रायरेश्वर-Raireshwar

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या सीमारेषेवर वसलेले रायरेश्वर हे गिरिस्थान स्वराज्याच्या शपथेमुळे विशेष प्रसि‌द्ध आहे. रायरेश्वराच्या दक्षिणेला सातारा जिल्ह्याची हद्द लागते. Raireshwar आणि महाबळेश्वर यांच्या दरम्यान कृष्णा नदीचे खोरे आहे.येथे जवळच कृष्णा नदीचे उगमस्थान असल्याने कृष्णेचे बाळरूप आपल्याला पाहता येते.हे खोरे म्हणजे निसर्ग सौंद‌र्याने नटलेला स्वर्गच होय. याच खोऱ्यालगत असलेल्या रायरेश्वरबद्द‌ल आता आपण माहिती घेणार आहोत.

गिरिस्थानाचे नावः रायरेश्वर. थंड हवेचे ठिकाण.

समुद्रसपाटीपासून उंची सुमारे 1400 मीटर

ठिकाणाचा प्रकार : गिरिस्थान.

ठिकाण : रायरेश्वर, ता. भोर, जि. पुणे

डोंगररांग: महाबळेश्वर, सहयाद्री.

चढाईची श्रेणी: मध्यम.

पुण्याणसून अंतर : 95 किमी.

जवळचे ठिकाण : भोर, वाई.

सध्याची स्थितीः चांगली.

रायरेश्वराला कसे जाल ? How to go Raireshwar?

रायरेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्‌ध ठिकाण असून शिवरायांनी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा रायरेश्वराच्या मंदिरातच घेतली होती. त्यामुळे या ठिकाणाला खूप महत्त्व आहे.

रायरेश्वरला साताऱ्याहून वाईमार्गे जाता येते. सातारा ते वाई 30 किमी अंतर आहे आणि वाईहून रायरेश्वर 28 किमी अंतरावर आहे.

पुण्याहून भोर मार्गे रायरेश्वरला जाता येते. पुणे ते भोर 65 किमी अंतर आहे, तर भोरहून रायरेश्वर 29 किमी अंतरावर आहे. पुण्याहून वाईमार्गे रायरेश्वरला जाता येते पुणे ते वाई 65 किमी अंतर आहे. वाईहून रायरेस्वर 28 किलोमीटर अंतरावर आहे.

महाडहून बिरवाडी वरंढ, भोर मार्गे रायरेश्वराला जाता येते. हा प्रवास संपूर्ण, डोंगरी प्रवास असून महाड ते रायरेश्वर अंतर सुमारे 98 किलोमीटर आहे.

रायरेश्वरचा इतिहास: History of Raireshwar

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील क्रांतिकारी दिवस म्हणजे 27 एप्रिल 1645 होय. याच दिवशी शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली होती. बारा मावळ खोऱ्यातील सवंगडी हीच शिवरायांची ढाल होती. रायरेश्वराच्या परिसरातील निवडक सवंगड्यांसह शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरात गेले.यावेळी त्यांच्यासोबत बाजी पासलकर ,जिवा महाले, कान्होजी जेधे, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकडे, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर, बाजी मुद्‌गल इत्यादी तरुण मावळे शिवरायांच्या स्वराज्याला बळ देण्यासाठी साक्षीदार म्हणून रायरेश्वराच्या मंदिरात उपस्थित होते.

सर्व सवंगडी एकत्र जमा झाल्यावर शिवरायांनी आदिलशाही, मुघलशाही आणि निजामशाही या तिन्ही शाह्या मराठी मुलखात कशा धुमाकूळ घालतात, हे पटवून दिले.

“सवंगड्यांनो, किती दिवस परक्यांची चाकरी करायची ? आपण स्वतःचे राज्य म्हणजेच स्वराज्य निर्माण करायचे का? यासाठी जीवाची बाजी लावायला तयार आहात का? बोला, सवंगड्यांनो बोला”

असे शिवरायांनी तळमळीने स्वराज्याचे महत्त्व पटवून दिल्यावर आणि आवाहन केल्यानंतर सर्वांचे एका सुरात आणि जोशात उत्तर आले —

“होय राज, आम्ही स्वराज्यासाठी जिवाची बाजी लावायला तवार आहोत!”

