Gold prices-सोन्याचा दर एक लाखांवर…?

जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याला चांगलाच भाव आला आहे. सोन्याच्या दराने 20 जुलै 2025 रोजी एक लाखांचा टप्पा पार केला आहे. स्त्रियांच्या बाबतीत सोने हा जिव्हाळ्याचा विषय असून सोन्याचा भाव कितीही वाढला तरी सोन्याची खरेदी काही थांबलेली नाही.

सोन्याचा दर सतत का वाढत आहे? Why is the price of gold increasing?

सध्या जागतिक स्तरावर आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. युक्रेन- रशिया युद्ध, इस्रायल,इराण युद्ध, भारत-पाक युद्ध, अमेरिकेने वाढवलेले टेरिफ दर या सर्व गोष्टींमुळे गुंतवणूकदारांच्यात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना सर्वात सुरक्षितता म्हणून अनेक गुंतवणूकदार सोन्यामध्ये आपली गुंतवणूक करत आहेत. त्याचबरोबर सोने हा स्त्रियांच्या आवडीचा विषय असल्याने स्त्रियांना सोन्याचे दागिने घालण्याची खूप हौस असते. या पार्श्वभूमीवर अजूनमधून स्त्रिया सोने खरेदी करत असतात. त्यामुळेच सोन्याचा दर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे.

नजिकच्या काळात सोन्याचा दर कुठपर्यंत जाईल?

सोन्याचा दर कितीही वाढला तरी सोनेरी खरेदी काही थांबत नाही.
त्यामुळे सोन्याचा दर हा वाढतच राहणार आहे. नजीकच्या दहा वर्षात सोन्याचा दर एक लाख दहा हजार हून अधिक होईल आणि नजीकच्या 25 वर्षात सोन्याचा दर एक लाख 25 हजार ते एक लाख 50 हजारच्या दरम्यान होईल. असा अर्थ तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळेच सोन्याची गुंतवणूक कधीही थांबणार नाही. सोन्याचे दर उतरतील आणि सोने खरेदी करू अशी ज्यांची धारणा आहेत त्यांना सोने खरेदी करण्याची संधी मिळेल असे वाटत नाही.

Leave a comment