महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील Sangmeshwar हे गाव आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथेच न्यायनिवाडा करत असताना औरंगजेबचा सरदार मुकर्रब खान याने पकडले. संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक इतिहासाचे साक्षीदार म्हणून पाहायला मिळते. कोकणातील शास्त्री नदी आणि सानवी नदी यांचा संगम या ठिकाणाला झाला आहे. म्हणूनच या गावाचे नाव संगमेश्वर असे पडले आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती एका बेसावध क्षणी पकडले गेले आणि स्वराज्याचा इतिहास बदलून गेला. त्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील संगमेश्वर येयील अंतिम प्रसंगावर आधारित हा लेख सादर करत आहे.
* संगमेश्वर कोठे आहे ? Where is Sangameshwar?
* रायगड किल्ला पाहून, कोकणात जायचे असेल तर संगमेश्वर हे ठिकाण 156 किलोमीटर अंतरावर आहे. येथून बसने, कारने जाता येते.
कराडहून पाटण मार्गे चिपळूणला तुम्ही गेला असाल तर चिपंळूनहून सावर्डे -कडवई मार्गे संगमेश्वरला जाता येते. चिपळूण ते संगमेश्वर अंतर 51 किलोमीटर आहे.
* तुम्ही रत्नागिरीत असाल तर रत्नागिरी ते संगमेश्वर अंतर 43 किलोमीटर आहे. रत्नागिरीतून तासाभरात संगमेश्वरला पोहोचता येते.
* गणपती पुळे ते संगमेश्वर अंतर 41 किलोमीटर आहे. गणपतीपुळे येथील गणपती मंदिर पाहून संगमेश्वरला जाता येते.
* कोल्हापूरहून संगमेश्वर 120 किलोमीटर अंतरावर आहे. मुकर्रबखान कोल्हापूरमार्गेच पन्हाळा- शाहुवाडी-आंबा घाट मार्ग संगमेश्वरला गेला होता.
* संगमेश्वरला काय प्रसिदूध आहे ? What is famous for Sangmeshwar?
1. संगमेश्वर या ठिकाणी शास्त्री नदी आणि सानवी नदी यांचा संगम झाला आहे. या दोन नद्यांच्या संगमामुळेच या ठिकाणाला संगमेश्वर असे नाव पडले आहे.
2. छत्रपती संभाजी महाराज शृंगारपुरात मुक्काम करून राणी येसूबाईला रायगडाला जाण्याचा सल्ला देऊन संगमेश्वरला न्यायनिवाडा करण्यासाठी गेले होते. त्याच वेळी मुकर्रब खानाने छापा टाकून पकडले. या घटनेमुळे संगमेश्वर हे एक ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार झाले.
3. संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आहेत.
4. संगमेश्वर या ठिकाणी संगमेश्वर मंदिर आहे.
* छत्रपती संभाजी महाराज यांचे संगमेश्वरला प्रयाण: Depart to to Sangmeshwar of Sambhaji.
छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कारकीर्दीत अनेक लढाया केल्या. आपला मुलुख वाढवला.
शत्रूवर जरब बसवला. मुघल पोर्तुगीज, स्वकीय, निजामशाह आणि आदिलशाह या सर्वांच्या मनात संभाजी महाराज यांच्याबद्दल भीती होती. औरंगजेब तर पाच लाख फौज घेऊन औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) येथे तळ ठोकून होता. सैन्य अफाट असल्यामुळे त्याला भीती नव्हती; पण रामशेजचा एकच किल्ला घेण्यास औरंगजेबला सहा-सात वर्षे लागली.
संभाजी महाराज अनेक लढायांत स्वतः लढले. कोल्हापूरहून शृंगारपूला मुक्काम करून त्यांना संगमेश्वरला जायचे होते. पन्हाळा मार्ग 120 किलोमीटरचा प्रवास घोड्यावरून करत राजे संगमेश्वरला पोहोचले. वाटेत शृंगारपुरी गेले.तेथे येसूबाई रायगडावरून आल्या होत्या. त्यांना परस्पर रायगडला जायचा सल्ला देऊन आपण स्वतः संगमेश्वरला गेले.
संगमेश्वरात काय घडले ? What happened in Sangmeshwara?
मुकर्रब खान कोल्हापूरातून शृंगारपूरला निघाला. याच वाटेने संभाजी महाराज आठ दिवस अगोदरच गेले होते.
मुकर्रब खानाची गुप्तहेर संघटना मजबूत होती. त्यांनी या वाटेचा खडा न खडा माहिती घेतली होती. या कामात आंबा घाट उतरलानंतर कान्होजी शिर्केने सर्व माहिती पुरवली होती, पण विनाकारण गणोजी शिर्के यांचे नाव तत्कालीन बखरकारांनी आणि लेखकांनी यात गोवले होते.गणोजी शिर्के यांना वतनदारी पाहिजे होती. हे जरी खरे असले तरी बहिणीचे कुंकू पुसण्या इतके खालच्या थराला जाणारे पिलाजी शिर्के यांचे घराणे नहते. पण कान्होजी शिर्के हा वारंवार मुघलांशी संधान बांधून होता. त्याच्यावरच इतिहासकारांचा (आधुनिक) संशय आहे.
