जम्मू-काश्मीर म्हणजे भारतातील पृथ्वीवरील स्वर्ग मानला जातो. प्रचंड निसर्ग सौदर्य, सूचिपर्णी वृक्षांची मांदियाळी, सफरचंदांच्या बागा, मऊमऊ ऊबदार स्वेटर्सची दुकाने आणि हिमालयाच्या बर्फाच्छादित स्वर्गीय सुख देणाऱ्या पर्वतरांगा! हे सारे वैभव जम्मू-काश्मीर आणि हिमालयात पाहताना अमरनाथची यात्रा करताना अनुभवता येते. आता आपण या स्वर्गीय सौंदर्य असलेल्या अमरनाथची माहिती घेणार आहोत.
ठिकाणाचे नाव: अमरनाथ
ठिकाणाचा प्रकार: तीर्थक्षेत्र, पर्यटन क्षेत्र.
पर्वत रांग : हिमालय
जवळचे ठिकाण : चंदनवाडी
जिल्हा : अनंतनाग
राज्य : जम्मू-काश्मीर
समुद्र सपाटीपासून ऊंची :3963मी. (13000 फूट)
चढाईची श्रेणी : अवघड
श्रीनगर पासून अंतर: 180 किमी.
अमरनाथला कसे जाल? How to go to see Amarnath?
* जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध शहर श्रीनगर या ठिकाणापासून अमरनाथ गुला 130 किलोमीटर अंतरावर आहे.
* काश्मीर या जम्मू-काश्मीरच्या राजधानीपासून अमरनाथ गुहा 472 किलोमीटर अंतरावर आहे.
* जम्मू या जम्मू-काश्मीरच्या दुसऱ्या राजधानीच्या शहरापासून अमरनाथ गुहा 270 किलोमीटर अंतरावर आहे.
* अनंतनाग या ठिकाणापासून अमरनाथची गुहा सुमारे 87 किलोमीटर अंतरावर आहे.
* चंदनवाडी हे अमरनाथ गुहेच्या जवळचे ठिकाण होय. या ठिकाणाहून अमरनाथ गुहा 31 किलोमीटर आहे.
* चंद्रनवाडी कँपपासून जोजिबाल, शेषनाग सरोवर, शेषनाग बेस कॅम्प, तांगो टॉप, श्री शिव सेवक, पंजतर्णी कॅम्प, पंचतर्णी, संग्राम पॉईंट आणि अमरनाथ गुहा असा प्रवास करावा लागतो.
दिल्ली ते जम्मू प्रवास: Travel From Delhi to Jammu.
तुम्ही अमरनाथ यात्रेला एखाद्या ट्रॅव्हल्स कंपनीतर्फे जात असाल, तर तुमचा प्रवास कसा करायचा हे अगोदरच ठरलेले असते. तुम्ही स्वतःही आठ ते दहा लोकांचा ग्रुप करुन अमरनाथ यात्रेला जाऊ शकता. मोठ्या कँपसमधून तुम्ही जात असाल ,तर तुम्हाला अधिक वेळ लागू शकतो. म्हणून तुम्ही छोटा कॅम्पस करून म्हणजे आठ ते दहा लोकांचा ग्रुप करून प्रवास करणे कधीही अधिक सोयीचे असते.
तुम्ही दिल्लीला विमानाने किंवा रेल्वेने पोहोचला असाल ,तर दिल्ली ते जम्मू सुमारे 414 किमीचा प्रवास रल्वेने करणे अधिक सोयीचे होईल. हा रेल्वेचा प्रवास सुमारे 12 तासांचा आहे.
तुमची विमानाने जायची तयारी असेल आणि खराब हवामान नसेल तर दिल्ली से जम्मू तुम्ही विमानाने जाऊ शकता. त्यामुळे तुमचा वेळ वाचतो. तुम्ही पुढील प्रवासासाठी ताजेतवाने राहू शकता.
जम्मू ते पहलगाम कसे जाल ? How to Travel From Jammu to Pahalgam?
