1. हम्पी – Hampi :
एके काळी विजयनगरचे साम्राज्य असलेले ठिकाण म्हणून हम्पीची ओळख होती.त्या हम्पीबद्दल आपण अधिक माहिती घेऊया—–
हम्पीला तुम्ही कसे जाल ? How to go to Hampi?
* कोल्हापूरहून बेळगावी मार्ग हम्पीला गेल्यास 377 किलोमीटर अंतर आहे आणि बागलकोट मार्गे गेल्यास 365 किलोमीटर अंतर होते.
* निपाणीहून गोकाक मार्गे हम्पीला गेल्यास 327 किलोमीटर अंतर होते.
* बंगळुरु [Banglore] हून चित्रदुर्गा मार्गे हम्पीला गेल्यास 342 किलोमीटर अंतर भरते.
* सोलापूरहून बागलकोटमार्गे 312 किलोमीटर अंतरावर हम्पी आहे.
अकराव्या शतकात हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी विजयनगरचे साम्राज्य निर्माण केले होते. हम्पी (Hampi) ही विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी होती. मुहम्मद तुघलक या बलाढ्य शत्रूला हरवून दक्षिण भारतात विजयनगरच्या साम्राज्याची उभारणी हरिहर आणि बुक्क यांनी केली होती. इ.स. 1082 साली स्थापन झालेले विजयनगरचे साम्राज्य इ.स. 1646 साली नष्ट झाले .श्रीरंग हा विजयनगरचा शेवटचा राजा होय. राजा कृष्णदेवरायच्या काळात विजयनगरचे साम्राज्य भरभराटीस आले होते. कृष्णदेवरायने साहित्य, चित्रकला, शिल्पकला, नृत्यकला, संगीत इत्यादी कलांना प्रोत्साहान दिले होते. हम्पी या ठिकाणी पर्यटकांनी आवश्य भेट देऊन विजयनगरच्या साम्राज्याचा इतिहास जाणून घ्यावा.
2.बदामी [Badami]:
हम्पीला जाता-जाता बदामी हे कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पाहता येते.
* बदामीहून हम्पी 130 किलोमीटर अंतरावर आहे.
* महाराष्ट्रातील सांगली या ठिकाणाहून बदामी 194 किमी अंतरावर आहे.
* कर्नाटकातील गोकाकपासून बदामी 112 किलोमीटर अंतरावर आहे.
* कोल्हापूरहून गोकाकमार्गे बदामी 219 किलोमीटर अंतरावर आहे.
* सोलापूरहून विजयपुरा मार्गे बदामी 220 किलोमीटर अंतरावर आहे.
बदामी हे कर्नाटकातील प्रसिद्ध ठिकाण बागलकोट जिल्ह्यात असून बदामीचे पूर्वीचे नाव वातापी असे होते. बदामी हे चालुक्य राजवंशीय राजघराण्याची राजधानी होती. इ.स.540 ते इ.स. 757 या काळात चालुक्य राजघराण्याची सत्ता होती. बदामी येथील गुफा (Caves) प्रसिद्ध आहेत. चालुक्य सम्राट मंगलसेन यांचा इ.स. 578 सालचा शिलालेख गुफा क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळतो. याशिवाय भूतनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, विष्णु मंदिर, बदामी शिवालय इत्यादी मंदिरे आणि गुफा बदामी येथे पाहायला मिळतात. या गुफा हिंदू आणि जैन गुफा म्हणून प्रसिद्ध आहेत.
3. विजापूर [Bijapur]:
हसन गंगू हा बहमनी साम्राज्याचा संस्थापक होता. पुढे बहमनी साम्राज्य खिळखिळे झाले आणि विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची विदरशाही अशी पाच साम्राज्ये निर्माण झालीत. त्यांतील विजापूरची आपण माहिती घेणार आहोत –
* सोलापूरहून विजापूर 98 किमी अंतरावर आहे.
* कोल्हापूरहून सांगलीमार्गे विजापूर 175 किमी अंतरावर आहे.
निपाणीहून चिकोडी, अथनी मार्गे विजापूर 164 किमी अंतरावर आहे.
गोकाक धबधब्यापासून विजापूर 149 किलोमीटर अंतरावर आहे.