पालीच्या रंगनाथ स्वामीचा न्याय निवाडा करण्यासाठी संभाजी महाराज संगमेश्वरला दोन ते तीन दिवस अडकून पडले होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे 400 ते 500 सैन्य होते. आणि मुकर्रब खानाकडे 3000 ते 4000 सैन्य होते.रंगनाथ स्वामी याने संभाजी महाराज यांना जाणीवपूर्वक गुंतवून ठेवले होते. त्यांचा मुकर्रब खानाची. संपूर्ण माहिती होती.
मुकर्रब खान संगमेश्वराच्या सीमेवर आला तरी संभाजी महाराज यांना त्याची चाहूल नव्हती. अचानक हल्ला झाल्याने संभाजी महाराज यांचे सैन्य गोंधळून गेलेः प्रतिकार करून निभाव लागणार नव्हता. तरी सुद्धा प्रतिकार झालाः यात मालोजी घोरपडे जागीच ठार झाले. संभाजी महाराज, कवी कलश आणि काही साथीदार यांना पकडले गेले. संताजी घोरपडे (मालोजीचा पुत्र), खंडोजी बल्लाळ निसटून गेले. कदाचित संभाजी महाराज यांनाही निसटता आले असते; पण शत्रूला पाठ दाखवणे त्यांच्या स्वभावात नव्हते. आलेल्या संकटाला सामोरे जाणे हाच त्यांचा बाणा होता. शिवाजी महाराज परिस्थिती प्रमाणे लवचिक वागत. कारण पडल्यास माघारी फिरत. हे संभाजी महाराजांना जमले नाही. म्हणूनच घात झाला. आणि मुकर्रब खानाच्या जाळ्यात ते अडकले.
संगमेश्वर ते तुळापूर: Sangmeshwar to Tulapur:
छत्रपती संभाजी राजांना अटक केल्यानंतर मुकर्रब खानाने अगदी वेगाने हालचाली केल्या. पुढे माणसे पाठवली आणि वाटेत अनक फौजा येऊन मुकर्रब खानाला मिळाल्या. त्यामुळे निसटून गेलेल्या संताजीला आणि खंडोजीला काही हालचाल करण्यापूर्वीच मुकर्रब खान वेगाने पुढे गेला .निसटून गेलेल्या पाचपन्नास लोकांना काहीच करता आले नाही. शत्रूच्या मागावर राहावे की सैन्याची जुळवाजुळव करायची ? काहीच करता येईनासे झाले. इकडे मिरज मार्गे आलेले मुघल सैन्य मुकर्रब खानाला मिळाल्यामुळे संभाजीराजांना सोडवण्यालाही मराठी मुलखाला काहीच करता आले नाही. संभाजी राजे यांना तुळापूर येथे अटक करून औरंगजेबने दोन गोष्टींचा प्रस्ताव ठेवला होता.
1) तुमचा सर्व खजिना कुठे आहे ते आम्हाला सांग.
2) तुम्हाला कोण कोण मुघल सरदार फितूर आहेत ते सांग.
या दोन्हीही प्रश्नांची उत्तरे देऊन सुद्धा औरंगजेब सोडणार नाही, हे संभाजी राजेंना माहीत असल्यामुळे त्यांनी ते प्रश्न धुडकावले.औरंगजेबाने संभाजी राजांना छळ छळ करून मारले.
‘तुळापूर- वढू’ या लेखात आणखी सविस्तर माहिती घेऊ.
“छत्रपती संभाजी महाराज स्मारकः संगमेश्वर : Sambhaji Maharaj Memorial Sangmeshwar:
छत्रपती संभाजी महाराज यांना मुकर्रब खानाने संगमेश्वर येथे पकडल्यामुळे या संगमेश्वर ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे. इ.स. 1988 च्या सुमारास संगमेश्वर येथे राजांचे स्मारक बांधले आहे. स्वराज्याचे छत्रपती होते ते. त्यांचे स्मारक कसे असायला हवे? तेथे राजांच्या कार्याचा गौरव असायला हवा.त्यांच्या पराक्रमाचे सारांश लेखन हवे. त्यांचा तत्कालीन दुर्मिळ फोटो हवा. यातले काहीही येथे आढळले नाही. येथे स्वछता पण आढळली नाही. सरकार राजांचे पोवाडे गाते. कौतुक करते. मतासाठी वापर करते; पण स्मारकाकडे कुणाचेही लक्ष नाही या गोष्टीची खूप वाईट वाटते.
संगमेश्वर मंदिर, Sangmeshwar Temple. Sangmeshwar.
संगमेश्वर या ठिकाणी सानवी नदी आणि शास्त्री नदी यांचा संगम झालेला आहे. त्यामुळेच या संगमावर संगमेश्वराचे मंदिर बांधलेले आहे. संगमेश्वर येथील सरदेसाई यांचा वाडा ओलांडून पायवाटेने गेल्यावर तीन मंदिरे लागतात. त्यातील एक मंदिर कुंभकेश्वराचे आहे. हे मंदिर महादेवाचेच आहे. कारण गाभाऱ्यात शिवलिंग आहे. या तिन्ही मंदिरांच्या समुहाला कुंभकेश्वर मंदिर समूह असे म्हणतात.अनेक नद्यांच्या संगमाजवळ शिवमंदिर किंवा दत्तमंदिर असते.
संगम पॉईंट : संगमेश्वर Sangam point Sangmeshwar
शास्त्री नदी आणि सानवी यांचा संगम पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो. या दोन नद्या लहान असल्याने तुम्ही ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जरी गेलात तरी या संगमावर सहज जाता येते. दोन नद्यांचा संगम डोळे भरून पाहता येतो.
1 thought on “संगमेश्वर-Sangmeshwar”