भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. या दिवसापासून भारतात पारतंत्र्य नष्ट होऊन भारतीय जनता स्वतंत्र झाली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु झाले. पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद झाले. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरु झाला आणि भारतात लोकशाही प्रजासत्ताक गणराज्य सुरु झाले. भारताचे राष्ट्रपती हे सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख असतात. राष्ट्रपती राष्ट्रपतीभवनात राहतात. याच राष्ट्रपतीभवनाची आपण माहिती घेणार आहोत.
राष्ट्रपती भवन कोठे आहे? Where is Rashtrapati Bhavan?
भारताचे राष्ट्रपतीभवन नवी दिल्लीत राजपथच्या पश्चिमेस आहे. येथेच भारताचे राष्ट्रपती राहतात.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून राष्ट्रपतीभवन 13 किलोमीटरवर आहे.
* ‘द अशोक’ या 5 stars Hotel पासून अवघ्या 3.6 किलोमीटर अंतरावर राष्ट्रपती भवन आहे.
* महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथून 4.00 किलोमीटर अंतरावर राष्ट्रपतीभवन आहे.
* दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ल्यापासून 7.2 किलोमीटर अंतरावर आहे.
* नवीन संसदभवन या वास्तूपासून राष्ट्रपतीभवन केवळ 1.6 किलोमीटर अंतरावर आहे.
राष्ट्रपती भवनला कसे जायचे ? How to go to Rashtrapati bhavan?
राष्ट्रपती भवनला जाण्यासाठी आपल्याला एक तर परवानगी पाहिजे किंवा राष्ट्रपती भवनातून तुम्हाला निमंत्रण आले पाहिजे. तुमच्याजवळ परवानगी किंवा निमंत्रणपत्र असेल तर तुम्ही राष्ट्रपती भवनात जाऊ शकता. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान दरवर्षी 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत सर्वांसाठी खुले असते. 5 सप्टेंबर या शिक्षकदिनी राष्ट्रपती भवन सर्व राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित शिक्षकांसाठी खुले असते. त्यांना कोणत्याही परवानगीची गरज नसते. भारत सरकार स्वतःहून शिक्षकांना राष्ट्रपती भवनात घेऊन जाते. येथे शिक्षकांना मेजवानी दिली जाते. या मेजवानीला राष्ट्रपती हजर असतात. येथील सर्व प्रकारच्या इमारती पाहण्यास शिक्षकांना परवानगी असते ते राष्ट्रपती भवनाचे मेहमानच असतात. 5 सप्टेंबर 2016 या दिवशी आम्हाला राष्ट्रपती भवनात मेजवानी करण्याचा योग आला. कारण आम्ही तेथे राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित म्हणून तेथे गेलो होतो. त्यावेळी भारताचे राष्ट्रपती प्राणव मुखर्जी होते.
राष्ट्रपती भवन रचना व बांधकाम : Design and Construction of Rashtrapati bhavan:-
ब्रिटीश सरकारने भारतात आपले बस्तान सर्वप्रथम बंगालमध्ये बसवले होते. त्यामुळे बंगाल हेच त्यांचे सत्ताकेंद्र होते. कोलकाता ही त्यांची राजधानी होती. 1911 साली ब्रिटिशांनी राजधानी दिल्लीला हलवण्याच्या हालचाली सुरु केल्या. 1912 साली सध्या अस्तित्वात असलेल्या राष्ट्रपती भवनाचे बंधकाम सुरु झाले. ही इमारत 1929 साली पूर्ण झाली आणि 1931 साली तिचे उद्घाटन झाले. या इमारतीचे चार मजले असून एकूण वेगवेगळ्या
आकाराच्या 340 खोल्या आहेत. सुमारे दोन लाख चौरस फूट क्षेत्रात ही इमारत वसलेली आहे. इंग्रज वास्तुविशारद एडविन लुटएन्स हा कल्पक होता. त्याने या इमारतीचे डिझाइन बनवून बांधकाम करून घेतले. ल्युटेन्सने इमारत बांधताना इंडो-सारोसेनिक नक्षी वापरून इमारत भारतीय शैलीची बांधली गेली.
