भारतरत्न रतन टाटा : Ratan Tata

भारतीय उद्योग समूह आणि टाटा फॅमिली याचा खूप मोठा संबंध आहे. टाटा उद्योग समूह केवळ नामांकित उद्योग समूह नाही, तर त्याची नाळ प्रत्येक भारतीयाशी जोडलेली आहे.
टाटा समुहाने अनेक उद्योग निर्माण केले आणि भारतीय लोकांना रोजगाराची संधी दिली. टाटा समुहाने कधीच सरकारशी संधान बांधून नफ्याच्या कंपन्या पदरात पाडून घेतल्या नाहीत. उलट जे काही केलं, ते स्वबळावर केलं. वेळोवेळी सरकारलाच निरपेक्ष बुद्धीने मदत केली. मार्च 2021 ला देशात कोरोनाने हाहाकार माजवला होता.त्यावेळी टाटा समुहाचे वि‌द्यमान अध्यक्ष रतन टाटा यांनी कंपनीच्या नफ्यातील 1200 कोटी सरकारला दान केले. एक पारशी कुटुंबीय भारतात स्थीर झाले आणि सच्चे भारतीय झाले. बुधवार दिनांक 9ऑक्टोबर 2024 रोजी रात्री उशिरा टाटा उद्योग समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन झाले. त्या निमित्त रतन टाटा यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा लेख सादर करीत आहे.

टाटा फॅमिली: Tata Family

नूसेरवानजी टाटा हे एका उद्योगासाठी गुजरातहून मुंबईत आले आणि या वटवृक्षाच्या अनेक फांद्यांच्या रुपाने संपूर्ण भारतात टाटा समुह पसरला. जमशेटजी टाटा हा नूसेरवानजी यांचा पुत्र, जमशेटजींचा जन्म 3 मार्च 1839 रोजी झाला. त्यांनी पहिली कंपनी हाँगकाँगला स्थापन केली. 1860 साली अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यावेळी कापसाचे प्रचंड उत्पादन झाले होते; पण व्यापारपेठ मिळत नव्ह‌ती. जमशेटजींनी अमेरिकेचा कापूस विकत घेतला आणि इंग्रजांना विकला.यात जमशेटजींना फायदा झालाच, त्याच बरोबर अमेरिका तरली इंग्लंडचा कापड उद्योग ‌योग चालला. आज जो कामगारांना, सरकारी नोकरांना भविष्य निर्वाह निधी मिळतो, त्या योजनेचे जनक जमशेटजी टाटा आहेत. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीच्या वेळी जमशेटजींनी महाबळेश्वर येथील 43 एकराची मालमत्ता दान केली.

आज आपण जे टाटा स्टील पाहतो. जमशेटजी टाटा आणि दोराबजी टाटा यांनी 26 ऑगस्ट 1907 साली स्टील कंपनी काढून पोलाद उत्पाद‌न कारखाना सुरु केला. 1912 साली स्टीलचे उत्पादन सुरु झाले. भारतातील सर्वांत उत्तम दर्जाचे स्टील म्हणून आपण टाटा स्टीलकडे पाहतो. 1932 साली जे आरडी या जमशेटजींच्या पुत्राने विमान कंपनी काढून स्वतःच्या विमानातून कराची ते मुंबई असा प्रवास करणारे ते पहिले भारतीय ठरले. पुढे त्यांनी मुंबई ते दिल्ली विमान सेवा सुरु केली.टाटा स्टीलचे तरुण अध्यक्ष म्हणून ही त्यांनी काम पाहिले.

रतन टाटा-अलौकिक व्यक्तिमत्व :Ratan Tata:

रतन टाटांचा जन्म Birth of Ratan Tata.

जमशेटजी टाटा यांना दोराबजी टाटा, जहांगीर टाटा, रतन गटा असे तीन मुलगे आणि होते. त्यांतील रतन टाटा यांना संतती नसल्यामुळे आपल्या नात्यातीलच ‘नवल’ या मुलाला दत्तक घेतले. नवल टाटा यांना दोन पत्नी होत्या.त्यांतील सुनी कमिसारिट ही रतन टाटाची आई होय. पुढे सुनी घटस्फोट घेऊन निघून गेली आणि रतनचा सांभाळ नवल टाटा यांच्या पत्नीने म्हणजे आजीने केला. लहानपणी आईची माया मिळाली नाही. ती उणीव आजीने भरून काढली.