* गोलघुमट
विजापूरचा गोलघुमट म्हणजे सुल्तान मुहम्मद आदिलशाह याचा मकबरा होय. येथे सुल्तान आदिलशाहची समाधी आहे. पारसी वास्तुस्थापत्य दाबुल याकूत याने इ.स. 1656 मध्ये हा गोलघुमट बांधला. या गोलघुमटाची उंची 51 मीटर असून जिन्याचे टप्पे चढून काही अंतर वर गेल्यास गोलाकार गॅलरी [Gallary] लागते. ही गॅलरी घुमटाच्या आतील बाजूस आहे. येथे शांत वातावरणात भिंतीला मनगटी घड्याळ लावल्यास त्या घड्याळाच्या विरुद्ध बाजूला समोर भिंतीला कान लावल्यास टिक टिक असा आवाज ऐकू येतो. येथे गॅलरीत आरोळी ठोकली तर ती सात वेळा प्रतिध्वनी स्वरुपात ऐकायला मिळते.
‘विजापूर येथे खूप विजा पडायच्या. त्यामुळे या ठिकाणाला विजापूर असे नाव पडले.
* मलिक-ए-मैदान तोफ [मुलुख मैदान तोफ]:
विजापूरची मुलख मैदान तोफ खूप प्रसिद्ध आहे. ही तोफ मुहम्मद बिन हुसेन याने इ.स. 1549 रोजी बनवली आहे.विजापूरच्या सिंह मीनार या बुरुजावर ही तोफ असून या तोफेची लांबी 4.45 मी आहे. ही तोफ पंचधातू मिश्रित मेटल पासून बनवलेली असून सुमारे 500 वर्षे होत आली तरी ती अगदी सुस्थितीत आहे .या तोफेतून उडवलेला गोळा 2 मैल अंतरावर जाऊन पडत होता. प्रचंड आग ओकणारी ही तोफ विजापूरची शान आहे.
याशिवाय विजापुरात इब्राहीम रोझा ही इमारत पाहण्यासारखी आहे.
4 गोकाकचा धबधबा [Gokak Falls]:
भारतातील कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यात गोकाक तालुक्यात घटप्रभा नदीवर गोकाक धबधबा आहे.घटप्रभा आणि मार्कंडेय या दोन नद्यांच्या संगमावर गोकाक हे नगर वसलेले आहे. घटप्रभेवरील या धबधब्याला गोकाकचा धबधबा असे म्हणतात.
गोकाकचा धबधबा [Gokak Falls] बेळगाव शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे.
* निपाणीहून गोकाक 70 किलोमीटर अंतरावर आहे.
* कोल्हापूरहून गोकाकचा धबधबा 104 किलोमीटर अंतरावर आहे.
* राधानगरीहून निपाणी- चिकोडी मार्गे गोकाक किलोमीटर अंतरावर आहे.
पावसाळ्यात नदीचा वाहता प्रवाह सुरु झाल्यावर गोकाकचा धबधबा पाहण्याचा आनंद घेता येतो. अतिवृष्टीच्या काळात धबधबा न पाहता मध्यम पाऊस असताना धबधबा पाहणे अधिक चांगले. त्यावेळी धबधब्याचे मनोहर दृश्य कॅमेरात टिपता येते.
(5) बेंगळुरु Bengaluru/Bangalore:
बेंगळूरु ही कर्नाटक राज्याची राजधानी असून भारतातील एक प्रसिद्ध शहर आहे. भारतातील एक सुंदर आणि नियोजनबद्धरीत्या बांधलेले शहर अशी या शहराची ओळख आहे. त्या शहराची आता आपण माहिती घेऊया—
* बेंगळुरु ही कर्नाटक राज्याची राजधानी बेळगाव (बेळगावी) पासून 500 किमी अंतर आहे.
* कोल्हापूरहून बेंगळुरु 600 किमी अंतरावर आहे.
सोलापूरहून बेंगळुरु 620 किमी अंतरावर आहे. येथून विमानाने बेंगळुरूला जाता येते.
* पुणे, मुंबई, नागपूर, दिल्ली येथून विमानाने बंगळुरुला जाता येते. आता आपण बेंगळूरु शहरातील काही महात्वाच्या ठिकाणांची माहिती घेऊ.
लालबाग (बेंगळूरू):
बेंगळुरु शहरात असणारी एक प्रसिद्ध आणि सुंदर बाग म्हणून लालबागची ओळख आहे.येथील लॉन ,वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे, त्यांची रचनात्मक मांडणी, कमळ तलाव, गुलाबांचे ताटवे अशा विविध प्रकारच्या आकर्षक फुलझाडांनी आणि वृक्षांनी लालबाग व्यापलेली आहे. सुमारे 240 एकरात ही बाग असून अशी बाग मुख्य शहरात क्वचितच पाहायला मिळते. हैदर अलीने ही बाग निर्माण केली असून त्याचा पुत्र टिपू सुलतानने या बागेचा आणखी चांगला विकास केला. लाल बागेच्या मधोमध एक ग्लास हाऊस आहे. हे Glass house केवळ जानेवारी आणि ऑगस्ट या दोन महिन्यातच पुष्प प्रदर्शनासाठी उघडते. या बागेत भारतातील अनेक सिनेमांचे चित्रीकरण होत असते. ही बाग बॉटनिकल बाग म्हणून प्रसिद्ध आहे.