जम्मूला पोहोचल्यानंतर अमरनाथ यात्रेसाठी पहलगामला जाणे आवश्यक आहे. जम्मू ते पहलगाम हे अंतर 254 किलोमीटर आहे. सुमारे 7 ते 8 तासांचा प्रवास बसने किंवा टॅक्सीने करता येतो. ट्रॅवल बस किंवा टॅक्सी भाड्याने ठरवली इतर ठिकाणच्या प्रवासापेक्षा येथून पुढचा प्रवास थोडा महागडा लागतो. टॅक्सी प्रवास 2500 ते 4000 रुपये म्हणजे प्रति प्रवासी 400 ते 800 रु भाडे मोजावे लागते. रस्ता खराब झाला असेल तर निर्धारित दिलेल्या वेळेपेक्षा 1 ते 2 तास अधिक वेळ लागू शकतो.पहलगाम येथे काही वेळ विश्रांती घेऊन नाष्टा, जेवण, चहापान करून पुढल्या प्रवासाला जाता येते . पहलगामला सायंकाळी सहा ते रात्री आठपर्यंत पोहोचला असाल तर तेथे तुम्ही मुक्काम करून दुसर्या दिवशी पुढच्या प्रवासाला म्हणजे पहलगाम ते चंदनवाडी या प्रवासाला निघता येते. सकाळी जेवढे लवकर निघाल, तेवढा पुढचा प्रवास सुखाचा होईल.
पहलगाम ते चंदनवाडी प्रवास: How to Travel From Pahalgam to Chandanwadi?
पहलगाम ते चंदनवाडी हा प्रवास केवळ 16 किलोमीटरचा आहे. येथून पुढे डोळे उघडे ठेवून प्रवास केला तर प्रवासाचा आनंद घेता येईल. हिमालयाच्या सुंदर पर्वतरांगांचे दृश्य आपण केवळ टॅक्सीतून न पाहता मध्ये मध्ये थांबून फोटो काढून घेतले आणि थोडे व्हिडिओ बनवत गेलो, तर या प्रवासाच्या स्मृती दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहतील. अधेमध्ये बर्फाचा नजारा, सूचिपर्णी वृक्षांचे विलोभनीय दृश्य कॅमेरात टिपून ठेवता येते. वाटेत बेताब व्हॅली पाहायला विसरु नका. या ठिकाणी ‘बेताब’ सिनेमाचे शुटींग झाले होते. म्हणून या ठिकाणाला बेताब व्हॅली असे नाव पडले. पहलगाम येथे मुक्काम करण्यासाठी 1200 ते 1500 रु. ला भाड्याने रूम मिळते.
चंदनवाडी ते अमरनाथ गुहा प्रवास. How to Travel From Chandanwadi to Amarnath cave?
चंदनवाडी ते अमरनाथ केव्ह अंतर 31 किलोमीटर आहे. हे अंतर म्हणजे अमरनाथचा खडतर प्रवास होय. येथून पुढे आपल्याला संपूर्ण प्रवास पायी किंवा घोड्यावरून किंवा खेचरावरून करावा लागतो. आपण समुद्र सपाटीपासून सुमारे 4000 मीटर उंचीवर जात आहोत. आपण जसजसे उंचावर जाऊ तसतसा हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत जातो. त्यामुळे काही अंतर गेल्यावर लगेच थकवा लागतो. तेथील वातावरण सूट व्हायला आपल्याला वेळ लागतो; पण प्रवास खूपच आनंदमय आणि निसर्गरम्य वातावरणातून होत असल्याने या प्रवासातील अविस्मरणीय क्षण आपण कधीच विसरु शकत नाही.
पहिला टप्पा: चंदनवाडी ते शेषनाग: Step No1: From Chandanwadi to Sheshnag
चंदनवाडी ते शेषनाग हा अमरनाथ यात्रेचा पहिला टप्पा आहे. चंदनवाडी गावातून बाहेर पडताच पहिला चेक पॉईंट लागतो. येथे तपासणी होते आणि पुढे जायचे .पुन्हा एक तपासणी नाका लागतो तेथेही तपासणी झाल्यानंतर पुढे चालत किंवा घोडा घेऊन आपण जाऊ शकतो. हा रस्ता चालत असताना कष्ट होत असले तरी निसर्गाचे स्वर्गीय नजारे पाहून मन बहरून जाते. वाटेत जागोजागी स्टॉल लागलेले असतात. भूक लागल्यावर येथे पैसे देऊन आवडीचे पदार्थ खाऊ शकतो.
पुढे जाता जाताआपणाला खळखळ वाहणारे शुभ्र आणि शुद्ध पाण्याचे धबधबे पाहायला मिळतात. चंदनवाडी ने शेषनाग सरोवर पर्वत तीन धबधबे लागतात. अनेक ठिकाणी रस्ते एकदम खडे लागतात. अनेक ठिकाणी सुरक्षित बार लावलेले आहेत. वाटेत तुम्ही दमला असाल तर टेंट लावलेले असतात. तेथे तुम्ही सुरक्षित मुक्काम करू शकता. चंदनवाडी ते शेषनाग अंतर 12 किलोमीटर आहे. शेषनाग येथे मुक्काम करणे अधिक सोयीचे असते. येथे भरपूर टेंट आहेत.
शेषनागपर्यंत काही जण हेलिकॉप्टरने पण येतात. फक्त खिसा गरम पाहिजे.