रतन टाटांचे शालेय शिक्षण:Ratan’s schooling:

लहानशा रतनला काही काळ अनाथालयात काढावा लागला. त्यानंतर त्यांच्या आजीने सांभाळ केला. रतनने मुंबई येथून शिक्ष‌णाची श्रीगणेशा सुरु केली. ती. अमेरिकेच्या हॉर्वर्ड वि‌द्यापीठात संपली.रतनने शालेय शिक्षणाचे पहिलं पाऊल मुंबईतील कँपियन स्कूलमध्ये टाकले. या शाळेत काही काळ शिकल्यानंतर त्यांची शाळा बदलली गेली. कॅथेड्रल शाळेत ते दाखल झाले. तेथेही काही काळ शिक्षण घेतल्यावर जॉन कॉनन स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण सुरु झाले. मुंबईतील या तिन्हीही शाळा इंग्रजी माध्यमाच्या होत्या .आपल्याला जग फिरायचे असेल तर इंग्रजी भाषेवर मजबूत पकड असायला हवी.हे टाटा फॅमिलीचे ब्रीद होते. म्हणूनच रतनजी एका पेक्षा एक दर्जेदार शाळेत शिक्षण घेत गेले. आणि तेही इंग्रजी माध्यमातून.

रतनजींचा मुंबईतील शिक्षणाचा प्रवास संपला आणि त्यांची रवानगी शिमला येथील बोर्डिंग स्कूल मध्ये झाली. शिमला येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये काही काळ शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले.

अमेरिकेत [Higher Education in UK] उच्च शिक्षण

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे ठरवले होते. नियोजना प्रमाणे ते अमेरिकेला गेले. अमेरिकेतील (USA) कॉर्नेल वि‌द्यापीठात रतनजींनी प्रवेश घेतला. USA च्या या Cornell University मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. या युनिव्हर्सिटीत त्यांनी बॅचलर ऑफ आर्किटक्चर [Bachelor of Architecture) ही पद‌वी संपादन केली. ही इमारत आणि वास्तुशास्त्राशी निगडीत असलेली पद‌वी संपादन केल्यानंतर रतनजींनी युनायटेड किंगडम [UK] मधील हॉर्वर्ड बिझनेस स्कूल [Harvard Business School) मधुन प्रगत व्यवस्थापनाचा कोर्स पूर्ण केला. हा कोर्स त्यांनी 1975 साली पूर्ण केला आणि भारतात परत आले.

आयुष्यभर अविवाहितः Single for life

अमेरिकेत शिक्षण घेत असताना चीनच्या एका मैत्रिणीशी रतनजींचे प्रेमसंबंध जुळले होते. दोघांनी विवाह‌ बंधनात अडकवण्याचा निर्णय घेतला होता; पण 1962 च्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीमुळे मैत्रिणीने लग्नास तयार आहे; पण भारतान येण्यास नकार दिला. आपण अमेरिकेत राहू. असा प्रस्ताव तिने ठेवला होता. कदाचित ही गोष्ट रतनजींच्या मनाला खूप लागली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या पुढील आयुष्यात चार वेळा लग्नाचा प्रस्ताव आला असतानाही त्यांनी तो वेळ नाही, असे सांगून’ नाकारला, एकदा ते असे बोलले होते की आपल्याला जे काही करायचे आहे त्या कामात अडथळा येऊ नये म्हणून रतनजींनी वेळोवेळी लग्न टाळले आणि आयुष्यभर अविवाहित राहिले.

कार्नेल वि‌द्यापीठाला देणगी: Donation to Cornell University

आपण ज्या शाळेत शिक्षण घेत असतो, त्या शाळेला आपल्या ऐपतीप्रमाण मदत करावी, असा विधिलिखित नियम आहे. रतनजी टाटा यांनी UK मधील ज्या Cornell University मध्ये Architecture चे शिक्षण घेतले, त्या वि‌द्यापीठाला 2008 साली टाटा उद्योग समूहाने 50,000,000 डॉलर्सची देणगी दिली. म्हणजे सध्याच्या बाजार भावाप्रमाणे 500 कोटी रुपयांची मदत केली. कॉर्नेल वि‌द्यापीठाला आतापर्यंत मिळालेल्या मदतीपेक्षा ही मदत सर्वात जास्त होती. भविष्यात अशा प्रकारच्या मदतीतूनच शाळांचे रुपडे पालटावे हीच अपेक्षा. विद्यापीठात (Cornell University) बांधलेल्या हॉलला टाटा हॉल (TATA Hall) असे नाव दिले.

