बोधगया: Bodh Gaya

भारतीय समाजातील सांस्कृतिक जीवनात क्रांतिकारी बद‌ल घडवणारे आणि आभासी, अदृश्य शक्तीला नाकारून वास्तववादी जीवनाचा पुरस्कार करणारा क्रांतिकारी महामानव म्हणज गौतम बुद्ध होय. स्वर्गीय राजसुखाचा त्याग करून, पायाशी लोळण घालणाऱ्या सुखांना ठोकरून वनात जाऊन तपश्चर्या (चिंतन) करून जगाला नवा मार्ग, दिशा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गौतम बुद्ध होय. जीवनाचे सत्य काय आहे?हे शोधण्यासाठी कठोर तपश्चर्या (साधना) करून ज्या वृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. त्याच ठिकाणाला बोधगया असे म्हणतात. त्या बोधगया ठिकाणाबद्धल आपण माहिती घेणार आहोत.

बोधगया कोठे आहे? Where is Bodh Gaya?

भारतातील बिहार राज्यातील गया या जिल्ह्यात गया या महानगरपालिकेच्या नगरात ‘बोधगया’ हे ठिकाण आहे. गया हे शहर निरंजना नदीच्या काठी येते. साह‌जिकच बोधगया हे ठिकाण निरंजना नदीच्या काठीच येते. या निरंजना नदीच्या काठी एका पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्ध यांनी कठोर साधना केल्यानंतर त्यांना मानवी जीवनाचे रहस्य सापडले.ज्ञानप्राप्ती झाली. बोध या शब्दाचा अर्थ समजणे, आकलन होणे,.बोधगया म्हणजे जेथे ज्ञानप्राप्ती झाली, ते ठिकाण होय.

बोधगयाला कसे जायचे ? How to go to see Bodh Gaya?

* बिहारची राजधानी पाटणा येथेपर्यंत विमानाने किंवा रेल्वेने जाता येते. पाटण्यापासून बोधगया 107 किलोमीटर अंतरावर आहे.

* बोधगया हे बिहारमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असल्याने तेथे विमानतळ, रेल्वे स्टेशन आहेत. पाटण्याहून, वाराणसीहून, रांचीतून, लखनऊ‌हून, जयपूरहून, भोपाळहून बोधगयाला रेल्वेने जाता येते. रेल्वे प्रवास सर्वात सुरक्षित आणि सुखाचा असतो.

* झारखंड राज्यातील रांची या शहरापासून बोधगया 190 किलोमीटर अंतरावर आहे.

* मध्य प्रदेशातील भोपाळ शहरापासून 100 किलोमीटर अंतरावर बोधगया हे ठिकाण आहे.

बोधगया मध्ये तुम्ही काय पाहाल? What will you see in Bodh Gaya?

बोधगया हे बिहार‌मधील प्रमुख धार्मिक, सांस्कृतिक स्थळ आहे. इ स. पूर्व काळात येथे जंगल होते. याच जंगलात निरंजना नदीच्या काठी एका पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्‌धांना ज्ञानप्राप्ती झाली. या पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान‌प्राप्ती झाली म्हणून त्या पिंपळाला ‘बोधिवृक्ष असेही म्हणतात. या ठिकाणी महाबोधि मंदिर, बोधिवृक्ष, बौद्ध मूर्ती, सम्राट अशोकने मंदिर परिसरात केलेले शिल्परू‌पी चित्रण, तिबेटियन मंदिर इत्यादी ठिकाणे प्रसिद्‌ध आहेत. ही सर्व ठिकाणे आपल्याला बोधगया येथे पाहायला मिळतात. या सर्व ठिकाणांची आपण ओळख करून घेणार आहोत.

1. महाबोधि मंदिर, गया: Maha Bodhi Temple, Gaya.

बिहार राज्यातील गया या शहरातील मुख्य प्रशासकीय कार्यालयापासून महाबोधि मंदिर 16 किलोमीटर आहे. खरे तर बोधगया या ठिकाणाचा उद्धार सम्राट अशोकाने केला. इ.स पूर्व 272 ते इ.स.पूर्व 232 या काळात सम्राट अशोक राजा होता. या काळात त्याने या ठिकाणी प्रथम मंदिर बांधले. हे महाबोधि मंदिर होय. या ठिकाणावरील पहिले आणि अतिप्राचीन मंदिर होय. सम्राट अशोकाच्या मंदिराच्या शिल्परूपी चित्रणाच्या आजही या ठिकाणी पाऊलखुणा आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिराचे बांधकाम इ स 5 व्या किंवा 6 व्या शतकात झालेले असावे .हे संपूर्ण मंदिर गुप्तकाळात बांधलेले असून संपूर्ण बांधकाम विटांचे आहे. आजही ते चांगल्या स्थितीत अस्तित्वात आहे.

