रविंद्रनाथ टागोर / Rabindranath Tagore

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 में 1861 मध्ये कोलकाता येथील जोराशंका ठाकूर बाडी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ होते. तर आईचे नाव सरला (शारदादेवी) होतेः देवेंद्रनाथ आणि शारदादेवी यांचे 13 वे अपत्य म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर होय. वयाच्या बाराव्या वर्षी म्हणजे 1973 साली त्यांनी वडिलांसोबत भारत भ्रमंती करण्यास सुरुवात केली. या काळात त्यांनी भरपूर वाचन केले. अनेक ठिकाणे पाहिली. आत्मचरित्र, खगोलशास्त्र, कालिदासाचे काव्य यांचे वाचन केले. सुरुवातीपासूनच त्यांचा कल लेखनाकडे होता. 1877 साली लिहिलेल्या दीर्घ कविता खूप गाजल्या. त्यांचे लेखन खूप आकर्षक शैलीत आणि अर्थपूर्ण असल्याने लोकांना ते आवडू लागले.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले खरे, पण बॅरिस्टर ही पद‌वी न घेताच ते परत आले. 1 नोव्हेंबर 1883 रोजी त्यांनी मृणालिनी नावाच्या मुलीशी विवाह केला. हळूहळू कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडू लागली. त्यामुळे त्यांना जमीनदार बाबू या नावाने लोक हाक मारत असत. त्यांनी लिहिलेल्या कविता जशा सार्थ असत, तशाच कथाही वास्तव आणि हृदयस्पर्शी असत. पुढे त्यांनी चौऱ्याऐंशी कथा असलेला गल्पगुच्छ नावाचा ग्रामीण जीवनपट उलगडणारा कथासंग्रह लिहिला हा कथासंग्रह लोकांना खूप आवडला.

शांतिनिकेतन आश्रमाची स्थापना:

गुरुदेव खींद्रनाथ टागोर यांनी सियाल्दा येथील आपला मुक्काम हलवून 1901 मध्ये शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. तेथेच त्यांनी एका आश्रमाची स्थापना केली. येथेच त्यांनी मुलांच्या आवडीनुसार शिक्षण देणारी शाळा उघडली. शाळेत कृतिशीलतेला आणि प्रयोगशीलतेला खूप महत्त्व दिले जाई .संगीत, कला, कृषी,नृत्य, विविध भाषा यांचे मुलांना ज्ञान मिळू लागले. पुढे शांतिनिकेतनचा हा प्रयोग विश्वविख्यात झाला. विविध शाखा निर्माण झाल्या .शांतिनिकेतन मुळे रवींद्रनाथ टागोर जगप्रसिद्ध झाले.

सुरुवातीला रवींद्रनाथ टागोर यांनी ‘भानुसिंह ‘या टोपणनावाने कविता लिहित असत. नंतर नंतर ते आपल्या खऱ्या नावाने कविता लिहू लागले. आज त्यांच्या कविता, कथा अनेक भाषांत प्रकाशित झालेल्या आढळतात.

गीतांजली काव्य आणि नोबेल पारितोषिक:

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यावर कालिदासाच्या काव्याचा अधिक प्रभाव होता. त्यांनी केलेल्या शांतिनिकेतनच्या स्थापनेमुळे आणि तेथील अध्यापनामुळे त्यांना गुरुदेव ही उपमा मिळाली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत ‘गीतांजली’ हा काव्यसंग्रह प्रसिदध केला. मानवी जीवनाचे मूल्य, तत्त्वज्ञान त्यांच्या काव्यातून प्रकट होत होते. गीतांजलीच्या लोकप्रियतेमुळे ते काव्य हिंदी, इंग्रजी, मराठी अशा कितीतरी भाषांत भाषांतरित करण्यात आले. त्यांचे हे काव्य सातासमुद्रापलीकडे पोहोचले. 10 डिसेंबर 1913 साली रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ या काव्याला नोबेल पारितोषिक जाहीर झाले. रवींद्रनाथ टागोर यांच्या रुपाने प्रथमच भारताला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले.

गीतांजली या काव्यसंग्रहाबरोबरच रवींद्रनाथ टागोर यांनी कथालेखन, बालसाहित्य, नाटक, कादंबरी यांचे लेखन केले. त्यांचे साहित्य आज भारतात सर्व भाषांमध्ये प्रकाशित केले जात आहे.

घरे बाथरे, गोरा, चोखेर बाली, या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत.

भिकारिणी, काबुलीवाला, हैमंती, मुसलमनीर गोलपो, अत्तोतजू इत्यादी लघुकथा खूप गाजल्या आहेत.

जन-गण-मन राष्ट्रगीत :

रविंद्रनाथ टागोर यांनी जन-गण-मन हे राष्ट्रगीत लिहिले. त्यांनी लिहिलेल्या या गीतात संपूर्ण भारताचे प्रतिबिंब उमटले आहे. म्हणूनच जग गण मन ला राष्ट्रगीताचा मान मिळाला. रवींद्रनाथ टागोर राष्ट्रगीताच्या रुपाने सदैव भारतीयांच्या स्मरणात राहतील.

रवींद्रनाथ टागोर यांच्या कार्याची नोंद ब्रिटीश सरकारनेही घेतली होती. त्यांचे शैक्षणिक कार्य पाहून त्यांना ब्रिटीश सरकारने 1915 साली ‘सर’ ही पदवी दिली; पण रवींद्रनाथ टागोर स्वाभिमानी होते. 1919 मध्ये पंजाबात जालियनवाला बाग हत्याकांड झाला. ब्रिटीश सरकारने निर्द‌यीपणे जालियनवाला बागेत बेछूट गोळीबार केला होता. रवींद्रनाथ टागोर यांना ही गोष्ट खटकली होती, म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारने दिलेली सर ही पद‌वी सरकारला परत देऊन जालियनवाला बागेतील हत्त्याकांडाचा निषेध केला होता.

जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात रवींद्रनाथ टागोर यांची लोकप्रियता शिखरावर पोहोचली होती. बंगालच्या आर्थिक स्थितीबद्‌द‌ल आणि सामाजिक मागासलेपणाबद्‌दल टागोरांना खूप चिंता होती. 1937 साली आजारप‌णामुळे खींद्रनाथ टागोर बेशुद्ध पडून काही दिवस कोमात गेले होते. अखेर 7 ऑगस्ट 1941 रोजी त्यांचा वडिलोपार्जित जोरशंका ठाकूर बाडी येथे मृत्यू आला.

सत्यजित रे यांनी काढलेल्या अपूर संसार (अपूचे जग) या सिनेमावर रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याचा प्रभाव पडलेला दिसून येतो.यावरून रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याची लोकप्रियता दिसून येते.

Leave a comment