टाटा समुहाची जबाबदारी: Responsibility of Tata Group

जे आर डी टाटांनी म्हणजेच जहागीर टाटांनी रतनजींचे शिक्षण पूर्ण झाल्यावर टाटा समुहाकडे लक्ष्य घालायला सांगितले होते. सुरुवातीला ते टाटा स्टीलच्या कार्यशाळेच्या कामकाजावर देखरेखीचे (supervisor) काम करत होते. हळू हळू त्यांची टाटा समुहातील जबाबदारी वाढत गेली आणि 1990 साली त्यांच्यावर टाटा समुहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पडली. ही जबाबदारी देताना जे आर डी टाटा म्हणाले होते .

“रतन बराचसा माझ्यासारखा आहे. कंपनीची वाढ करण्यासाठी तो वाटेल ते करणार नाही, मूल्यांबद्द‌लची त्याची चाड माझ्याइ‌तकीच प्रखर आहे.”

टाटा समुहाचे रतन टाटा अध्यक्ष झाले, तेव्हा टाटा समुहात 84 कंपन्या होत्या.त्यांतील 33 कंपन्या भांडवली बाजारात नोंदल्या होत्या. कंपन्यांची उलाढाल 24000 कोटी रुपयांची होती. करपूर्व फायदा 2100 कोटीरुपये होता. त्यावेळी टाटाच्या वेगवेगळया कंपन्या 3500 कोटी रूपये कर भरत होत्या. भारताच्या एकूण करपात्र रकमेच्या 3% रक्कम टाटा कंपनी भरत होती. कंपनीचा हा प्रामाणिकपणा होता.

नॅनोची निर्मिती! Nano Production.

गरिबांना चार बाकी गाडी घेऊन फिरता यावे, या कल्पनेने टाटा झपाटले होते. यांतूनच त्यांनी Nano ही छोटी family car बाजारात काढली. या कारची प्रचंड विक्री झाली. टाटाचे नाव सर्वत्र गाजू लागले.

टाटा इंडिका: Tata Indica!

रतन टाटांनी ऑटो मोबाईल क्षेत्रात पावले रोवायला सुरुवात केली होती. टाटा इंडिका ही कार खूप गाजली. या कारचे उत्पादनही खूप मोठ्या प्रमाणात झाले, पण पुढे खप मंदावला आणि टाटांनी ही कंपनी कुणाला तरी विकायची योजना आखली. फोर्डचे चेअरमन यांच्याशी बोलणी चालू होती. फोर्डनी टाटांची खिल्ली उडवली, रतन टाटा परत भारतात आले यांनी ही कंपनी जोमाने चालवली. ऑटो मोबाईल क्षेत्रात टाकलेल्या द‌मदार पावलाने टाटा मोटर्सची नवी ओळख निर्माण झाली. आज टाटा मोटर्स अनेक नवनव्या कार्स Market अध्ये आणत आहे. काळ बदलला.फोर्ड कंपनी दि‌वाळखोरीत निघाली. टाटांनी त्याचा काही भाग विकत घेऊन फोर्डला मदतच केली.

टाटाची उत्पाद‌ने : Tata’s Productions.

टाटा समुहाने वेगवेगळ्‌या क्षेत्रात द‌मदार पावले टाकली आहेत.
टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा सॉल्ट, तनिष्क, टाटा टी, टाटा टेटली मोती साबण, कॉफी, टीपिक्स, टाटा कॉपर अशा कितीतरी क्षेत्रात टाटांनी दमदार पावले उचलली आहेत.

कोरोना काळात मदत Help During Corona Time

रतन टाटांनी कोरोना काळात टाटा समुहामार्फत भारत सरकारला 1200 कोटी रुपयांची मदत केली.
सामाजिक कार्यात टाटा समूह नेहमीच अग्रेसर असते.

रतन टारांना मिळालेले पुरस्कार : Awards received by Ratan Tata

. रतन टाटांना 2000 साली भारत सरकारने पद्‌मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला. 2008 साली त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार दिला. लवकरच भारत सरकार‌ने टाटांना भारत रत्न हा पुरस्कार द्यावा, हीच अपेक्षा.

2 thoughts on “भारतरत्न रतन टाटा : Ratan Tata”

Leave a comment