कर्नाटकातील पर्यटन स्थळे : Best places to visit in karnataka

कर्नाटक हे राज्य अनेक पर्यटन स्थळांनी नटलेले आहे. त्यात निसर्गाने आणखी भर घातली आहे. तेथील धबधबे, निसर्गसौंदर्य, थंड हवेची ठिकाणे आणि ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेतात.भुरळ घालतात. यातीलच काही ठिकाणांची आपण माहिती घेणार आहोत.—-

1. म्हैसूर Mysore/Mysuru:

म्हैसूर हे कर्नाटक राज्यातील एक महत्त्वाचे शहर असून लोकसंख्येने कर्नाटकात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मध्ययुगीन काळात म्हैसूर हे अनेक राजांचे राजधानीचे शहर होते. हैदर अली, टिपू सुलतान यांनी म्हैसूर हेच राजधानीचे शहर बनवले होते. आता आपण म्हैसूरमधील प्रसिद्ध ठिकाणे पाहू——

म्हैसूर पॅलेस Mysore Palace:

म्हैसूरमधील सर्वात आकर्षक आणि प्रेक्षणीय स्थळ म्हणून म्हैसूर पॅलेसची ओळख आहे. हा राजवाडा म्हैसूरमधील मिर्झा रोडवर आहे. या राजवाड्यात म्हैसूर राज्याचे महाराज वुडेयार राहत होते. 1912 साली हा राजवाडा म्हैसूरच्या राजाने बनवून घेतला होता. ब्रिटिश आर्किटेक्ट हेनरी इर्विन याने या राजवाड्याचे डिझाईन बनवले होते. येथील सुवर्ण सिंहासन बहुमूल्य रत्नांनी बनवलेले असून हे वैशिष्ट्यपूर्ण सिंहासन पाहायला अनेक पर्यटक येतात. येथील भिंतींवर लावलेली तैलचित्रे मन आकर्षित करून घेतात. विजयादशमी (दसरा) या दिवशी म्हैसूर मधील लोक या राजवाड्यातील सिंहासन पाहायला येतात. सकाळी 10.00 ते सायंकाळी 5:30 पर्यंत हा राजवाडा पर्यटकांसाठी खुला असतो.इतर वेळी राजवाडा पाहण्यासाठी योग्य तिकीट काढावे लागते.

* जगमोहन महाल: Jaga Mohan Palace:

म्हैसूरमधील हा तीन मजली राजवाडा खूप देखना जाणि आकर्षक आहे. म्हैसूरचे महाराज कृष्णराज वोडेयार यांनी 1861 मध्ये हा राजवाडा बांधून घेतला, म्हैसूर सिटी बस स्थानकापासून अगदी जवळ म्हणजे 3-4 किलोमीटर अंतरावर हा राजवाडा आहे.

1915 साली जगमोहन महालाचे जयचमाराजेंद्र आर्ट गॅलरीत रुपांतर करण्यात आले. येथे म्हैसूर शैलीतील आणि तंजावर शैलीतील पेंटिंग्ज पाहायला मिळतात. अनेक प्रकारच्या मूर्ती पण पाहायला मिळतात.

* चामुंडेश्वरी मंदिर: Chamundeshwari Temple:

म्हैसूरपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर चामुंडी डोंगरावर चामुंडेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे. चामुंडेश्वरी हे पार्वतीचेच रूप आहे. वेगवेगळ्या प्रदेशात पार्वतीला वेगवेगळी नाव आहेत. या चामुंडेश्वरीला महिषासुरमर्दिनी असेही म्हणतात. निसर्गरम्य ठिकाणी असलेले हे मंदिर पर्यटक आवश्य पाहतात आणि पार्वतीचे दर्शन होतात.हे मंदिर सुमारे 1000 वर्षापूर्वीचे असून सात मजली आहे. मंदिराची उंची ५० मीटर आहे.

* म्हैसूर पक्षी उद्यान : Mysore Bird Park:

इ..स. 1892 साली हे पक्षी उ‌द्यान निर्माण केले असून हे भारतातील सर्वात जुने पक्षी उद्यान आहे. या उद्यानात जवळजवळ 40 हून अधिक देशांतून वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी आणलेले आहेत. येथे पांढरा मोर पाहायला मिळेल. या उद्यानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देश-विदेशातून अनेक प्रवासी पक्षी या उद्यानात येतात. सुमारे 40 हून अधिक प्रजातीचे प्राणी-पक्षी येथे पाहायला मिळतात.

