दार्जीलिंग: Darjeeling

भारतात अनेक नैसर्गिक सौंद‌र्याने नटलेली ठिकाणे आहेत. अभयारण्ये आहेत. किल्ले आहेत. प्राचीन परंपरेतील वास्तू आणि मंदिरे आहेत. पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग हे असेच निसर्ग सौंदर्याने नटलेले, चहाच्या मळ्यांनी बहरलेले ऊबदार, आल्हाद‌दायक हवेने फुललेले, कोसळणाच्या धबधब्यांनी खळाळणारे, टॉय ट्रेनचा आनंद घेता येणारे गंगामैया सरोवरात नौकानयन करता येणारे मनमोहक परिसराने नटलेले ठिकाण म्हणजे दार्जिलिंग होय. या दार्जिलिंग शहराब‌द्दल आणि दार्जिलिंग शहर परिसरातील नैसर्गिक पर्यटन स्थळांबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत.

दार्जिलिंगची संक्षिप्त माहिती. Brief Information about Darjeeling:

ठिकाणाचे नाव : दार्जिलिंग

प्रसि‌द्धी : थंड हवेचे ठिकाण

: धबधबे, चहाचे मळे

जिल्हा : दार्जिलिंग

राज्य : पश्चिम बंगाल

कोलकाता पासून अंतर : 638 किलोमीटर

समुद्र सपाटीपासून उंची : 2100 मीटर.

जिल्ह्याचे क्षेत्रफल: 2092 चौरस किलोमीटर

दार्जिलिंगला कसे जायचे? How to go to see Darjiling?


भारताच्या ईशान्य दिशेला सिक्कीम राज्याला खेटून असलेला पश्चिम बंगालचा जिल्हा म्हणजे दार्जिलिंग [ Darjeeling ] होय. दार्जिलिंगला जाण्यासाठी कोलकात्याला न जाता महाराष्ट्रातून थेट विमानाने, गेल्यास मुंबईहून दार्जिलिंग जवळच असलेले विमानतळ म्हणजे बागडोगरा विमानतळ होय. हे बागडोगरा विमानतळ सिलीगुडी जवळच आहे.

दार्जिलिंगला मुंबईहून रेल्वेने जाता येते. दार्जिलिंगचे रेल्वे स्टेशन युनेस्कोच्या वारसा स्थळात येते. दार्जिलिंग, हिल कार्ट रोड, लिंबूराव ही रेल्वे स्थानके आहेत.

मुंबईहून दार्जिलिंगला जाण्यासाठी 48 तास म्हणजे दोन दिवस लागतात.

विमानाने दार्जिलिंगला जाण्यासाठी मुंबई ते दार्जिलिंग (बागडोगरा) तीन ते साडेतीन तास लागतात. मुंबई ते दार्जिलिंग हंगामाप्र‌माणे 4000 ते 6000 रू. विमान तिकिटासाठी मोजावे लागतात.

कुठे आहे दार्जिलिंग ? Where is Darjeeling?

दार्जिलिंग जिल्हा पश्चिम बंगाल राज्याच्या अगदी उत्तर टोकाला आहे. सिक्कीमच्या दक्षिणेला लागून दार्जिलिंगची हद्द आहे. दार्जिलिंगपासून नेपाळ आणि भूतान (Bhutan) या देशांच्या हद्दी जवळच आहे. पश्चिमेला बिहार राज्याची हद्द लागते. भारतातील एक सृष्टी सौंद‌र्याने नटलेला जिल्हा पाहायचा असेल तर नक्कीच आपल्याला रेल्वे किंवा विमानाने जावे लागेल .

पैठण एक पर्यटन स्थळ. Paithan

दार्जिलिंग कशासाठी प्रसिद्ध आहे? What is Darjeerling Famous for?