रमन इन्स्टिट्यूट – Raman Research Institute, Bengaluru.
रमन इन्स्टिट्यूट ही बेंगळूरु मधील स्वायत्त(Autonomous)संशोधन संस्था आहे. ही संस्था नोबेल पारितोषिक विजेते सी. व्ही. रमन यांनी 1948 साली स्थापन केली. 1972 साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून या संस्थेला अनुदान मिळाले. या संस्थेत खगोल शास्त्र, भौतिक शास्त्र, प्रकाश आणि पदार्थ भौतिक शास्त्र, सॉफ्ट कंडेंट मॅटर इत्यादी शाखा आहेत. तसेच येथे जागतिक पातळीवरच्या व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात.
विमानांचा कारखाना, बेंगळूरु: Aeroplane Institute
बेंगळूरू येथे विमानांचा कारखाना आहे. एरोस्पेस उद्योगाचा विकास आणि विस्तार करणे हे या संस्थेचे
मुख्य ध्येय आहे. बंगळूरुमध्ये अनेक एरोस्पेस कंपन्यांचे हब आहे. येथे विविध प्रकाराचे विमानाचे स्पेअर पार्ट्स तयार केले जातात.
फुलपाखरु उद्यान, बेंगळूरु: Butterfly Park: Bengaluru
कर्नाटक राज्यातील फुलपाखरु उद्यान बेंगळूरु येथे असून ते 1970 साली स्थापन झाले. 1974 साली या उद्यानाला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. 2002 पासून पर्यावरणासह अनेक घटकांना चालना मिळाली. बेंगळुरु शहराच्या हद्दीपासून सुमारे 25 किमी अंतरावर हे उद्यान आहे. येथे फुलपाखराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या 28 प्रजाती पाहायला मिळतात.
6. कृष्णराज सागर : Krishna Raj Sagar, Kaveri Dam
कर्नाटकातील कावेरी नदीवर कृष्णराज सागर हा डॅम असून प्रचंड सृष्टिसौंदर्य लाभलेला हा परिसर अनेक विलोभनीय दृश्यांनी नटलेला आहे. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात हे धरण असून या धरणाच्या उगमाच्या दिशेला हेमावती व लक्ष्मणतीर्थ या दोन नद्या कावेरी नदीला मिळाल्या आहेत. 1911 साली या धरणाच्या बांधकामास सुरुवात झाली. 1932 साली हे धरण पूर्ण झाले. म्हैसूरचा राजा कृष्णराज वाडियार यांनी हे धरण दुष्काळावर मात करण्यासाठी बांधून घेतले. भारतीय स्थापत्य शास्त्रज्ञ भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांनी हे धरण पूर्णत्वास येण्यास आणि बांधकाम करून घेण्यास सहकार्य केले होते. कृष्णराज सागराच्या जवळच वृंदावन गार्डन आहे.
7. श्रवणबेळगोळा: Shravanbelgola, Karnataka:
कर्नाटकातील हसन जिल्ह्यात चन्नरायापटनाजवळ श्रवणबेळगोळा हे शहर वसलेले असून ते बेंगळुरुपासून 144 किलोमीटर अंतरावर आहे. बेळगावपासून श्रवणबेळगोळा 460 किलोमीटर अंतरावर आहे.
कर्नाटकातील श्रवणबेळगोळ हे एक जैन धर्माचे तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण बाहुबली गोमटेश्वराच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. श्रवणबेळगोळाजवळील विंध्यगिरी पर्वतावर बाहुबली गोमटेश्वराची 57 फुटी मूर्ती अखंड पाषाणातून कोरली आहे. बाहुबली गोमटेश्वर हे जैन धर्माचे पहिले तीर्थकर होय.
गोमटेश्वराची ही मूर्ती गंग राजघराण्यातील चावुंडराया या मंत्र्याने इ..स 978 ते इ स.993 या कालखंडात घडवून आणली. अखंड पाषाणात कोरलेली जगातील सर्वांत उंच मूर्ती म्हणून ही गोमटेश्वराची मूर्ती प्रसिद्ध आहे.या मूर्तीचे वजन सुमारे 500 टन असून श्रवणबेळगोळ हे ठिकाण युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे.
खूप सुंदर संकलन अगदी मोजक्या शब्दात भरपूर माहिती दिली आहे
आपल्या कडून अजून खूप सुंदर ठिकाणची माहिती वाचायला आवडेल
Thanks