1931 पासून या इमारतीत व्हॉईसरॉय राहत होते. म्हणून या इमारतीला व्हॉईसरॉय हाऊस असे नाव दिले होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर व्हॉईसरॉयची जागा राष्ट्रपतींनी घेतली. स्वतंत्र भारतात या इमारतीला राष्ट्रपतीभवन असे नाव दिले .1950 पासून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद या इमारतीत (राष्ट्रपती भवनात) राहू लागले.
अमृत उद्यान [मुघल गार्डन]: राष्ट्रपती भवन: Amrut Udyan /Mughal Garden: Rashtrapati bhavan:
जगातील सर्व प्रकारची फुले या अमृत उद्यानात पाहायला मिळतात. यापूर्वी अमृत उद्यानाचे नाव मुघल गार्डन असे होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या उद्यानाचे नामकरण अमृत उद्यान असे करण्यात आले. ब्रिटिश वास्तुविशारद एडविन लुटियन्स याने या बागेची रचना केली होती .ही बाग जवळजवळ 13 एकरात पसरलेली आहे. उद्यानाचे चार भागात विभाजन झाले असून ही बाग पाहताना आमचे डोळे दिपून गेले होते. आमच्या बरोबर आलेला गाईड आम्हाला बागेची इथ्यंभूत माहिती देत होता. पर्ल गार्डन’, बटरफ्लाय गार्डन, सकरुलर गार्डन, गुलाब गार्डन असे ते विभाग आहेत. 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर आणि फेब्रुवारी- मार्च महिन्यात मुघल गार्डन बघण्यासाठी खुली असते. त्यावेळी हजारो लोक मुघल गार्डनला म्हणजेच आताच्या अमृत उद्यानाला भेट देतात. आम्ही भेट दिली. तुम्ही सुद्धा भेट द्या.
राष्ट्रपती निवासस्थान, Presidential Residence:
राष्ट्रपतीचे निवासस्थान हे राष्ट्रपती भवनातील सर्वांत महत्त्वाचे दालन असून या निवासस्थानाकडे जाण्यास परवानगी नाही. या निवासस्थानासमोर सुंदर कारंजे बसवले असून त्याला रंगीबेरंगी रोषणाईची जोड दिलेली आहे. राष्ट्रपती भवनातील सर्वात महत्त्वाचे आणि गोपनीय दालन असल्याने या दालनापुढे अर्थात संपूर्ण राष्ट्रपती भवनात कडक सुरक्षाव्यवस्था असते.
राष्ट्रपती निवासस्थानाकडे आम्ही गेलोच नाही. येथे जायला परवानगी नाही. पण इतरत्र फिरताना आमची कुठेही तपासणी केली नाही. राष्ट्रीय पुरस्कार शिक्षकांना दिलेला हा सन्मान आहे.
अतिथी भोजन कक्षः राष्ट्रपती भवन Quest dining Hall:
राष्ट्रपती भवनात 50 ते 100 अतिथीचे भोजन असते किंवा त्याहीपेक्षा अधिक संख्या असते त्यावेळी एका वेगळ्या दालनात dining system केलेली असते. आम्हालाही राष्ट्रपती भवनात एका दालनात भोजनाची व्यवस्था केली होती .या दालनात भिंतीवर आतापर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींचे पूर्ण उभे फोटो जागोजागी लावलेले होते. आम्हाला राष्ट्रपती भवनात भोजनाचा सपत्नीक लाभ मिळाला. अशा जेवणासाठी राष्ट्रपती आपली उपस्थिती लावतात.
याशिवाय कॉरिडॉर, कोर्ट, गॅलरी, पॅन ट्राय, आर्ट गॅलरी अशी कितीतरी दालने आहेत. त्याची मोजदाद करता येणार नाही.