कॅनडा आणि युरोपियन देशात पसरलेला नशेली पदार्थाचा हा विळखा हळूहळू संपूर्ण जगभर पसरत चालला आहे. यातून भारताचीही सुटका झालेली नाही. अलीकडच्या काळात भारतात ही मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची आयात होत आहे. भारतीय तरुण मोठ्या प्रमाणात नशेले बनत आहेत आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण पिढीला भोगावे लागणार आहे. भारतीय तरुणांना नशेत बुडवण्याचे हे कारस्थान तर नाही ना ? अशी शंका येऊ लागली आहे.
कॅनडा अमली पदार्थांचा देश :Canada is a drug country
जगामध्ये सर्वात प्रथम कॅनडा या देशाला अमली पदार्थाच्या विळख्याने व्यापले आहे त्यानंतर हे लोन आणि युरोपीय देशांमध्ये पसरले आहे. अलीकडे भारतात अमली पदार्थांचे लोन मोठ्या प्रमाणात पसरत आहे.
पंजाबला अमली पदार्थांचा विळखा: Punjab is plagued by drugs
भारतात सर्वात प्रथम पंजाब राज्यात मोठ्या प्रमाणात नशेले पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढू लागले. हे प्रमाण इतके वाढले की तरुण पिढी रात्रंदिवस नशेत झिंगू लागली. पंजाबची ही दुर्दशा पाहून त्यावर आधारित ‘उडता पंजाब’ नावाचा चित्रपटही निघाला. या चित्रपटाच्या माध्यमातून पंजाब मधील तरुण पिढी किती बरबाद झालेली आहे, हे दाखवण्यात आले आहे.
भारतात गुजरात मार्गे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची आयात: Gujarat is the largest importer of drugs in India.
अलीकडच्या पाच वर्षांचा इतिहास पाहिल्यास भारतात सर्वात जास्त प्रमाणात गुजरातमार्गे अमली पदार्थ आल्याचे चित्र दिसत आहे. हे चित्र इतके भयानक आहे की हळूहळू संपूर्ण देश आणि देशातील तरुण अमली पदार्थांच्या नशेत गुंततो की काय अशी भीती वाटत आहे. अलीकडच्या काळात सात हजार कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा गुजरातमध्ये जप्त करण्यात आला. अर्थात हा सापडलेला साठा आहे. याशिवाय आणखी किती हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ भारतभर पसरला असेल याची गणतीच करता येणार नाही. भारताची प्रगती रोखण्यासाठी भारतीय तरुणांना अमली पदार्थांमध्ये ओढले जात आहे. भारतीय तरुणांनी ही शत्रूची पावले वेळीच ओळखून सावध राहिले पाहिजे.तरच उज्ज्वल भारत निर्माण करण्यासाठी ती तरुण पिढी भविष्यात यशस्वी होईल.