मनाली: एक उत्तम पर्यटन स्थळः Kullu Manali

भारतात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. त्यांतील एक म्हणजे Manali होय. निसर्ग सौंद‌र्याने नटलेले, उन्हाळ्यात सर्वात जास्त लोकप्रिय असलेले, ‘हनिमून पॅकेज म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण म्ह‌णजे मनाली होय. भारताच्या उत्तराखंड राज्यात असलेल्या या मनालीत जोगिनी धबधबा, तिबेटी मठ, रोहतांग खिंड आणि प्रचंड सौंद‌र्याने नट‌लेल्या डोंगरद‌ऱ्या पाहून मन हरकून जाते. याच मनाली बद्दल आता आपण माहिती घेणारे आहोत.

ठिकाणाचे नाव: मनाली

ठिकाणाचा प्रकार:थंड हवेचे ठिकाण

सपाटीपासून उंची: 2000 मीटर

जवळचे ठिकाण :कुल्लू

नदी: बियास

डोंगररांग : हिमालय

कुल्लूपासून अंतर: 38 किलोमीटर

जिल्हा: कुल्लू (कुलु)

राज्य: हिमाचल प्रदेश

मनालीला कसे जायचे? How to go to see Manali?

* तुम्ही ट्रॅव्हल कंपनीच्या पॅकेजमधून जात असाल तर तुम्हाला ट्रॅव्हल कंपनी सेवा पुरवते. तुम्ही समुहाने किंवा कमीत कमी सहा जणांचा ग्रुप करून गेलात, तर तुम्हाला ट्रॅव्हल कंपनी चांगले पैकेज देते. तुम्ही कुल्लूला पोहोचल्यानंतर किंवा मनालीला पोहोचल्यानंतर तेथील टॅक्सी, खोली इत्यादी सर्व व्यवस्था ट्रॅव्हल कंपनी आधीच करून देते. त्यामुळे तुमचा प्रवास सुखकर होतोच, त्याच बरोबर बजेटमध्ये होतो.तुम्ही स्वतःहून जाऊ शकता. पण स्थानिक भाडेकरूंपासून फसवणूक होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

* कुल्लूपासून मनाली 38 किलोमीटर अंतरावर आहे. कुल्लू ते मनाली अंतर आपण एक तासात पूर्ण करु शकतो.

* शिमला ही हिमाचल प्रदेशची राजधानी.शिमल्यापासून मनाली 225 किलोमीटर अंतरावर आहे. शिमल्याला तुम्ही विमानाने जाऊ शकता. दिल्लीपासून मनाली 500 किलोमीटर अंतरावर आहे.

धर्मशाला पासून पालमपूर-मंडी- कुल्लू मार्गे मनाली 233 किलोमीटर आहे.

मनालीला केव्हा जावे ? when will you go to Manali?

मनाली हे थंड हवेचे ठिकाण असल्याने आणि तेथे प्रचंड बर्फवृष्टी होत असल्याने हिवाळ्यात आणि पावसाळ्यात मनालीला जाणे अयोग्य आहे. ऑक्टोबर महिना उत्तम आहे. तर फेब्रुवारीत थंडी असेल तर मार्च, एप्रिल, मे महिना मनालीसाठी उत्तम आहे. थंडीत बर्फवृष्टी इतक्या प्रचंड प्रमाणात होते की कधी कधी रस्ते बंद होतात. अशा वेळी आपण तेथे अड‌कून पडू शकतो. त्यामुळे ऑक्टोबर, मार्च, एप्रिल, मे हे महिने मनालीताठी उत्तम आहेत.

मनालीतील प्रसिद्ध ठिकाणे : Famous Places of Manali.

मनालीत गेल्यावर तेथील काही प्रसिद्ध ठिकाणे पाह‌ण्यासारखी आहेत. ती पुढील प्रमाणे——

1) हिडिंबा मंदिर Hidimba Mandir.

2) मणिकरण.Manikaran

3) अर्जुन गुफा.Arjun Gufa.

4) ओल्ड मनाली:Old Manali

5) बौद्ध मठ.Bhouddha Math.

6) वशिष्ठ कुंड.Vashishtha kund.

7) सोलंग नाला.Solange Nala.

8)जोगिनीधबधबा.Joining Falls.

9) रोहतांग खिंड.Rohatang Valley.

10) सोलंग नाला. Solang Pass.

ही सर्व ठिकाणे पाहण्यास हरकत नाही.

बोधगया: Bodh Gaya

1) हिडिंबा मंदिर-Hidimba Mandir.

हिडिंबा ही भीमाची पत्नी. भीम म्हणजे पाच पांडवांपैकी बलाढ्य शरीरयष्टीचा आणि शक्तिमान. अशी त्याची ओळख आहे.त्याने वनवासात असताना हिडिंबाशी विवाह केला होता. हिडिंबा आणि भीम यांना घटोत्कच नावाचा पुत्र झाला होता. हा घटोत्कच सुद्धा बलाढ्य आणि रात्रीच्या युद्धात पारंगत होता. रात्रीच्या युद्धात त्याला कोणीही हरवू शकत नव्हते. कौरव आणि पांडव यांच्यात अठरा दिवसांचे महाभारत युद्ध सुरु झाले होते. अर्जुनपुत्र अभिमन्यूला युद्धाचे नियम तोडून कौरवांनी मारले होते. त्यामुळे पांडवांनी रात्रीचे युद्ध पुकारले. यासाठी खास घटोत्कचाला बोलावून घेतले.घटोत्कचाने कौरव सेनेचे प्रचंड नुकसान केले. शेवटी नाइ‌लाजाने कर्णाला वासवी हे ब्र‌ह्मास्त्र वापरावे लागले. त्यामुळे घटोत्कचाचा मृत्यू झाला; पण कर्णाने हे अस्त्र अर्जुनासाठी राखून ठेवले होते. अशा महापराक्रमी घटोत्कचाची माता हिडिंबा हिचे मंदिर मनालीपासून केवळ 1.5 किलोमीटर आहे. हे मंदिर आवश्य पाहावे.