टप्पा क्रमांक 2: शेषनाग ते पंचतरणी. Sheshnag to Panchtarani
शेषनाग ते पंचतरणी अंतर 14 किलोमीटर आहे. शेषनागहून सकाळी लवकर निघता येईल तेवढे लवकर निघालेले अधिक चांगले. अनेक प्रवासी चालत जातात. येथून पुढचा प्रवास खडतर आहे. खडा चढ, निमुळती वाट, प्रचंड दमछाक होत असताना निसर्गाचा अतुलनीय नजारा पाहायला विसरायचे नाही. अनेक ठिकाणी बर्फाचे पाणी झालेले ओढे वाहत असतात.वाटेल थांबत थांबत जावे लागते. मधेच घनदाट धुके, बोचरी थंडी जाणवते. एवढे चालत असताना सुद्धा हातपाय गारठतात. अधेमध्ये टेंट असतात. खाण्यापिण्याची सोय असते. तुम्ही लवकर पंचतरणीला निघाला असेल तर तेथील नजारा पाहायला मिळतो. येथे पंचतरणीला पोहोचल्यावर भरपूर टेंट पाहायला मिळतात. येथे येईपर्यंत रात्र होत असते. त्यामुळे पंचतरणीला मुक्काम करावा लागतो.
टप्पा क्रमांक 3: पंचतरणी ते अमरनाथ गुहा :Step No:3: From Panchtarani to Amarnath cave
पंचतरणी कॅम्पवर पोचल्यावर तेथून पुढे अमरनाथ गुहा केवळ सहा किलोमीटर आहे. येथून पुढे खडे चढ लागतात. आजूबाजूचे निसर्गाचे दृश्य अत्यंत रमणीय आणि नयनरम्य आहे. डोंगरकपारीचा मार्ग ओलांडत जावे लागते.उंच उंच डोगर आणि निमुळते रस्ते पाहताना निश्चितच हृदयाचे ठोके चुकतात.
सहा किलोमीटर पायी किंवा घोड्याने जाणाऱ्यांसाठी येथे मोठ्या प्रमाणात तंबू आहेत. येथे गुहेजवळ पोहोचल्यावर तंबू, दिसतात. शॉप्स दिसतात.येथे कॅम्पवर पोहोचल्यावर आपल्याला आता अमरनाथ गुहा पाहायला जायचे आहे.
अमरनाथ गुहा: Amarnath Cave
अमरनाथ गुहा ही शिव काळात म्हणजे सुमारे 10000 वर्षापूर्वी निर्माण केलेली असावी असे मानले जाते. या गुहेत नैसर्गिकरीत्या कित्येक वर्षांपासून शिवलिंग तयार होते. आषाढ पौर्णिमेनंतर दरवर्षी अमरनाथ यात्रा सुरु होते. या ठिकाणी भगवान शिवने कदाचित तपश्चर्या केलेली असेल किंवा बर्फाचा आकार शिवलिंगाशी मिळताजुळता असल्यानेच या ठिकाणाला शिवलिंग गुफा असे नाव पडले असावे. अशी दंतकथा आहे की, शिव आणि पार्वती येथे एकांतवासात राहत होते. त्यावेळी पार्वतीला शिवाने अमरत्वाची कथा (मंत्र) सांगितली.खरे तर शिव आणि पार्वती आपल्या कर्तृत्वाने अमर झाले आहेत. या अमरकथेबद्दल अनेक समज गैरसमज आहेत अमरनाथ मार्गावर असणाऱ्या पहलगाम या ठिकाणी शिव थांबले होते .तेथे त्यांनी आपल्या वाहनाला (नंदीला) सोडले. पुढे लागते ते चंदनवाडी .आपल्या जटातील चंद्रकोर शिवाने येथे काढून ठेवली होती. (कदाचित शिव चंद्रकोरी सारखी एखादी वस्तू आपल्या जटांत परिधान करत असतील, ती त्याने येथे काढून ठेवली). पुढे शेषनाग ठिकाण लागते .येथे शिवाने आपल्या गळ्यातील शेषनाग सोडला होता. पुढे महागुना पर्वत लागतो. तेथे गणपतीला सोडले. पुढे पंचतरणी लागते.येथे पाच नद्यांचे उगमस्थान आहे .त्यानंतर पुढे शिवलिंग गुहा लागते. येथील थंड वातावरणात गुहेत बर्फ तयार होतो. त्याचा आकार शिवलिंगासारखा असतो. तापमानातील बदलामुळे शिवलिंग हळूहळू कमी कमी होत जाते. शिवाने पार्वतीला अमर कथा सांगितली .म्हणून या ठिकाणाला अमरनाथ असे म्हणतात.