विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे यांची विधान परिषदेतील कारकीर्द संपल्याने त्यांच्या निरोपासाठी जमलेल्या समारंभात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्यासाठी खुली ऑफर दिली. काय घडली घटना? सविस्तर जाणून घेऊया.
बुधवार दिनांक 16 जुलै 2025 रोजी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विधानपरिषदेतील कारकीर्द संपल्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे तसेच सर्वच पक्षांचे बहुतांश आमदार उपस्थित होते. या समारंभाचा फायदा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्यासाठी ऑफर दिली. सत्तेत या आणि आमच्यात सामील व्हा. अशा प्रकारची खुली ऑफर दिल्यामुळे विधान परिषदेत अनेक चर्चा रंगल्या. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा खर्रकन पडला.