खजुराहो: Khajuraho

भारतीय संस्कृती विभिन्नतेने नटलेली आहे. खूप प्राचीन सांस्कृतिक वारसा असल्याचा पुरावा म्हणजे प्राचीन मंदिरे, कला, नृत्य, शिल्पे, गोपुरे होय.प्राचीन आणि मध्ययुगाला जोड‌णाऱ्या कालावधीत मध्यप्रदेशात चंदेल राजघराणे उदयास आले. चंदेल घराणे हे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध घराणे होते. इ. सन नववे शतक ते तेरावे शतकात चंदेल घराण्याचे मध्य भारतावर वर्चस्व होते. या चंदेल घराण्यांनी निर्माण केलेली उत्कृष्ट कला म्हणजे Khajuraho येथील शिल्पकला होय. या शिल्पकलांची आणि येथील मंदिरांची आपण माहिती घेणार आहोत.

ठिकाणाचे नाव :खजुराहो. ठिकाणाचा प्रकार :शिल्पकला सांस्कृतिक शिल्पकला

स्थापना :इ.स. 900 ते 1300

जिल्हा : छतरपूर

राज्य : मध्यप्रदेश

निर्मिती : चंदेल वंशांचे राजे

सध्याची स्थिती चांगली.

छतरपूर पासून अंतर : 42 किलोमीटर.

खजुराहोला कसे जायचे ? How to go to see Khajuraho?

छतरपूर या जिल्‌ह्याच्या ठिकाणाहून खजुराहो 42 किलोमीटर अंतरावर आहे. येथून बसने जाता येते.

* मध्यप्रदेशातील पन्ना राष्ट्रीय उद्यान तुम्ही पाहायला गेला असेल तर तेथून खजुराहो 20 किलोमीटर अंतरावर आहे.

* जबलपूर या प्रसिद्ध ठिकाणापासून खजुराहो 241 किलोमीटर अंतरावर आहे.

* महाराष्ट्रातील नागपूर या उपराजधानीच्या ठिकाणापासून सुमारे 500 किलोमीटर अंतरावर खजुराहो आहे.

* तुम्ही झाशीचा किल्ला पाहायला गेला असाल तर झाशीपासून खजुराहोची शिल्पकला 169 किलोमीटर अंतरावर आहे.

खजुराहोची शिल्पकला निर्मिती आणि स्थापत्यकला: Creation and Architecture of Khajuraho:

भारतीय राजकीय संस्कृतीचा विचार केला तर भारतीय स्थापत्यकला गुप्तकाळापासून विकसित होत गेली आहे. मुघल काळात त्याचा कळस झाला. शिवकाळ, शिलाहार काळ, यादव काळ आणि इंग्रज काळातही स्थापत्यकला विकसित झालेली आहे.

खजुराहो तेथील शिल्पकला आणि मूर्तिकला चित्ररूपात प्रकट करण्याची कला तत्कालीन मध्यप्रदेशातील राजघराणे चंद्रवंशीय म्हणजेच चंदेल वंशीयांनी साकारलेली आहे. इ स 900 ते 1300 या काळात मध्यप्रदेशात चंदेल राजांची सत्ता होती. त्यांनीच खजुराहो येथील शिल्पकला आणि मूर्तिकला चित्ररूपात संपूर्ण जगासमोर आणली. बौद्ध काळात बौद्ध अनुयायांनी शिल्पकला चांगलीच विकसित केली होती. हे विविध लेण्यांमधून सिद्ध होते.

खजुराहो येथील चतुर्भुज मंदिर, दुल्हा देव मंदिर, विविध मैथुन कला यांचे प्रदर्शनीय शिल्पकला पाहून धक्क होऊन जायला होते. प्रत्येक शिल्प, प्रत्येक मूर्ती आणि प्रत्येक चित्रमय शिल्पकला पाहताना डोळे दीपून जातात. चंदेल राजांनी हे सर्व का करून ठेवले ? असाही प्रश्न निर्माण होतो. पण एक कला म्हणून संपूर्ण शिल्पकला पाहिल्यास आणि निरागस, स्वच्छ मनोवृत्तीने पाहिल्यास निश्चितच आपल्याला या शिल्पकला पाहण्याचा आनंद घेता येईल.

खजुराहों शल्पकलेचा इतिहास : History of Khajuraho

इ. स. 900 ते इ.स. 1300 या काळात मध्य प्रदेशात चंदेल राज्यसत्ता भरभराटीस आली होती. याच काळाच्या मध्यवर्ती काळात सुमारे 100 वर्षाच्या इतिहासात खजुराहो येथील मंदिरे आणि शिल्पकला निर्माण केली होती. याठिकाणी काही देवदेवतांची मंदिरे सुद्धाक्ष आहेत. गणेश, शिव, विष्णू इत्यादी दे‌वांची मंदिरे आहेत.

खजुराहो हे शहर चंदेल राज्यसत्तेची राजधानी होती. चंदेल राज्यसत्येचा संस्थापक चक्रवर्मन होता. खजुराहों ही राजधानीच असल्याने तेथील शिल्पकला निर्माण करण्याचे सारे श्रेय चंदेल राजघराण्यालाच जाते. येथील मंदिरांच्या निर्मिती नंतर चंदेल राजांनी पुढे आपली राजधानी महोबा येथे स्थानांतरित केली. सध्या हे महोबा उत्तरप्रदेशात आहे. महोबा ऐतिहासिक बुंदेलखंड क्षेत्रात येते. चंदेल राजांनी आपली राजधानी जरी हलवली असली,तरी खजुराहो येथील शिल्पकलेचे महत्त्व आणि वैशिष्ट्य कायमच अधोरेखित राहिले.