2 बोधिवृक्ष : Bodhi Vriksha

भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्व प्रकारच्या राजसुखाचा आणि संसारसुखाचा त्याग करून वनात राहून तपश्चर्या करत होते. त्यांच्या तपश्चर्येचे ठिकाण म्हणजेच आजचे बोधगया होय. या बोधगया ठिकाणीच एक पिंपळाचे मोठे झाड होते. त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून गौतम बुद्धांनी खूप कडक तपश्चर्या केली. शेवटी एक दिवस त्यांना मानवी जीवनाचे रहस्य सापडले. म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली. त्याच पिंपळवृक्षाला बोधिवृक्ष असे म्हणतात. सध्या जो बोधिवृक्ष (पिंपळवृक्ष) आहे. तो पिंपळवृक्ष बुद्ध कालीन आहे, असे म्हणता येणार नाही. कदाचित नंतरच्या काळात हा पिंपळवृक्ष लावलेला असेल. पण ठिकाण मात्र तेच आहे. हा बोधिवृक्ष पाहण्यासाठी, तेथे नतमस्तक होण्यासाठी अनेक बुद्ध भक्त येतात.

3 बुद्धमूर्ती: गया: Buddha statue Bodh gaya /Mahan Buddh Murti

बोधगया येथे असलेली बुद्ध मूर्ती आणि इतर ठिकाणी असलेली बुद्धमूर्ती यांत फरक आहे. ही बुद्धमूर्ती ध्यान धारणा करीत असते. विशेष म्हणजे ही मूर्ती मोकळ्या आकाशाखाली आहे. याचे कारण असे की बुद्धाने तपश्चर्या करताना सुद्धा मोकळ्या हवेतच ध्यानधारणा केली. त्याचे प्रतिकात्मक रुप म्हणजे ही बुद्ध मूर्ती होय.

या बोधगया येथील बुद्धमूर्तीची उंची 18:5 मीटर आहे. याच ठिकाणी बुद्‌धाच्या दहा प्रमुख शिष्यांच्या मूर्ती सुद्धा आहेत. ही बुद्धमूर्ती 1989 साली स्थापित केलेली असून या मूर्तीलाच महान बुद्ध मूर्ती असे संबोधले जाते.

4. तिबेटियन मंदिर: गया Tibetan Temple : Gaya.

बोधगया येथील तिबेटी मंदिर हे तिबेटियन धर्मग्रंथातील माहितीच्या आधारे आणि अनेक बौद्ध चिन्हांनी सुशोभित केलेले आहे. या मंदिराच्या वेगळेपणामुळे हे मंदिर पर्यटकांच्या मनात आकर्षण आणि जिज्ञासा निर्माण करते. हे मंदिर सोनेरी आणि लाल रंगात रंगवलेले आहे. या मंदिरातील वातावरण अगदी शांत आहे येथे मैत्रेय बुद्धाची प्रतिमा आहे.

इंडिया गेट: दिल्ली: India Gate

गौतम बुद्धः जीवन परिचय: Goutam Buddha life Introduction

गौतम बुद्‌धाचा जन्म इ.स.पूर्व 563 मध्ये लुंबिनी येथे झाला.सध्या हे ठिकाण नेपाळमध्ये आहे. त्यांच्या जन्मदात्या आईचे नाव मायादेवी होते, तर वडिलांचे नाव शुद्‌धोधन असे होते. मायादेवीचे आकस्मिक निधन झाल्यामुळे गौतम बुद्‌धाचे पालन-पोषण गौतमी या त्याच्या मावशीने केले. त्यामुळे त्याला गौतमीपुत्र असे लोक म्हणू लागले. यावरूनच याचे नाव गौतम असे पडले.

गौतम बुद्‌धाचा विवाह राजकुमारी यशोधरेशी झाला. गौतम बुद्ध आणि यशोधरा यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव राहूल होते, शुद्‌धोधन आणि मायादेवी यांनी आपल्या पुत्राचे नाव सिद्धार्थ असे ठेवले होते. पण बुद्ध सर्वत्र ‘गौतम बुद्‌ध या नावानेच परिचित झाले.