म्हैसूर हे भारतातील प्रसि‌द्ध शहर असून मुंबई, नागपूर, पुणे या शहरांतून विमानाने म्हैसूर पाहायला जाता येते.

2. गोकर्ण महाबळेश्वर :

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात भगवान शिवाचे हे एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर गोकर्ण या ठिकाणी असून या मंदिराला महाबळेश्वर मंदिर असे म्हणतात. शिवलिंग स्थापित हे मंदिर असून मानवतावादी दृष्टिकोन जोपासणाऱ्या आणि भेद‌भावविरहित समाज निर्माण करणाऱ्या शिवाबद्दल भारतीय संस्कृतीत प्रचंड आदर आहे. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव भरतो. हे मंदिर खूप प्राचीन असून इ.स. चौथ्या, पावव्या शतकात मंदिराची स्थापना झाली असावी, असे मानले जाते.

लंकेचा राजा रावणाने कैलासपर्वतातून शिवलिंग आणून येथे ठेवले अशीही दंतकथा आहे. या ठिकाणी तमिळी भाषेतील अनेक प्राचीन ग्रंथ आहेत. हे मंदिर द्रविडी वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.

गोकर्ण महाबळेश्वरला कसे जाल ? How to go to Gokarna Mahabaleshwar?

* कोल्हापूरहून बेळगावी मार्गे गोकर्ण महाबळेश्वरला जाता येते. कोल्हापूर ते गोकर्ण महाबळेश्वर 319 किमी अंतर आहे.

बेळगावीहून गोकर्ण महाबळेश्वर 212 किमी अंतरावर आहे.

* गोव्याहून गोकर्ण महाबळेश्वर 183 किमी अंतरावर आहे.

* निपाणीहून गोकर्ण महाबळेश्वर 281 किमी अंतरावर आहे.

3. बिदर: Bidar :

बहमनशाहीचे संस्थापक हसन गंगू होय. पुढे कालानुसार बहमनशाही नष्ट होऊन नवीन छोट्या छोट्या शा‌ह्या निर्माण झाल्या. त्यांतीलच एक शाही म्हणजे बिदर शाही होय. या बिदरब‌द्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया –

बिदर हे ठिकाण सध्या कर्नाटकात आहे.

बिदरला कसे जाल? How to go to Bidar?

* लातूरहून बिदरला बसने जाता येते. लातूर ते बिदर अंतर 144 किलोमीटर आहे.

* सोलापूर ते बिदर अंतर 200 किलोमीटर आहे.

* निजामाबाद(तेलंगणा) ते बिदर अंतर 146 किलोमीटर आहे.

* तुम्ही हैद्राबादला (तेलंगणा) गेला असाल तर परतीच्या प्रवासात बिदरला जाता येते. हैद्राबाद से बिदर अंतर 142 किलोमीटर आहे.

* बिदरचा इतिहास आणि किल्ला: History and Fort of Bidar:

बिदर हा कर्नाटक राज्यातील जिल्हा असून बिदर हे जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय शहर आहे. बहमनी राज्यातील राजधानी पूर्वी गुलबर्गा होती.बहमनी वंशाचा राजा अल्ला उद्दीन बहमन याने इ.स 1427 मध्ये आपली राजधानी गुलबर्गाहून बिदरला आणली.बिदरचा किल्ला भुईकोट किल्ले प्रकारात येत असून हा किल्ला खूप मजबूत आणि सुरक्षित होता. आजही किल्ला सुस्थितीत असला तरी या किल्ल्याचा जीर्णोद्धार होणे आवश्यक आहे.

दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याने 1387 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून बिदरला आणली होती; पण ही राजधानी फार काळ टिकली नाही. बहमनशाहीचे विभाजन झाल्यावर बिदरला 1581 मध्ये बरीदशाहीची सत्ता प्रस्थापित झाली. इ.स. 1565 मध्ये बिदर विजयनगरच्या सत्तेत सामील झाले. 1620 च्या दरम्यान विजापूरच्या आदिलशाहने बिदर ताब्यात घेतले. इ.स. 1686 मध्ये बिदरचा किल्ला जिंकून औरंगजेबने बिदर मुघलशाहीत सामील करून घेतले.

