ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, उत्तर अमेरिका, भारत आणि अन्य अनेक देशात आढळणारा कीटक वर्गीय प्राणी म्हणजे Cicada शिकाडा होय. या शिकाडा किड्याची वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया.
Where does Cicada find? सिकाडा कोठे आढळतो?
सिकाडा हा किडा वर्गीय प्राणी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, उत्तर अमेरिका, भारत यासारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत असला तरी अन्य देशांमध्येही या कीटकाचे अस्तित्व आढळते. सिकाडा या कीटकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो नेहमी जंगलातच राहतो. दाट झाडी हे त्याचे वस्तीस्थान सिकाडाचा रंग हा झाडांच्या सालीशी मिळता जुळता असतो. त्यामुळे तो झाडावर असला तरी सहसा पटकन नजरेस दिसत नाही. प्राण्यांना आणि कीटकांना स्वसंरक्षणासाठी अशा प्रकारचे रंग प्राप्त झालेले असतात. हा एक छोटा कीटक असून साधारणतः गांधीलमाशीच्या आकारा एवढा असतो.
Sound of Cicada insect :सिकाडा कीटकाचा आवाज.
सिकाडा या कीटकाचा आवाज आणि रातकिडा या कीटकाचा आवाज सारखाच असतो. रातकिडा हा फक्त रात्री आवाज करतो, तर सिकाडा दिवसा आवाज काढतो. या दोन्ही कीटकांच्या आवाजात सूक्ष्म असा फरक आहे. सिकाडा हा कीटक माद्यांना आकर्षित करण्यासाठी किर्रर्रर्रर्र.,…..असा आवाज काढतो.
When does a cicada make a sound? सिकाडा हा कीटक केव्हा आवाज काढतो?
खरं तर सिकाडा हा कीटक उगाच केव्हाही किर्रर्रर्रर्र असा आवाज काढत नाही. त्याला काहीतरी कारण असते. ते कारण म्हणजे त्यांचा प्रजनन कालावधी होय. वसंत ऋतू संपला की उन्हाळ्यात सिकाडा हा कीटक आपल्या मादीला आकर्षित करण्यासाठी किर्रर्रर्रर्र असा आवाज काढतो. त्या आवाजाच्या दिशेने मादी सिकाडा आकर्षित होते आणि त्यांचे मिलन होते.
Special characteristic of Cicada insect: सिकाडा कीटकाचे खास वैशिष्ट्ये
सिकाडा कीटक हे दीर्घ काळ जगू शकतात. ते बऱ्याच वेळा जमिनीखाली गाडून घेतात. जमिनीखाली राहण्याचा त्यांचा कालावधी खूप आश्चर्यकारक आहे. हा कालावधी साधारणतः दोन ते वीस वर्षांपर्यंत असतो. प्रजननाच्या काळात काही ठराविक नरच जमिनीच्या वर येतात आणि पुढची पिढी चालवतात.