शिवराय आणि सर्व सवंगड्यांच्या शरीरात स्वराज्याचे चैतन्य संचारले होते. शिवरायांनी तलवारीने करंगळीला कापून मंदिरातील शिवलिंगाला रक्ताचा अभिषेक घातला. पाठोपाठ सवंगड्यांनीही शिवरायांचे अनुकरण केले. सर्वांनी रायरेश्वराला स्मरुण स्वराज्याची शपथ घेतली. रायरेश्वराच्या परिसरात संपूर्ण वातावरण स्वराज्यमय झाले होते.शपथविधीचा कार्यक्रम झाल्यावर शिवरायांसह सर्व सवंगडी आपापल्या घरी गेलो.शिवराय महालात आले.शिवरायांनी घडलेला सर्व प्रसंग मासाहेबांना म्हणजे जिजामातेला सांगितला. जिजामातेला मनातल्या मनात खूप आनंद झाला होता. तिने शिवबाला शाबासकी दिली आणि मासाहेब म्हणाल्या –

“शिवबा, स्वराज्याची प्रतिज्ञा घेतलीस याचा आम्हाला अभिमानच आहे. ही प्रतिज्ञा सतत तुला आणि तुझ्या सवंगड्यांना प्रेरणा देत राहो, हाच तुला आशीर्वाद!!!”

शिवबाने मासाहेबांना दिलेल्या वचनाप्रमाणे स्वराजाची प्रतिज्ञा पूर्ण केली.पुढे सर्व शत्रूशी लढत लढत अखेर 6 जून 1674 रोजी शिवराय स्वराज्याचे छत्रपती झाले.

श्री रायरेश्वराचे म्हणजेच शंकराचे(शिवाचे) तीन खणांचे पूर्वाभिमुख देवालय आहे. गर्भगृहाच्या समोर सभामंडप आहे. सभामंडपाच्या भिंतीवर शके 1805 म्हणजे इ स 1883 सालचा एक शिलालेख आहे.तो असा—–

श्री शंकर रायरेश्वर दापधर मौजे राइर येथील समस्त पाटील भाऊपणी, यांचे वडील संकर लिंग यांनी पूर्वी शिवालय बांधले. त्यात सुमारे दोनशे वर्षे जालि. याचा जीर्णोद्धार ‌ हारी यांनी बांधिले. यास खर्च रुपये 700.

असा मजकूर या शिलालेखावर आहे.

म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे शपथ घेतल्यानंतर राईरच्या पाटलांनी दोन वेळा जीर्णोद्धार करून मंदिराचे अस्तित्व जतन करून ठेवले आहेत.

गडावरील प्रेक्षणीय स्थळे: Spectacular Places on Raireshwar.

सभोवार सुंदर निसर्ग, डोंगर द‌ऱ्यांनी खुललेले निसर्गाचे लेणे, तेथे सौद‌र्याला. काय उणे? असेच वातावरण रायरेश्वर परिसराचे आहे.

रायरेश्वर मंदिर:

छत्रपती शिवरायांनी ज्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली होती, ते मंदिर म्हणजे रायरेश्वर मंदिर होय.रायरेश्वर मंदिर आणि परिसर पाहायला सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे तीन महिने अगदी योग्य आहेत. या काळात निसर्गाने हिरवा शालू पांघरलेला असतो. त्यामुळे तेथील सौंदर्य अधिकच खुलून दिसते.

पाण्याचे टाके: Water tank

रायरेश्वर मंदिर परिसरात पाणी साठवण्याचे दगडी टाके आहे. हे टाके शिवकाळातील किंवा शिवपूर्व काळातील असावे असे वाटते. सध्या या टाक्याचा पाणी साठवण्यासाठी उपयोग केला जात नाही.

रंगीत माती: Colourful soil

रायरेश्वर परिसराचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या परिसरात हिरवी, निळी, जांभळी, तांबडी, पिवळी ,काळी अशा विविध प्रकारची रंगीत माती सापडते.

धबधबे: (Water falls)

पावसाळ्यात रायरेश्वर पाहायला आल्यास रायरेश्वर परिसरात अनेक लहानमोठे धबधबे पाहायला मिळतील. निसर्गाच्या आणि धबधब्यांच्या सहवासात रायरेश्वर पाहण्याचा आनंद लुटता येईल.

शिवकालीन तळे:

पावसाळयात किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात रायरेश्वर पाहायला आल्यास शिवकालीन तळे पाहण्याचा आनंद लुटता येईल.

राहण्याची सोय :

आपली ओळख असेल तर रायरेश्वर ठिकाणी नक्की एक दिवस मुक्काम करून थंडगार हवेचा आनंद घ्यावा.

आवर्जून वाचावे असे काही

  1. Pandavgad fort;सह्याद्रीच्या डोंगररांगांनी नटलेला आणि उद्भुत निसर्गसौंदर्य लाभलेला गड
  2. Sinhagad fort;पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा किल्ला
  3. Ajinkyatara fort;’सातारचा किल्ला’ म्हणून ओळखला जाणारा ‘अजिंक्यतारा गड’

 

 

Leave a comment