आयपीएल स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश मिळवले होते . अंतिम सामन्यात पंजाबचा संघच खरा दावेदार होता. दमदार कामगिरीच्या जोरावर पंजाबचा सण विजेता ठरेल असे वाटत होते;पण बंगळुरू संघाने विराट कोहलीच्या अनुभवाचा फायदा घेत कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली शानदार विजय मिळवला आणि पंजाबला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

आयपीएलचा इतिहास-History of IPL

भारतात सुरू असलेला आयपीएल स्पर्धेचा 2025 ची ही 18 वी आयपीएल स्पर्धा होती. आत्तापर्यंत चेन्नई आणि मुंबई संघाने प्रत्येकी पाच वेळा विजय मिळवला आहे. कोलकत्ता संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे, तर राजस्थान, डेक्कन, हैदराबाद, गुजरात, बंगळुरू या संघानी प्रत्येकी एक वेळा विजय मिळवला आहे.

आयपीएल स्पर्धा जेव्हा भरवल्या गेल्या तेव्हा शरद पवार यांना दोष दिला जात होता. हे आणि काय नवीन फॅड? या स्पर्धेची काय आवश्यकता आहे? पण शरद पवार यांनी तिकडे दुर्लक्ष करून आयपीएल स्पर्धा भरवण्याचा निर्णय 17 वर्षांपूर्वी घेतला होता. या स्पर्धेमुळे अनेक नवीन नवीन खेळाडूंना संधी मिळाली. या सर्व स्पर्धांचे श्रेय शरद पवार यांनाच जाते.

Leave a comment