बिर्ला मंदिर/ Birla Mandir

भारतातील वेगवेगळ्या शह‌रांत 30 हून अधिक Birla Mandir उभार‌ण्याचे काम बिर्ला कुटुंबातील व्यक्तींनी केले आहे. बिर्ला मंदिरच्या पहिल्या लेखात आपण दिल्ली हैद्राबाद, गोवा, उन्हासनगर (राहाड) इत्यादी ठिकाणी असलेल्या बिर्ला मंदिरांची ओळख करून घेतली आहे. आता आपण आणखी काही बिर्ला मंदिरांचा परिचय करून घेणार आहोत. 1939 पासून बिर्ला कुटुंबाकडून विविध बिर्ला मंदिरे उभारण्याचे काम चालू आहे. भविष्यात बिर्ला कुटुंबाने भारतातील प्राथमिक शाळा सक्षम करण्यासाठी आणि त्यांना भौतिक सुविधा देण्यासाठी पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे.

1. बिर्ला मंदिर कोलकाता: Birla Mandir, Kolkata

भारताच्या आग्नेय दिशेला असलेल्या पश्चिम बंगाल राज्यात कोलकाता गजबजलेल्या शहरात बिर्ला मंदिर आहे. हे बिर्ला मंदिर लक्ष्मी-नारायण मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. दक्षिण कोलकाता शहरात आशुतोष चौधरी रोडवर बालीगंज या ठिकाणी हे बिर्ला मंदिर बांधलेले आहे.

कोलकाता येथील बिर्ला मंदिर बांधण्यास 1970 साली सुरुवात साली,.हे मंदिर पूर्ण करण्यास तब्बल 26 वर्षे लागली. 1996 साली हे मंदिर बांधून पूर्ण झाले आणि सर्वासाठी खुले झाले. बिर्ला समुहाने बांधलेल्या मंदिरांपैकी सर्वांत जास्त कालावधी लागलेले मंदिर म्हणजे कोलकाता येथील बिर्ला मंदिर होय

भारतीय मध्ययुगीन स्थापत्य शैली आणि आधुनिक स्थापत्य शैली यांच्या मिलापातून या बिर्ला मंदिराची निर्मिती झाली बसून कोलकाता शहरातील एक देखणे आणि सुंदर कलाकृती असलेले मंदिर अशी या बिर्ला मंदिराची ओळख आहे. सध्या हे मंदिर ब्राह्मण समाजाच्या अधिपत्याखाली आहे.

भुवनेश्वर बेधील लिंगराज मंदिराशी मिळतेजुळते असलेले हे मंदिर सुमारे 3000 चौरस मीटर क्षेत्रात विस्तारलेले आाहे. या मंदिराच्या कळसापर्यतची उंची 160 फूट असून शुभ्र संगमरवर, वाळू आणि सिमेंट यांचा वापर करून हे मंदिर बांधलेले आहे.

मुख्य मंदिरात राधाकृष्ण यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. येथेच दुर्गादेवीचे मंदिर पण आहे. या मंदिरात दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीला मोठा उत्सव असतो.

2. बिर्ला मंदिर, जयपुर Birla Mandir, Jaypur..

राज्यस्थान राज्याची राजधानी असलेल्या जयपूर या शहराची ओळख गुलाबी शहर [Pink city] अशी आहे. या शहरातील घरांचा, बंगल्यांचा, मोठमोठ्या इ‌मारतींचा रंग गुलाबी आहे. या गुलाबी शहरात शुभ्र पांढऱ्या संगमरवरी द‌गडात बांधलेले बिर्ला मंदिर उठून दिसते.

जयपूरमधील टिळक नगरातील जवाहरलाल नेहरु मार्गावर बिर्ला मंदिर आहे. हे मंदिर लक्ष्मी-नारायणाचे -असून दरवर्षी मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी, दिवाळी हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात, बी. एम. बिर्ला फौंडेशनने या मंदिराची स्थापना म्हणजे पायाभरणी 1977 साली केली. 11 वर्षात म्हणजे 1988 साली मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. आधुनिक आणि मध्ययुगीन वास्तुशैलीचा प्रभाव हे बिर्ला मंद्रि बांधताना पडला आहे.बिर्ला परिवारातील घनश्याम बिर्ला आणि रामानुज दास यांच्या अनुमतीने आणि कल्पनेने साकारलेले हे मंदिर 22 फेब्रुवारी 1988 रोजी सर्वांसाठी खुले झाले.

मंदिराच्या मंडपात मंदिराकडे तोंड करून रुक्मिणी बिर्ला आणि घनस्याम बिर्ला यांचे पुतळे आहेत. ते हात जोडून नमस्कार करत आहेत.