खजुराहो येथील वैशिष्ट्यपूर्ण शिल्पकला. Characteristic Creation in Khajuraho:

खजुराहो येथे बाराव्या शतकात सुमारे 85 मंदिरे होती. सध्या पाहिले तर केवळ 20 ते 25 मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यांतील काही मंदिरांचा परिचय करून देण्यापूर्वी मंदिरातील सर्व मूर्तिकला आणि शिल्पकला यांचे निरीक्षण करून केले तर त्याचे पाच प्रकारे वर्गीकरण करता येईल.

1. पंथ संबंधित मूर्ती.

2. परिवार, पार्श्व आवरण देवता.

3. अप्सरा आणि ललना यांच्या मूर्ती

4. नर्तक, संगीत क्षेत्रातील , कौटुंबिक मूर्ती

4. विविध प्राण्यांच्या मूर्ती. सिंह सर्प वगैरे प्राणी.

वरील मूर्तीच्या प्रकारांपैकी अप्सरा, युवती, युवक यांच्या विविध प्रकारच्या कामक्रीडा, मैथुन करणाऱ्या मूर्तींच्या बाबतीत अधिक चर्चा झाली आहे. स्त्री-पुरुष-प्राणी यांच्या समुहिक मैथून करणाऱ्या मूर्ती आहेत. याशिवाय विविध प्रकारच्या मैथून कलांचे अक्षरशः प्रदर्शन मांडले आहे. याबाबत चंदेल राजवंशावर टीकाही झाली आहे. पण योग आणि “मैथून या मोक्षप्राप्तीच्या आणि मानवी जीवनातील अविभाज्य भाग असल्याचे चंदेल वंशीय रात्रपरंपरेचे म्हणणे होते.आपण सांसारिक जीवनातील या टाळू न शकणाऱ्या गोष्टी आहेत. मूर्तीकडे पाहिले असता अत्यंत सुंदर मूर्ती ‌आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा भाव दिसत नाही. लज्जा, क्रोध, घृणा, तिरस्कार असा कोणताही भाव न दिसता शांत व निराषय चेहरे दिसतात. असे असले तरी या मूर्तींकडे केवळ कला म्हणून पाहणे उचित ठरेल. असेही म्हटले आहे की नैराश्य आलेल्या मनुष्याला कामुकतेने उत्तेजित करून मोक्ष प्राती मिळवून दिली जाते .अत ही दावा मेरा आनी तरीही अशा प्रकारची प्रद‌र्शनीय कामक्रीडेला विरोध होत आहे.आता आपण काही मंदिरांचा परिचय करून घेऊया.

1. कंदारिया महादेव मंदिर: Kandaria Mahadev Temple

दहाव्या शतकातील खजुराहो येथील सर्वात मोठे मंदिर म्हणजे महादेव मंदिर होय. या मंदिराची उंची 33 मीटर असून इतर मंदिरापेक्षा या मंदिरातील वेगळेपणा म्हणजे गर्भगृहात चारही बाजूंनी खुला मार्ग आहे. या मंदिराच्या भिंतींवर सुमारे नऊशे मूर्ती कोरलेल्या आहेत. या सर्व मूर्ती 2.5 फूट ते 3 फूट या दरम्यान आहेत. देवता, संगीतकारांच्या मूर्ती आहेत. चौकटीवर योगी ,तपस्वी यांच्या मूर्ती आहेत.चौकटींवर गंगा नमुना देवी रुपात आहेत. गर्भ गृहात संगमरवरी शिवलिंग आहे

2. देवी जगदेबा मंदिर: Devi Jagadamba Temple

खजुराहो मधील आणखी एक महत्त्वाचे मंदिर म्हणजे देवी जगदंबा मंदिर होय. जगदंबा म्हणजे जगत् + अंबा म्हणजे पार्वती होय. गर्भगृहात माता पार्वतीची मूर्ती आहे. या मंदिरात शिव, यम, विष्णू यांच्याही मूर्ती आहेत.

3. चौसष्ट योगिनी मंदिर: 64 Yogini Temple

हे मंदिर ग्रॅनाइटमध्ये निर्माण केलेले असून एका विशाल चबुत‌ऱ्यावर हे मंदिर उभारलेले आहे. या मंदिरात मुख्य कालीमाता चा अंतर्भाग असून इतर 64 अंतर्भाग आहेत .ते भाग 64 योगिनींचे आहेत.कालिमातेच्या या सेविका आहेत.

१. विश्वनाथ मंदिर, Vishvanath Temple

भगवान शिवाचेच हे मंदिर असून जगदीश्वर म्हणजेच विश्वनाथ म्हणजेच शिव होय. येथे गर्भगृहात भगवान शिवाची मूर्ती आहे. राजा धंग ने हे मंदिर बनवले असल्याचे येथील शिलालेखावरून कळते. याशिवाय येथे लक्ष्मण मंदिर, नंदी मंदिर, पार्वती मंदिर ब्रह्मा मंदिर, वामन मंदिर, घंटा मंदिर, पार्श्वनाथ जैन मंदिर इत्यादी अनेक मंदिराचा समावेश आहे.

Leave a comment