ख्यातनाम भारतीय लेखिका, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांनी लिहिलेल्या हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा 2025 चा बुकर पुरस्कार मिळाला आहे. भारतीय लेखिकेने अशा स्वरूपाचा मिळवलेला पुरस्कार दुर्मिळच आहे.
भारतीय लेखिका बानू मुश्ताक यांनी मुस्लिम महिलांच्या आणि मुलींच्या जीवनावरील कथा आपल्या पुस्तकात चित्रित केलेल्या आहेत. दक्षिण भारतातील महिलांच्या जीवनावर आधारित या बोलक्या कथा खूपच वास्तव आणि जिवंत आहेत. लेखिका बानू मुस्ताक यांनी हार्ट लॅम्प या पुस्तकात कन्नड भाषेत कथा लिहिलेल्या आहेत . या पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर दीपा भस्ती यांनी केलेले आहे.
बानू मुस्ताक यांना पन्नास हजार पाऊंडचे बक्षीस
कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांना पन्नास हजार पाऊंडसह बुकर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला बानू मुस्ताक यांनी 1990 पासून 2023 पर्यंत लिहिलेल्या बारा लघुकथांचा संग्रह हार्ट लॅम्प या पुस्तकात चित्रित केलेला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच वाचनात बुकर निर्णायक मंडळाने या पुस्तकाला पसंती दिली.
लेखिका बानू मुस्ताक यांनी या 12 लघुकथांमध्ये दक्षिण भारतातील महिलांचा लवचिकतेचा दृष्टिकोन, विरोध आणि हजरजबाबतीपणा यांचे वर्णन अगदी सुरेखपणे केलेले आहे. या कथांना मौखिक कथा सांगण्याच्या समृद्ध परंपरेच्या माध्यमातून जिवंत रूप दिले आहे. बानू मुस्ताक यांच्या या कथा आंतरराष्ट्रीय स्तरावर खूपच गाजतील अशी आशा आहे.