3. बिर्ला मंदिर भोपाळ : Birla Mandir, Bhopal

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ आहे. या भोपाळ शहरातील मालवीय नगर परिसरातील अरेरा डांगरावर बिर्ला मंदिर बांधलेले आहे. या मंदिराच्या जवळच लोअर सरोबर आहे. बिर्ला संग्रहालय आहे. मोती मशिद आहे.

इ.स 1960 बी डी बिर्ला यांच्या कल्पनेतून अरेरा टेकडीवर बिर्ला मंदिर बांधायला सुरुवात केली. या मंदिराचा शिलान्यास मध्यप्रदे‌शचे तत्कालीन मुख्यमंत्री कैलासनाथ काटजू यांच्या हस्ते झाला. हे मंदिर चार वर्षातच पूर्ण झाले 1964 साली तत्कालीन मुख्यमंत्री द्वारका प्रसाद मिश्र यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन झाले. 1964 सालापासून हे बिर्ला मंदिर सर्वासाठी खुले झाले. मध्यप्रदेशातील भोपाळ या राजधानीच्या शहरात असलेले हे बिर्ला मंदिर लक्ष्मी नारायण मंदिर म्हणून ओळखले जाते.

भोपाळच्या अरेरा हिलच्या परिसरात आठ एकर जागेत हे मंदिर आहे. मंदि‌राच्या रचनेत आणि कलाकुसरीत स्थानिक राजस्थानी संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. मंदिर आणि परिसर शांततामय, स्वच्छ आहे.मंदिरात लक्ष्मी-नारायण यांच्या मूर्ती आहेत.एका बाजूला शिव आणि दुस‌ऱ्या बाजूला पार्वतीची (जगदंबा) मूर्ती आहे.

भोपाळमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत.त्यांत इंदिरा गांधी राष्ट्रीय संग्रहालय, पुरातत्वीय संग्रहालय, मोती मशिद, भारत भवन यांचा समावेश आहे.

4. बिर्ला मंदिर, अलिबाग: Birla Mandir, Alibag.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात साळव गाव आहे .या गावात गणेश बिर्ला मंदिर आहे. अलिबाग पासून 22 किलो मीटर अंतरावर आहे. येथून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर फणसाड अभयारण्य आहे. तुम्ही रोहा मार्गे बिर्ला मंदिर पाहायला गेल्यास रोहापासून 34 किलोमीटर पश्चिमेला जावे लागते. साळव गावात गणेश बिर्ला मंदिर आहे. आणि पुढे काही अंतरावर समुद्र‌काठाला गणपती मंदिर आहे. संगमरवरी द‌गडात बांधलेल्या या गणेश बिर्ला मंदिराला आवश्य भेट दया.

5. बिर्ला गणपती मंदिर: Birla Ganapati Mandir Chinchwad.

पुण्याहून 30 किलोमीटर अंतरावर पिंपरी-चिंचवड महानगराच्या हद्दीत एका उंच डोंगरावर बिर्ला गणपती मंदिर आहे. मंदिराच्या पायथ्याशी तुम्ही गेलात की तेथून 179 पायऱ्या चढून मंदिराकडे जाता येते.

येथे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येते की एका भव्य चबुतऱ्यावर गणपती बसलेला आहे. मोकळ्या आकाशात हा गणपती उघड्यावर आहे. हा गणपती 54 फूट उंचीचा असून त्याचे वजन 1 मेट्रिक टन आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची निर्मिती व्यावसायिक दृष्टिकोनातून केलेली नसून पर्यटकांसाठी मनःशांतीचे आणि आपण मोकळा श्वास घेण्यासाठी हे उघड्यावरचे मंदिर खूप सौंद‌र्य संपन्न परिसरात आहे. आजुबाजूचा परिसर रोमांचक आहे.

बिर्ला उद्योग समुहाने माथुरामजी वर्मा व त्यांचा पुत्र या दोघांना (राजस्थान) मूर्ती बनवण्याचे काम दिले होते. वसंत बिर्ला आणि सरला बिर्ला यांच्या कल्पनेतील हे मंदिर साकारलेले आहे. ही गणपतीची मूर्ती लोखंड, खडी, सिमेंट यांच्या मिश्रणातून बनवलेली असून मूर्तीवर तांब्याचा थर दिलेला आहे. जानेवारी 2009 पासून हे मंदिर सर्वांसाठी खुले झाले आहे.

1 thought on “बिर्ला मंदिर/ Birla Mandir”

  1. जून्या काळात सत्ताधिशांनी, राज घराण्याने मंदिरांची निर्मिती केल्याचे वाचले आधुनिक काळात बिर्लानिही भव्य मंदिर निर्मानाचे काम केले आहे नविन माहिती मिळाली.

    Reply

Leave a comment