जगात सर्वत्र आढळणारा एकमेव किडा म्हणजे cricket क्रिकीट होय. क्रिकीट कीटकाला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी नावे आहेत. तरीपण महाराष्ट्रात हा कीटक रातकिडा या नावाने प्रसिद्ध आहे. या किड्याला ठुसकी असेही म्हणतात. या किड्याविषयी आपण अधिक माहिती घेऊ.
क्रिकीट हा कीटक कोठे राहतो?
क्रिकेट हा कीटक जगात सर्व देशांमध्ये आढळतो. या किड्याचे राहण्याचे ठिकाण म्हणजे छोटी झुडपे, जंगल, गवताळ परिसर, दलदलीची ठिकाणे इत्यादी होय. कधी कधी हा कीटक घरांमध्ये सुद्धा घुसतो आणि किर्रकिर्र करून सर्वांचे लक्ष वेधून घेतो.
क्रिकेट या कीटकाचा आवाज
क्रिकेट हा कीटक मुख्यतः रात्रीच ओरडतो किंवा आवाज काढतो. म्हणूनच या किड्याला रातकिडा असेही म्हणतात. हा रात किडा रात्रीच फक्त ओरडतो. तो कधीही दिवसा ओरडत नाही. म्हणूनच त्याचे नाव रात किडा असे पडले आहे. तो किर्र किर्र असा आवाज काढतो. त्याचा आवाज इतका कर्णकर्कश असतो की मूर्ती लहान पण आवाज महान असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या किड्याच्या आकाराच्या मानाने त्याचा आवाज खूप मोठा आहे. रात्रीच्या वेळी त्याचा आवाज एक ते दीड किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. विशेषता हे किडे प्रजनन काळात रात्रीच्या वेळी आवाज करतात. त्यांचा प्रजनन काळ हा साधारणतः उन्हाळ्यातच येतो. इतर वेळेस सुद्धा त्यांचा प्रजनन काळ असू शकतो.
क्रिकेटची वैशिष्ट्ये
क्रिकेट या किड्याचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे हा किडा जगात सर्वत्र जंगलात किंवा गवताळ प्रदेशात आढळतो. हा किडा खूप लहान असून त्याचा आवाज खूप मोठा असतो. या किड्याचा आकार दंडगोलाकार असतो. त्याचे डोके गोलाकार अजून अँटेना लांब असतात. साधारणतः काळपट, तपकिरी रंगाचे हे किडे असतात. रात्र झाली याची चाहूल हेच किडे देतात.