सिद्‌धार्थ लहान होता, त्यावेळी राजा शुद्धोधनाला एका ज्योतिषाने सिद्‌धार्थ चे भविष्य सांगितले होते की, हा पुत्र सर्व पृथ्वीतलावर सत्ता गाजवेल किंवा सर्वस्वाचा त्याग करून सन्यस्त जीवन जगेल. सिद्‌धार्थचे आईवडील त्याचे ‘सर्व सत्ताधीश होण्याचे स्वप्न पाहत होते. आणि हेच भविष्य खरे ठरण्यासाठी आटापिटा करत होते; पण झाले उलटेच. वयाच्या 29 व्या वर्षीच सिद्‌धार्थने आपली सुंदर पत्नी यशोधरा, पुत्र राहुल, राज‌वैभव या सर्वस्वाचा त्याग करून कुणालाही कल्पना न देता दूर जंगलात निघून गेला आणि संन्यस्त जीवन जगून गया या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली घनघोर तपश्चर्या केली. आणि एक दिवस त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. सारे म्ह‌णतात ,ज्योतिषाने सांगित‌लेले दुसरे भविष्य खरे झाले; पण ते चुकीचे आहे. बुद्‌धाने आपल्या विचाराने सारे जग व्यापले. बुद्धाचा विचार शाश्वत आणि सदाचारी वाटल्याने तो सगळ्या जगाला प्रिय झाला. म्हणजेच त्याच्या विचाराची गंगा संपूर्ण जगापर्यंत पोहोचली .

गौतम बुद्धांचे तत्वज्ञान : Philosophy of Buddha

* आर्यसत्ये :

मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्ये आहेत.

१. दुःख : मानवी जीवन हे दुःखमय आहे.

२. तृष्णा : मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे.

३ . दुःख-निरोध : दुःखाचा अंत करता येतो.

४. प्रतिपद् : दुःख निवारण्याचा मार्ग.

* अष्टांग मार्ग :

गौतम बुद्धांनी दुःख निवारण्यासाठी जो मार्ग सांगितला त्याला ‘अष्टांग मार्ग’ असे म्हणतात. सम्यक म्हणजे योग्य.

(१) सम्यक दृष्टी, (२) सम्यक विचार, (३) सम्यक भाषण, (४) सम्यक कृती, (५) सम्यक उपजीविका, (६) सम्यक व्यायाम, (७) सम्यक स्मृती, (८)सम्यक समाधी.

पंचशील अष्टांग मार्गावर जे नियम पाळायचे त्याला ‘पंचशील’ असे म्हणतात.

१. अहिंसा : हिंसा करू नये

२. सत्य : खोटे बोलू नये.

३. अस्तेय : चोरी करू नये.

४. इंद्रिय संयम : सुखाच्या हव्यासावर नियंत्रण मिळवावे.

५. मादक पदार्थांचे सेवन करू नये.

त्रिरत्ने :

(१) प्रज्ञा, (२) करुणा, (३) शील.

बौद्ध संघ :

* गौतम बुद्धांनी आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी व आपल्या अनुयायांना संघटित करण्यासाठी ‘बौद्ध संघ’ स्थापन केला.

जे लोक संघात प्रवेश करत त्यांना बौद्ध भिक्खू म्हणत.

* बौद्ध संघात सर्व जातीतील लोकांना प्रवेश होता.

* बौद्ध संघात स्त्रियांनाही प्रवेश होता.

* गौतम बुद्धांनी आपला उपदेश सर्वांपर्यंत पोचावा म्हणून ‘पाली’ या लोकभाषेचा वापर केला.

* ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा बुद्धाच्या शिकवणीचा ठसा साऱ्या जगावर खोलवर उमटला.

‘मानवता श्रेष्ठ आहे. सर्व मानव सारखे आहेत’ हा संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोचवला. समाजाला कर्मकांडातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला.

बौद्ध धर्माचे पवित्र वाङ्मय :

१ त्रिपिटक: विनयपिटक, सुत्तपिटक, अभिधम्य पिटक

२. मिलिंदपन्ह
3. जातक कथा.

राजाश्रय:

सम्राट अशोक, राजा मिलिंद, सम्राट कनिष्क, सम्राट हर्षवर्धन.

Leave a comment