दार्जिलिंग हे भारतातील आणि पश्चिम बंगाल राज्यातील निसर्ग सौंद‌र्याने नटलेल्या थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. सहलीतून एक आठवड्यासाठी दार्जिलिंगचा आनंद घेता येणार नाही.त्यासाठी किमान पंधरा [15] दिवस दार्जिलिंगसाठी राखीव ठेवून मस्तपैकी एन्जॉय करायला गेले पाहिजे. थंड हवेच्या ठिकाणा बरोबरच येथील डोंगर माथ्यावरील बहरलेले चहाचे मळे पाहण्याचा आनंद लुटता घेतो. टायगर हिल, व्हिक्टोरिया धबधबा, गंगामाई सरोवर, टॉय ट्रेन ही ठिकाणे पाहिल्यानंतर मन तृप्त होते. या सर्व ठिकाणांना पाहण्यासाठी आपण दार्जिलिंगला जायचे आहे.

दार्जिलिंगमधील प्रसिद्ध ठिकाणे – Famous Places in Darjeeling

1. चहाचे मळे : Tea Plantations in Darjeeling

भारतातील बहुतांश भारतीय म्हणजे जवळ जवळ 80 ते 85% लोक रोज सकाळी उठल्याबरोबर फ्रेश होऊन चहा किंवा कॉफी घेतात. चहा, कॉफी हे भारतीयांचे आवडते पेय आहे दार्जिलिंगचा चहा खूप प्रसिद्ध आहे. येथे दर्जेदार चहा मिळतो. सुंगंध आणि चवीसाठी दार्जिलिंगचा चहा प्रसिद्‌ध आहे. दार्जिलिंग येथे नैसर्गिक पद्धतीने चहा काढतात. चहाची पाने काढून ती उन्हात नैसर्गिक रीत्या वाळवली जातात. त्यामुळे दार्जिलिंगच्या चहाची चव आणि गुणवत्ता सरस आहे. दार्जिलिंगच्या मातीचा गुणधर्म उत्तम असून पाण्याचा चांगला निचरा होतो. दार्जिलिंगच्या ओलॉंग चहाला जगभर मागणी आहे. ओलॉंग म्हणजे काळा ड्रॅगन. हा चहा गुणक्तापूर्ण असतो. हा चहा नैसर्गिक पद्धतीने तयार केला जातो. त्यामुळे या ओलॉंग चहाला खूप मागणी आहे. दार्जिलिंगला गेलात तर ओलॉंग चहा घेऊन या.

दार्जिलिंगला पर्यटनला आल्यानंतर हिमालयातील पर्वत रांगेत हुंदडताना भानच विसरायला होते. येथील रेखीव, हिरवेगार मळे पाहताना डोळे तृप्त होतात. मळ्यांमधून फिरण्यासाठी पायवाटा आहेत. आनंद घेताना चहाच्या पानांवर नाजूक हात फिरवायला आणि कोवळे पान हळूच तोडून बोटांनीच कुस्करून त्यांचा गंध घ्यायला वेगळे तिकीट काढावे लागत नाही

2. व्हिक्टोरिया धबधबा : Victoria falls, Darjiling:

दार्जिलिंग शहरालगतच हा व्हिक्टोरिया धबध‌बा असून या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी प्रत्यक्ष घबधब्या जवळ जाणे आव‌श्यक आहे. दार्जिलिंग परिसरातील हा एक अतिशय सुंदर असा धबधबा असून हा धबधबा कॅलिझोरा नावाच्या छोट्या प्रवाहापासून तयार झाला आहे. धबधब्याची उंची 100 फुटा पेक्षा जास्त असून या प्रवाहाच्या वर दोन्ही बाजूच्या टेकड्यांवर जोडणारा एक पूल आहे. हा पूल 1912 साली ब्रिटिशांनी बांधला असून तो आजही सुस्थितीत आहे. या पुलाचे नाव ब्रिटिशांनी व्हिक्टोरिया पूल असे ठेवले होते. या व्हिक्टोरिया पुलावरून चालत जाऊन धबधबा पाहायचा .या धबधब्याला व्हिक्टोरिया फॉल्स (Victoria Falls) असे नाव दिले आहे.

तीस्टा [Teesta) ही दार्जिविंग मधील महत्त्वाची नदी असून ती सिक्कीममध्ये उगम पावते. सिक्कीमच्या कडेकपारीतून हेलकावे घेत ही Teesta नदी दार्जिलिंग मध्ये येते. दार्जिलिंगमधून ती पुढे जाऊन ब्रह्मपुत्रेला जाऊन मिळते. या टीस्टा नदीवरच हा व्हिक्टोरिया धबधबा तयार झाला आहे. या धबधब्याच्या खाली जलविद्युत प्रकल्प उभारलेला असून त्यातून तयार होणारी वीज दार्जिलिंगसाठी वापरली जाते. ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलाची अवस्था आता बिकट झाली आहे. तरी सुद्धा ‌या पुलावर जाऊन धबधब्याचा आनंद घेता होतो.