4. गाणगापूर: Ganagapoor

गाणगापूर हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्हयातील अफजलपूर तालुक्यातील गाव असून ते दत्त मंदिरासाठी प्रसि‌द्ध आहे. गाणगापूर हे भीमा नदी आणि अमरजा नदीच्या संगमावर वसलेले गाव आहे. श्री दत्तात्रेयाचे दुसरे अवतार नरसिंह सरस्वती(सरस्वती महाराज स्वत: दत्तात्रेयाचे अवतार आहे, असे मानत)यांचे या गाणगापुरात काही काळ वास्तव्य होते.

गाणगापूरला तुम्ही कसे जाल ? How to go to Ganagapur?

* सोलापूरहून अक्कोलकोट मार्ग गाणगापूरला जाता येते. सोलापूर ते गाणगापूर अंतर 100 किलोमीटर आहे.

* अक्कलकोट पासून गाणगापूर अगदी जवळ असून अक्कलकोट ते गाणगापूर अंतर 74 किलोमीटर आहे.

* सातारा ते गाणगापूर अंतर 319 किलोमीटर आहे.

निपाणी ते गाणगापूर अंतर 277 किलोमीटर आहे.

दत्तात्रेय यांची वंशावळ

दत्तात्रेय या तत्त्वज्ञ ऋषींची वंशावळ थेट बळीराजाच्या वंशावळीशी संबंधित आहे. ती पुढीलप्रमाणे—-

हिण्यकशिपू

प्रल्हाद

——————————–

                         ↓                        ↓
……………………………  विरोचन             बळीराजा

कपिल मुनी


—————————        ————–
↓                                            ↓
अनसूया.                                अत्रि ऋषी
————————————–

दत्तात्रेय

वरील वंशावळ पाहता कपिलमुनी हे तत्त्वज्ञ होते. त्यांनी कर्मकांड, यज्ञयाग या गोष्टीला विरोध केला होता.पुनर्जन्म नाकारला होता. कपिल मुनींनी आदर्श आश्रमव्यवस्था मोडली होती. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि वानप्रस्थाश्रम ही मूळ कल्पना कपिल मुनींची; पण ही आदर्श कल्पना वैदिकांनी उचलली आणि आपल्या नावावर खपवली. बळीवंश आणि वैदिक यांचे शत्रुत्व पाहता कपिलमुनी आपल्या कन्येचा ब्राह्मणांशी विवाह लावून देणे अशक्य आहे. त्यामुळे अत्री ऋषीही ब्राह्मणेतर परंपरेतीलच आहेत. अत्री ऋषी आणि अनसूया यांचा पुत्र दत्तात्रेय (अत्री पासून प्रकटला) नाही.
चार्वाक परंपरेतील महान ऋषी होता.दत्तात्रेय यांनी मानवाच्या कल्याणासाठी भारतभ्रमंती केली. आयुष्यभर ब्रह्मचर्य व्रत स्वीकारून दार्शनिक तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला.विवेकशक्तीच्या द्वारे मानवी मूल्यांचे अर्थ लावणे हे दार्शनिक तत्त्वज्ञानाचे सार आहे. दार्शनिक तत्त्वज्ञानात स्वर्ग, नरक काल्पनिक देवदेवता, यज्ञयाग, कर्मकांड या गोष्टींना थारा नाही.

सध्या दत्तात्रेय यांना तीन तोंडे असलेल्या मूर्ती सगळीकडे पाहायला मिळतात. ही तीन तोंडे म्हणजे ब्रह‌मा विष्णू, महेश, दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतिकात्मक रूप मानले जाते. यावरून दत्तात्रेयांचे श्रेष्ठत्व कित्ती महान आहे, हे सिद्ध होते. भारतात दत्तसंप्रदाय हा एक वेगळाच संप्रदाय आजही कार्यरत आहे;पण अलीकडच्या संप्रदायात कर्मकांडाने उच्छाद मांडला आहे. दत्तात्रय यांचे मूळ तत्त्वज्ञान बाजूलाच राहिले आहे.

गाणगापूर येथील परिसर स्वच्छतेच्या बाबतीत मागे आहे. येथे स्वच्छता, टापटीपपणा खूप कमी आहे;पण कर्मकांडाला उधाण आले आहे. गाणगापूर येथे जाऊन दत्तात्रेयांचे आवश्य दर्शन घ्यावे आणि त्यांचे तत्त्वज्ञान आंगिकारावे हीच अपेक्षा.

Leave a comment