तुमच्या पैशांवर डोळा ठेवणारे हॅकर्स तुमचे बँक खाते रिकामे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या काढत असतात.
वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला कॉल्स करून तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमचे बँक खाते रिकामे करतात. म्हणून आपण सावध असायला हवे. आता कोरोना वॅक्सीनचाच कॉल बघा ना! तुम्ही कोरोना वॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे का? डोस घेतला असेल तर एक दाबा. दुसरा डोस घेतला असेल तर दोन दाबा. अशा प्रकारच्या सूचना दिला जातात आणि ह्या सूचनांचे आपण पालन केले की तुमच्या मोबाईलला ॲटॅच असणारे सर्व बँक अकाउंट खाते हॅकर्स हॅक करतो आणि तुमचे खाते पूर्ण रिकामे होते .तरी सावध रहा आणि अशा कॉल्स पासून दूर राहा.
