गुरुपौर्णिमा/ Guru Pournima

भारतीय संस्कृती ही एक आदर्श संस्कृती आहे. भारतात सर्व जाति-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात. भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय योग या बाबी संपूर्ण जगासमोर आदर्शवत आहेत.अनेक सण, उत्सव, परंपरा यांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत असते. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक आदर्श उत्सवच आहे.गुरु‌पौर्णिमेची भारतीय संस्कृतीतील परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. या परंपरेविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत.

गुरुपौर्णिमा दरवर्षी केव्हा येते?

भारतात कालमापनाच्या दोन पद्‌धती अस्तित्वात आहेत. एक ग्रेगेरियन सौर वर्ष आणि दुसरी भारतीय सौर वर्ष (चांद्र-सौर वर्ष) होय. भारतीय सौर वर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ शुद्‌ध पौर्णिमेला येते. म्हणजेच गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी करतात.

गुरुपौर्णिमेच्या पौराणिक कथा:Mythology of Guru purnima:

परंपरा हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. गुरुपौर्णिमा ही एक आदर्श परंपरा आहे. गुरुपौर्णिमा कधी, कशी आणि केव्हापासून सुरु झाली, हे काही पुराणकथांच्या आधारे आपण पाहूया:-

भगवान शिव आणि गुरुपौर्णिमा: Lord Shiva and Guru Poornima:

भगवान शिव हा अवैदिक संस्कृतीतील एक महामानव आहे. भारतीय संस्कृतीतील भेद‌भाव नष्ट करण्यासाठी, सहिष्णुता निर्माण करण्यासाठी सर्वांना’ समान हक्क देण्यासाठी झटणारा आणि भारतीय संस्कृतीची पुनर्रचना करणारा शिव हा पहिला महामानव होय. म्हणून भारतीय संस्कृतीत भगवान शंकराचे स्थान अढळ आहे. गावोगावी, खेडोपाडी आपल्याला भगवान शंकराची मंदिरे दिसतात.याचे कारण म्हणजे त्याने दिलेली शिकवण होय. ज्या दिवशी भगवान शंकराने सप्त ऋषींना योग विद्येची शिकवण ‌द्यायला सुरुवात केली.तो दिवस म्हणजेच आषाढ शुद्ध पौर्णिमा होय. या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्याची प्रथा सुरु झाली.पुढे या प्रथेचे गुरुपौर्णिमेत रुपांतर आले.म्हणून भगवान शिवाचा आदर करण्यासाठी गुरुपौर्णिमेची प्रथा सुरु झाली. असे मानणारा एक मतप्रवाह भारतीय संस्कृतीत आहे.

गौतम बुद्ध आणि गुरुपौर्णिमा:Gautam Buddha and Guru Purnima:

जगाला शांतीचा संदेश देणारा पहिला महामानव म्हणजे भगवान बुद्ध होय. ‘अहिंसा परमो धर्म’ हे बुद्धांच्या विचाराचे सार होते.बुद्धांनी कल्पित ईश्वराला नाकारले. पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, उच्च-नीचता नाकारून सदाचरणाचा स्वीकार केला. बुद्धांचे तत्त्वज्ञान हे जगातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान मानले जाते. त्यांचे विचार वास्तववादी होते.गौतम बुद्धांनी घनघोर तपस्या करून म्हणजे खूप चिंतन, मनन करून मानवी जीवनाबद्‌दल, सृष्टीबद्दल जे मत मांडले, त्यालाच बुद्‌धांचे तत्त्वज्ञान असे म्हणतात. गौतम बु‌द्धांनी सारनाथ येथे लोकांना पहिला उपदेश केला. तो दिवस होता- आषाढ शुद्ध पौर्णिमेचा. त्या दिवसापासून लोक गौतम बुद्‌धांची गुरू म्हणून पूजा करु लागले.तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय, असे मानणारा भारतीय संस्कृतीत एक मतप्रवाह आहे.

व्यासमुनी आणि गुरुपौर्णिमा:Vyasamuni and Guru purnima:

महाभारत (जय) या महान ग्रंथाचे लेखक म्हणजे व्यासमुनी होय. महाभारत हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मानवी जीवनाचे आणि मानवी स्वभावाचे अनेक पैलू अगदी कौशल्याने व्यासांनी महाभारत या ग्रंथात उलगडले आहेत. शिवाय व्यासांना वेद‌व्यास असे म्हटले जाते. वेदांची रचना व्यासांनीच केली आहे.असे म्हटले जाते; पण याबाबत मतभिन्नता आहे. गुरु व्यासांचा जन्म आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला. त्यांचा जन्मदिवास हा शुरुचा सन्मान करणारा दिवस मानला जातो. म्हणून यादिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. असे मानणारा एक मतप्रवाह भारतीय संस्कृतीत आहे.

गुरुपौर्णिमा का साजरी करतात? Why is Guru pournima celebrated?
गुरूने दिलेल्या ज्ञानाच्या सन्मानार्थ त्यांच्याप्रती आदर‌भाव निर्माण करण्यासाठी आणि गुरुप्रती निष्ठा, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करतात. गुरू हा आपल्याकडे असणार ज्ञान, कौशल्य निरपेक्षपणे आपल्या शिष्याला देत असतो. आपला शिष्य सर्वगुणसंपन्न बनवण्यासाठी गुरु नेहमीच प्रयत्न करत असतो. म्हणून गुरुचा आदर राखण्यासाठी गुरुच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

गुरु कोणाला मानावे?

 

जे आपल्याला निरपेक्षवृत्तीने ज्ञान देतात. आपल्या शिष्याला सर्वच दृष्टीने सक्षम बनवतात.ते आपले गुरु असतात.गुरुने दिलेल्या ज्ञानामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळते आणि गुरूने दिलेल्या संस्कारामुळे सुसंस्कृत नागरिक बनतो. अशा गुरुचे स्मरण गुरु‌पौर्णिमेदिवशी करणे म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे होय.अशा गुरुंना साष्टांग नमस्कार करावा. साने गुरुजींनी आपल्या आईला गुरू मानले. ‘आई माझा गुरु। आई कल्पतरू । सौख्याचा सागरू। आई माझी ॥ असे साने गुरुजी म्हणतात.त्यांना घडवण्यात, त्यांना संस्काराची शिदोरी देण्यात यांच्या आईने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आईवडील, आजोबा-आजी. हे आपले गुरुच असतात. गुरु‌पौर्णिमेला त्यांचा आशीर्वाद घ्यावा . त्यांचे चर‌णस्पर्श करून त्यांना नमस्कार करावा.

गुरु‌पौर्णिमा कोठे कोठे साजरी करतात ?Where is Guru Poornima celebrated?

गुरुपौर्णिमा संपूर्ण भारतात ज्ञानमंदिरात (शाळांमध्ये), मंदिरात, विहारात, साजरी करतात. भारतातील आणि नेपाळमधील हिंदू, बौद्‌ध, जैन लोक गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी करतात.

सर्वांना गुरु‌पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!!!!!!

Leave a comment