बाबर हा मुघलांचा संस्थापक होय. त्याला भारतातील मुघल साम्राज्याचे संस्थापक म्हणतात. बाबरचा मुलगा हुमायून. हुमायूनचा मुलगा अकबर. अकबरचा मुलगा जहांगीर, जहाँगीरचा मुलगा शाहजहान. आणि शाहजहानचा मुलगा औरंगजेब होय. मुघल साम्राज्यातील सम्राट अकबर हा सर्वोच्च लोकप्रिय सम्राट होय. त्याने कधीही भेदभाव केला नाही. बादशाह अकबरचा नातू शाहजहान हाही कल्पक बादशाह होता. आपल्या कारकीर्दीत ताजमहाल, लाल किल्ला यांची करून आपली कीर्ती अजरामर केली. त्याच शाहजहानने बांधलेले किल्ले ,वास्तू आजही सक्षम आहेत.
लाल किल्ल्याचा परिचय : Introduction to Red Fort
दिल्लीचा लाल किल्ला शाहजहान या कर्तबगार आणि कल्पक बादशाहने बांधला. त्याने 1639 रोजी लाल किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली. 6 एप्रिल 1648 रोजी किल्ला बांधून पूर्ण केला. हा किल्ला बांधून पूर्ण करण्यास सुमारे अकरा वर्षे लागली. ताजमहाल ज्याने बांधला त्या वास्तुविशारदने म्हणजे अहमद लाहोरी यानेच किल्ल्याचे डिझाईन बनवून किल्ला बांधण्याचे काम केले. हा लाल किल्ला पूर्णतः लाल दगडाचा वापर करून बांधला. या लाल दगडांना लाल संगमरवर असे म्हणतात. इंडो-इस्लामी पद्धतीचे असलेला हा किल्ला असून लाल किल्ला या भारताच्या सांस्कृतिक वारस्याचे जतन करणे हे
प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी भारताचे विद्यमान पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भारताचा तिरंगा फडकवतात. याच लाल किल्ल्यावरून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रथमच तिरंगा फडकवला. संपूर्ण भारताचे नागरिक हा क्षण कधीच विसरणार नाहीत.
लाल किल्ल्याचा इतिहास: History of Red Fort
मोगल बादशाह शाहजहान याने अनेक वास्तू उभारल्या. यातीलच एक उत्तम वास्तू म्हणजे लाल किल्ला होय. ऐतिहासिक परंपरेचा मोठा वारसा असलेला हा लाल किल्ला जतन करून ठेवला आहे.
इ.स. 1638 साली मे महिन्यात लाल किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाली.एप्रिल 1648 रोजी हा किल्ला बांधून पूर्ण केला. त्यानंतर 1658 पर्यंत शाहजहानने लाल किल्ल्यातून दिल्लीचा कारभार केला. 1658 साली त्याचा पुत्र औरंगजेब याने शाहजहानकर आक्रमण करून त्याला कैद केले.
शाहजहानने लाल किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपली राजधानीत आग्र्याहून दिल्लीत लाल किल्ल्यात आणली होती आणि लाल किल्ल्यातून राजकारभाराला सुरुवात केली होती; पण दहा वर्षातच शाहजहानला आग्र्याला जावे लागले. तेही बंदी बनून.
शाहजहानला आग्र्यातच खिचपत पडावे लागले. आणि तेथेच त्यांचा इ.स 1666 साली मृत्यू झाला.
इ.स. 1658 साली औरंगजेब दिल्लीच्या गादीवर आरुढ आला आणि लाल किल्ल्यावरून आपला राज्यकारभाराला सुरू केला. औरंगजेब 1658 ते 1707 असा 49 वर्षे दिल्लीचा बादशाह म्हणून गादीवर बसला तरी त्याला 27 वर्षे मराठ्यांशी संघर्ष करण्यात घालवावी लागली.म्हणजे औरंगजेबने 22 वर्षे दिल्लीच्या लाल किल्ल्यातून राज्यकार केला. उरलेली 27 वर्षे मराठ्यांशी संघर्ष करण्यात घालवूनही मराठ्यांचे राज्य नेस्तनाबूत करता आले नाही.उलट नैराश्यातून त्याला याच मातीत मृत्यू आला आणि महाराष्ट्राच्या भूमीतच दफन खुलताबाद येथे दफन करण्यात आले. औरंगजेबाची समाधी खुलताबाद येथे आहे. खुलताबाद हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येते.
औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला उतरती कळा आली. औरंगजेब नंतर एकही मुघल सम्राट कर्तबगार निघाला नाही.एक वेळ अशी आली की मराठ्यांचा कर्तबगार सरदार महादजी शिंदे याने दिल्लीच्या बादशाहला गादीवर बसवले होते. अर्थात बादशाह नाममात्र सम्राट होता आणि सर्व सत्ता महादजीच्या हातात होती.लाल किल्ल्यावर मराठ्यांचे अप्रत्यक्ष राज्य होते. इ.स. 171 साली शाह आलमला गादीवर बसवून महादजीने स्वतःकडे वकील-इ- मुतलक हे पद ठेवून दिल्लीच्या गादीवर आणि लालकिल्ल्यावर आपला अंकुश ठेवत दिल्लीचा कारभार केला.
महादजी शिंदे महाराष्ट्रात आल्यावर शिखांनी 11 मार्च 1783 मध्ये लाल किल्ल्यामध्ये मध्ये प्रवेश केला आणि किल्ला ताब्यात घेतला होता.
1857 च्या उठावात चहुबाजूने इंग्रजांविरुद्ध उठाव झाला ; पण सुसूत्रतेच्या अभावानेच 1857 चा उठाव अयशस्वी ठरला. 14 सप्टेंबर 1857 रोजी इंग्रजांनी दिल्ली काबीज केली. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रथमच इंग्रजांचा ध्वज फडकला. तेथून पुढे बरीच वर्षे लाल किल्ला इंग्रजांनी लष्करी तळासाठी वापरला होता.
भारत स्वतंत्र साल्यावरही काही काळ भारताचा लाल किल्ल्यावर लष्करी तळ होता. या किल्ल्यावर भारतीयांचा तिरंगा पंडिता नेहरूंनी 15 ऑगस्ट 1947 रोजी फडकावला. ही परंपरा कायम राहिली. दर वर्षी स्वातंत्र्य दिनी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावतात.
लालकिल्ला रचना :Structure of Led Fort
लाल किल्ल्याची रचना करताना उस्ताद अहमद लाहोरी याच्यावर इंडो इस्लामिक वास्तुकलेचा प्रभाव पडलेला दिसतोय.
लाल किल्ल्यातून डोकावून पाहिले तर आतील नक्करखाना, दीवान-ए-आम,जनानखाना, दिवान-ए-खास नहर-ए-बहिश्र, मोती मशिद, हयात बख्श बाग या सर्व विभागांची आपल्याला कल्पना येते. हा किल्ला 250 एकरात पसरलेला आहे. या किल्ल्याच्या तटबंदीची भिंत ही 16 मीटर उंच आहे.तर शहराच्या बाजूला 35 मीटर उंची आहे. यावरून किल्ल्याची भव्यता लक्षात ठेवा.
किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार (लाहोरी गेट) आहे. या प्रवेशाद्वाराला वास्तुविशारद अहमद लाहोरीचे नाव दिले आहे. किल्ल्यातील दिवान-ए-आम, रंग महाल, (जनानखाना) दिवाण-ए-खास यांच्या कलाकृती अप्रतिम आणि नेत्रदीपक आहेत.
जागतिक वारसा स्मारक:लाल किल्ला.World Heritage Monument, Red Fort
युनेस्को (UNESCO) ने इ.स. 2007 मध्ये लाल किल्ला हा जागतिक वारसा म्हणून संरक्षित करण्यात आला. त्यामुळे लाल किल्ल्याचे महत्त्व अधोरेखित झाले.