भारतीय शास्त्रज्ञ /Indian Scientists

 

चरक :

* चरक यांना मानवी शरीर रचनेबद्दल सखोल ज्ञान होते.

० त्यांनी ‘चरकसंहिता’ हा वैद्यकशास्त्रावर आधारित ग्रंथ लिहिला.

सुश्रुत :

* सुश्रुत यांना शस्त्रक्रिया शास्त्रातील प्रणेते म्हणतात.

० त्यांनी शस्त्रक्रियेसंबंधी ‘सुश्रुत संहिता’ हा ग्रंथ लिहिला.

कणाद :

* कणाद ऋर्षीनी वस्तुमानाविषयी सर्वप्रथम अणुसिद्धांत मांडला.

आर्यभट्ट :

पृथ्वी स्थिर नसून स्वतःभोवती फिरते हे प्रथम आर्यभट्ट यांनी सांगितले. भारत सरकारने 19 एप्रिल 1975 रोजी पहिला कृत्रिम उपग्रह सोडला.

त्याचे नाव ‘आर्यभट्ट’ होते.

डॉ. जगदीशचंद्र बोस :

* वनस्पतींना भावना आणि संवेदना असतात, हे प्रथम त्यांनी प्रयोगासह सिद्ध केले.

* लंडनच्या सुप्रसिद्ध रॉयल सोसायटी त्यांना ‘फेलो’ म्हणून निवडले.

* त्यांनी कोलकाता येथे ‘बोस संशोधन संस्था’ स्थापन केली.

डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमन :

82 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांनी प्रकाशलहरींबाबतचे आपले संशोधन ‘रामन परिणाम’ म्हणून प्रसिद्ध केले.

० 1930 साली त्यांना पदार्थविज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळाले.

* त्यांचा जन्म दिवस 28 फेब्रुवारी हा ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

* त्यांनी बंगालमध्ये ‘रामन संशोधन संस्था’ स्थापन केली.

० त्यांना 1954 साली ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला.

डॉ. एस. चंद्रशेखर :

* मरणाऱ्या ताऱ्यास दीर्घकाळ कार्यरत ठेवणाऱ्या वस्तुमानासंबंधी त्यांनी ‘चंद्रशेखर्स लिमिट’ हा सिद्धांत मांडला.

* या सिद्धांताबद्दल 1983 साली त्यांना ‘नोबेल पारितोषिक’ मिळाले.

* भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ हा किताब दिला.

० 23 जुलै 1999 रोजी अमेरिकेने ‘कोलंबिया’ या अवकाशयानाद्वारे अंतराळात वेधशाळा सोडली. तिचे नाव ‘चंद्रा-एक्स-रे-ऑब्झव्हेटरी’ असे ठेवण्यात आले.

डॉ. शांतिस्वरूप भटनागर :

प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी लंडनमध्ये डी. एस्सी. ही पदवी घेतली.

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या :

* सुप्रसिद्ध स्थापत्यशास्त्रज्ञ.

* खडकवासला धरण, राधानगरी धरणाचे स्थापत्यशास्त्रज्ञ.

० 1955 साली त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळाला.

* त्यांनी ‘भद्रावती आयर्न वर्क्स’ हा कारखाना सुरू केला.

डॉ. होमी भाभा :

* डॉ. होमी भाभा यांच्या प्रेरणेने 1945 साली ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ ही संस्था स्थापन झाली.

* त्यांनी ‘अप्सरा’, ‘सिरस’, ‘झेरालिना’ या अणुभट्ट्यांची उभारणी केली.

* त्यांना ‘भारताच्या अणुविज्ञानाचे जनक’ म्हटले जाते.

० त्यांना 1948 साली भारत सरकारच्या ‘अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष’ म्हणून निवडले गेले.

० त्यांना 1964 साली भारत सरकारने ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार दिला.

विक्रम साराभाई :

* प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ.

* ‘विश्वकिरणांचा अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.

* त्यांनी ‘फिजिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट’ ही संस्था स्थापन केली.  त्यांनी ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’चा (ISRO) विकास व विस्तार केला.

* भारताचा उपग्रह ‘आर्यभट्ट’ आणि ‘उपग्रह दूरदर्शनचा प्रयोग’ हे विक्रम साराभाई यांच्या परिश्रमाचे फळ होय.

डॉ. मेघनाद साहा :

* डॉ. साहा यांनी ‘अणूच्या विद्युतभारित रचनेचे सूत्र’ मांडले.

* त्यांनी कोलकाता येथे ‘साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स’ ही संस्था स्थापन केली.

डॉ. हरगोविंद खुराणा :

* प्रख्यात जीवशास्त्रज्ञ. सर्व सजीव सृष्टीचा मूलभत घटक असणारा ‘जीन’ (gene) कृत्रिमरीत्या शोधून काढणारा पहिला संशोधक.

० 1968 साली त्यांना ‘नोबेल पारितोषिक’ मिळाले.

डॉ. राजा रामण्णा :

० 18 मे 1974 रोजी राजस्थानातील पोखरण येथे भारताने पहिली यशस्वी चाचणी घेतली. त्याचे सूत्रधार डॉ. राजा रामण्णा होते.

* डॉ. रामण्णा हे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते.

डॉ. सतीश धवन :

* डॉ. सतीश धवन यांनी अवकाश आयोग व भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) या संस्थांचे अध्यक्ष म्हणून काम केले.

* भारताच्या ‘रोहिणी’ व ‘अॅपल’ या उपग्रहाच्या उड्डाण कार्यक्रमाचे ते प्रमुख सूत्रधार होते.

* भारत सरकारने श्रीहरिकोटा येथील अवकाश संशोधन केंद्रास डॉ. सतीश धवन यांचे नाव दिले.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम :

* भारताच्या अवकाश संशोधन व क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे कलाम हे प्रमुख सूत्रधार होते.

* त्यांच्या मार्गदर्शनाखाली 11 मे 1998 मध्ये ‘पोखरण’ येथे अणुचाचण्या घेऊन आण्विक शक्ती असलेल्या देशांच्या गटात भारताने प्रवेश केला.

* पृथ्वी, त्रिशूल, अग्नी या क्षेपणास्त्रांची रचना, निर्मिती, विकास यांचे श्रेय डॉ. कलाम यांनाच जाते.

* त्यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाते.

* त्यांचे ‘विंग्ज ऑफ फायर’ (अग्निपंख) हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

० त्यांना 1990 साली ‘पद्मविभूषण’ व 1998 साली ‘भारतरत्न’ हा पुरस्कार मिळाला.

डॉ. वसंत गोवारीकर :

* प्रसिद्ध भौतिक व हवामान शास्त्रज्ञ.

* अग्निबाणात वापरण्यात येणाऱ्या द्रवरूप इंधनावरील त्यांचे संशोधन विशेष महत्त्वाचे आहे.

जयंत नारळीकर :

* प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ.

* विश्वनिर्मितीबाबातचा त्यांचा सिद्धांत ‘नारळीकर हॉइले सिद्धांत’ व नावाने जगप्रसिद्ध आहे.

० आयुक्ता (स्थापना : 1988) या संस्थेच्या स्थापनेपासून संचालक.

* भारत सरकारकडून त्यांना 2004 साली ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार देऊ गौरविण्यात आले.

डॉ. विजय भटकर

* डॉ. विजय भटकर यांनी संपूर्ण देशी बनावटीच्या ‘परम’ या महासंगणकाच निर्मिती केली.

० 2000 साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ हा पुरस्कार दिला.

1999-2000 सालचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार त्यांना मिळाला.

Leave a comment