3. टॉय ट्रेन दार्जिलिंग: Toy Train, Darjiling:

तामिळनाडू‌ राज्यात उटी या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळे पाह‌ण्यासाठी टॉय ट्रेन आहे. त्याच प्रमाणे दार्जिलिंग येथेही काही निसर्गातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी टॉय ट्रेन आहे. टॉय ट्रेन-Toy Train ची कल्पना ही ब्रिटिशांची असून त्यांनीच या दोन्ही ठिकाणच्या Toy Trains निर्माण करुन पर्यटकांची सोय केली आहे. दार्जिलिंग ते धूम असा Toy train चा प्रवास आहे. या Toy Train चे तिकीट 1000 से 1500 रुपये घेतात. महागड्या तिकिटाबद्दल बद्द‌ल अनेक प्रवासी नाराजी व्यक्त करतात. त्या मानाने टॉय ट्रेन मध्ये स्वच्छता असेलच असे नाही. पण काही ठिकाणे पाहण्यासाठी आपल्याला Toy Train चा वापर करावा लागतो. दार्जिलिंगच्या दऱ्याखोऱ्याचे दृश्य Toy Train ने टिपता येते.

उटी: Ooty

(4) गंगामैना सरोवर: Ganga maya Lake:

दार्जिलिंग पासून 12 किलोमीटर अंतरावर रॉक गार्डन आहे [Rock Garden] ही Rock Garden मानव निर्मित असून ती खूपच सुंदर आहे. जितकी बाग, सुंदर त्याहीपेक्षा किती तरी पटीने येथील डोंगर रांगा आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे आहे. या ठिकाणी आल्यावर कुठे तरी स्वर्गात आल्यासारखे वाटते.

रॉक गार्डन (Rock) Garden) च्या पुढे गंगामैया सरोवर आहे. हे गंगामैया सरोवर [ Ganga maya Lake] अत्यंत विलोभनीय दृश्यांनी नटलेले आहे. या गंगामैया सरोवरात बोटिंग करता येते. हे सरोवर नैसर्गिक आहे. येथील परिसर नयनरम्य आणि विलोभनीय आहे.

(5) टायगर हिल: Tiger Hill: Darjeeling

दार्जिलिंग पासून 11 किलोमीटर अंतरावर टायगर हिल Tiger Hill हा Point आहे. तुम्ही हिमालयाला म्हणजे, दार्जिलिंगला गेलात की टायगर हिल पाहायला निश्चित जायचे. याचे कारण म्हणजे हे ठिकाण दार्जिलिंग पेक्षा उंचावर आहे. आणि दुसरे म्हणजे या टायगर हिलवर गेल्यावर हिमाल‌यातील दोन उंच पर्वत शिखरे येथून दिसतात.

हे टायगर हिल पाहण्यासाठी सकाळी सूर्योद‌यापूर्वी या टेकडीवर पोहोचायला पाहिजे. स्थानिक वाटाड्या घेऊन चालत पण जाता येते. येथून कांचनगंगा शिखर (8538 मीटर) दिसते .त्यासाठी या शिखरावर सूर्यप्रकाश पोहोचला पाहिजे.जगातील सर्वात उंच शिखर (8848 मी) येथून पाहता येते. येथून कांचनगंगा शिखर जवळ आहे आणि त्या पेक्षा माऊंट एव्हरेस्ट दूर आहे. त्यामुळे कांचन गंगा शिखर माउंट एव्हरेस्ट पेक्षा उंच दिसते. या दोन्ही शिखरावर आपल्याला जाता येत नाही, पण पाहण्याचा आनंद घेऊ शकतो. आपल्या जवळ दुर्बिन असेल तर अधिक उत्तम….

हे सुद्धा आवर्जून वाचा

1. मुंबईः एक पर्यटन स्थळ / Elephanta caves 

Leave a comment