1 फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात 2026/27 च्या अर्थसंकल्पात गुंतवणूकदार आणि कार्पोरेट जगतासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. कंपन्यांद्वारे केल्या जाणाऱ्या शेअर बायबॅकवर मिळणारा परतावा आता सर्व प्रकारच्या शेअर धारकांसाठी कॅपिटल गेन्स म्हणजे भांडवली नफा म्हणून गणला जाणार असून त्यावर त्यानुसार कर आकारणी केली जाईल, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे कार्पोरेट बायबॅकला मिळणारी कर सवलत संपुष्टात येणार असून गुंतवणूकदारांवर कराचा थेट बोजा पडणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी आता आपल्या पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करणे आवश्यक ठरणार आहे. उत्पन्न मोजणी करण्यासाठी एक संयुक्त समिती ही स्थापन केली जाईल. शेअर बाजारात मंदी पसरण्याची शक्यता आहे.