2. मणिकरण: Manikaran, Manali

मनाली येथील मणिकरण हे ठिकाण गरम पाण्याच्या झर्‍यांसाठी प्रसि‌द्ध आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 1829 मीटर उंचीवर हे ठिकाण असून कुल्लू पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे, तर मनाली पासून 17 किमी अंतरावर आहे.

माणिकरण येथील आणखी एक वैशिष्ट्य या ठिकाणी पाहायला मिळेल. येथेच गुरुद्वारा साहिब मंदिर आहे. हे मंदिरही पाहायला हरकत नाही. माणिकरण म्हणजे कानात घातलेली बाळी. कानातील मणी असलेला दागिना.

3. जोगिनी धबधबा – Jogini falls: Manali

मनालीचे अद्भुत सौंदर्य म्हणजे जोगिनी धबधबा होय. मनालीपासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा म्हणजे निसर्गाने दिलेला हा उपहारच आहे. या धबधब्याला जाताना वाटेत भरपूर रेस्टॉरंट लागतात. अर्थात सर्वच धबधब्यांच्या वाटेवर असे रेस्टॉरंट आढळतात. हा धबधबा म्हणजे मनालीतील सर्वात रोमांचक ठिकाण मानले जाते. पर्यटकही आवर्जून या धबधब्याला येतात. या धबधब्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे धबधब्यापासून 2 किलोमीटर अंतरावर वशिष्ट मंदिर आहे. प्राचीन काळात कधीकाळी वशिष्ट ऋषी येथे आलेले असतील. हा एक उत्तम ट्रेकिंग पॉईट पण आहे. मनालीचे अद्भुत सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करत आपण आनंद घ्यायचा आहे. जोगिनी धबधबा पाहायला आपण मार्च ते मे महिन्यात आलो तर येथील सौंदर्याचा लाभ घेता येईल. उन्हाळ्यात येथे खूप आल्हाद‌दायक वातावरण असते आणि बर्फ वितळून धबधबा वाहतच असतो.

4. अर्जुन गुफा (गुहा): Arjun Gufa Monali

महाभारत काळात म्हणजे कलियुगातच्या सुरुवातीला वनवासात असताना पांडव मनालीच्या डोंगरदऱ्यात भटकत होते. त्याच्या पाऊलखुणा या भागात आढळतात. पाच पांडव म्हणजे यु‌धिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव होय. युधिष्ठिर, भीम, अर्जुन हे कुंतीपुत्र आहेत, तर नकुल आणि सहदेव हे माद्री पुत्र आहेत. अर्जुन हा धनुर्धर होता. त्याने कर्णाचा वध केला होता. त्याच अर्जुनाची गुहा या मनालीच्या परिसरात आहे.

मनालीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर अर्जुन गुहा (Arjun Gufa) आहे. बियाज नदीच्या डाव्या बानूला एका डोंगर कपारीत ही अर्जुन गुहा आहे. मार्च ते मे महिना हा मनाली पाहण्यासाठी चांगला आहे. त्यावेळी अर्जुन गुहा पाहण्याचा आनंद लुटण्यास हरकत नाही. ऑक्टोबर महिना सुद्धा मनालीचे सौंदर्य टिपण्यासाठी चांगला आहे.

5. रोहतांग दर्रा [खिंड]: Rohatang Pass: Manali

मनाली पासून 51 किलोमीटर अंतरावर रोहतांग खिंड आहे. तुम्ही मनाली पॅकेजमधून आला असाल तर मनालीपासून कॅबमधून जाऊ शकता. या रोहतांग खिंडीपर्यंत रस्ता गेलेला असल्याने आपला प्रवास सुखाचा होतो. सुमारे 3900 मीटर उंचीवर रोहतांग खिंड असल्याने एप्रिल आणि मे महिन्यात मनालीला तुम्ही गेला असाल तर नक्कीच रोहतोग खिंड पाहायला विसरु नका.

6. सोलंग घाट [Solang Vally] Manali

सोलंग घाट किंवा सोलंग नाला असे या ठिकाणाला म्हटले जाते. सोलंग गावाजवळंच हा सोलंग नाला आहे. मनालीपासून 14 किलोमीटर अंतरावर हा सोलंग नाला आहे. या सोलंग परिसरातील निसर्गाचे अद्‌भुत सौंद‌र्य पाहण्यासाठी आणि येखील अलौकिक निसर्ग कॅमेरात कैद करण्यासाठी सोलंग नाला पाहायला आवश्य जायला हरकत नाही. एप्रिल, मे, मार्च आणि ऑक्टोबर महिना सोलंग नाला पाहण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.

1 thought on “मनाली: एक उत्तम पर्यटन स्थळः Kullu Manali”

Leave a comment