सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी लोकसभेच्या कामकाजात 50 मिनिटे अभूतपूर्व असा गोंधळ झाला.हा गोंधळ केवळ लोकशाहीच्या आणि सत्याच्या हक्कासाठीचा होता. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी माजी लष्कर प्रमुख एम एम नरवणे यांच्या पुस्तकातील पाच ओळी वाचण्याची अनुमती मागितली होती: पण लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी ती दिली नाही. यावर अमित शहा, राजनाथ सिंह आणि भाजपाच्या अनेक संसद सदस्यांनी गोंधळ निर्माण केला आणि राहुल गांधींना प्रश्न विचारण्यापासून आणि नरवणे यांच्या पुस्तकातील पाच ओळी वाचण्यापासून रोखण्यात आले.
*लष्कर प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकात काय आहे?*
माझी लष्कर प्रमुख एम एम नरवणे यांच्या 2020 मधील भारत चीन संघर्षावरील एका अप्रकाशित पुस्तकावरून हा अभूतपूर्व असा गोंधळ झाला. लष्कर प्रमुख नरवणे यांनी या पुस्तकात स्पष्ट केले आहे की चीनने भारतावर किंवा भारताच्या भूमीत आक्रमण केलेले आहे याची कल्पना फोनवरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिली होती. रात्री आठ वाजता ही कल्पना दिली होती आणि ताबडतोब कारवाई करण्यासाठी संमती त्यांना हवी होती; पण राजनाथ सिंह यांनी परत पुन्हा फोन करून काहीच उत्तर दिले नाही. यावर नरवणे यांनी पंतप्रधान मोदी यांनाही फोन केला; पण त्यांनीही उत्तर दिले नाही. उत्तर आले रात्री दहा वाजता. त्यावेळी वेळ निघून गेली होती आणि तेही उत्तर आले ते म्हणजे तुम्ही तुमच्या पातळीवर निर्णय घेऊ शकता. असे उत्तर आले. अर्थात अशा प्रकारचा निर्णय लष्कर प्रमुखांनी घेतला आणि काही विपरीत घडले असते , त्याचा दुष्परिणाम झाला असता किंवा भारतीय लष्कराचे मोठे नुकसान झाले असते तर लष्करावर खापर फोडायला हे सरकार मोकळे झाले असते. असे मत लष्कर प्रमुख नरवणे यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कचखाऊ धोरणामुळे चीनने डोकलाम भागात आक्रमण केले आहे आणि भारताची भूमी ताब्यात घेतली आहे. यावर राहुल गांधी यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला पण या भाजपाच्या हुकूमशाही सरकारने राहुल गांधींचा आवाज दाबला. वास्तविक सत्य संसदेत मांडण्याचा अधिकार लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना आहे; पण तोही हक्क ओम बिर्लासह भाजपाच्या सर्वच मंत्र्यांनी आणि संसद सदस्यांनी हिरावून घेतला.
*सरकार सत्य का लपवू पाहते?*
माझी लष्कर प्रमुख एम एम नरवणे यांनी 2020 च्या भारत चीन संघर्षावर प्रकाश टाकणारे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक प्रकाशित होण्यापासून जाणीवपूर्वक सरकारने त्यांना रोखले आहे. शिवाय हे पुस्तक प्रकाशित झाले नाही या कारणास्तव त्या पुस्तकातील एखाद्या उतारावर संसदेत चर्चा करता येणार नाही असे गृहमंत्री अमित शाह,संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, त्याचबरोबर ओम बिर्ला यांनी भूमिका घेतली . वास्तविक माजी लष्कर प्रमुख होते ते आणि भारताची त्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली होती.
त्यांनी लिहिलेले पुस्तक प्रकाशित करण्यात सरकारला कोणती भीती आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी आहे. शिवाय लष्करप्रमुख यांनी चीनने आक्रमण केलेल्या घटनेची कल्पना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदी यांना दिली असूनही त्यांच्याकडून कोणतीही पावले उचलली नाहीत. आणि हा दुबळेपणा त्यांनी आपल्या पुस्तकात स्पष्टपणे मांडलेला होता. हे सत्य जगासमोर म्हणजेच भारतीय नागरिकांसमोर येऊ नये म्हणून अमित शाह, राजनाथ सिंह आणि बिर्ला यांची धडपड चालू होती. ही भारतीय लोकशाहीची हत्या आहे. याशिवाय सत्य दडपण्याचा भाजपाचा जो अजेंडा आहे, तो चुकीचा आहे.