मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी. प्रचंड लोकसंख्या आणि मुंग्याच्या वारुळासारखी गर्दीत राहणारी माणसं. दमट हवामान आणि वाहतुकीची कोंडी.सर्वांत जास्त कर रुपाने भारताच्या तिजोरीत पैसा भरणारे शहर. भारतीयांनाच नव्हे, तर परकीयांनाही ज्या मुंबईचे आकर्षण आहे, ती मुंबई. फिल्म इंडस्ट्रीज आणि सिनेकलाकारांना आश्रय देणारी ती मुंबई. याच मुंबईतील काही प्रेक्षणीय, ऐतिहासिक वारसा असलेली आणि सांस्कृतिक , वैज्ञानिक ठेवा जतन करण्याऱ्या ठिकाणांची आता आपण ओळख करून घेणार आहोत——-
मुंबईतील प्रेक्षणीय ठिकाणे: Famous and Spectacular Places in Mumbai.
1. गेट वे ऑफ इंडिया-Gate way of India.
2. घारापुरी येथील एलिफंटा केव्ह्ज – Elephanta, Caves, Garapuri
3. नेहरु तारांगण – Nehru Planetarium.
4. ताजमहाल हॉटेल – Tajmahal Hotel.
5.जुहू चौपाटी – Juhu beach
6. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान – Sanjay Gandhi National Park.
7. हाजी अली दरगाह – Haji Ali
3. छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय – Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya.
१. हँगिंग गार्डन. Hanging Garden
10. ग्लोबल विपश्यना पागोडा – Globle Vipassana Pagoda.
11. मरीन ड्राइव्ह Marine Drive – Sunset Point.
12. दादासाहेब फाळके चित्रनगरी, Dadasaheb Falke Filmcity.
13.BDL Museum – भाई दाजी लाड संग्रहालय,
कसे पाहाल मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे ? How to see Spectacular Places in Mumbai?
मुंबई हे घाईगर्दीचे शहर असले तरी गेट वे ऑफ इंडिया जवळ अनेक पर्यटन बसेस, टॅक्सी, कॅब मिळतात.बसेस किंवा अन्य वाहनांच्या साहाय्याने आरामात मुंबईदर्शन करु शकता. सकाळी नऊ वाजता गेट वे ऑफ इंडिया जवळ गेल्यावर गेलात तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुंबईदर्शन पूर्ण होते.
आता आपण मुंबईतील प्रेक्षणीय आणि पर्यटन स्थळांची ओळख करून घेऊया——–
1. गेट वे ऑफ इंडिया-Gate Way of India.
दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरुन अरबी समुद्राच्या दिशेने पुढे गेल्यास गेट वे ऑफ इंडिया दिसते. गेट वे ऑफ इंडिया अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. 1911 साली इंग्लंडची राणी मेरी (व्हिक्टोरिया राणी) आणि राजपुत्र जॉर्ज यांनी भारताला भेट दिली होती. या भेटीच्या आठवणीसाठी ब्रिटीश सरकारने गेट वे ऑफ इंडिया हे स्मारक उभारले. 31 मार्च 1913 साली या इमारतीचा पायाभरणी समारंभ झाला व 1924 साली ही इमारत बांधून पूर्ण झाली. जॉर्ज विटेट हा या इमारतीचा वास्तुविशारद होता.4 डिसेंबर 1924 साली या इमारतीचे उद्घाटन झाले. या इमारतीची उंची 26 मीटर असून रुंदी 15 मीटर आहे. गेट वे ऑफ इंडिया ही एक स्वागत कमान आहे.
गेट वे ऑफ इंडिया जवळच ताजमहाल हॉटेल, ओबेरॉय हॉटेल ही पंचतारांकित हॉटेल्स आहेत. गेट वे ऑफ इंडियाच्या ठिकाणाहून एलिफंटा केव्हज पाहण्यासाठी घारापुरीला जायचा मार्ग आहे. त्यासाठी बोटीतून जावे लागते.
2. ताजमहाल हॉटेल-Tajmahal Hotel.
ताजमहाल हॉटलची इमारत गेट वे ऑफ इंडियाच्या जवळच आहे. ताजमहाल हॉटेल हे एक पंचतारांकित [ Five Stars] हॉटेल असून ते जगप्रसिद्ध हॉटेल आहे. टाटा समूहाने ताजमहाल हॉटेलची निर्मिती केली असून 16 डिसेंबर 1903 रोजी हे हॉटेल सर्वांसाठी खुले झाले. या हॉटेलमध्ये 46 सूट्स असून 565 खोल्या आहेत. याशिवाय भव्य भोजनकक्ष आहे. रतन टाटा यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून ताज हॉटेल निर्माण झाले.
26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानी अतिरेकी अरबी समुद्रातून येऊन ताज होटेलमध्ये घुसले होते. जवळ जवळ साठ तास मुंबई पोलिस आणि अतिरेकी यांच्यात धुमश्चक्री चालू होती. यात अतिरेक्यांचा खातमा झाले. ताजमहाल हॉटेलचे नुकसान झाले. काही दिवसांतच ताज हॉटेलचा व्यवहार सुरळीतपणे सुरु झाला. जीवनात एकदा तरी ताज हॉटेलला भेट द्यावी आणि मुक्काम करावा असेच हे ताजमहाल हॉटेल आहे.
3. एलिफंटा केव्हज, घारापुरी: Elephanta Caves Gharapuri
घारापुरीची एलिफंटा लेणी ही रायगड जिल्ह्याच्या हद्दीत येतात. ही लेणी पाहायला मात्र मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून जाव लागते. घारापुरी हे एक छोटेसे बेटच आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून एलिफंटा केव्हज सुमारे 10 किलोमीटर सुमुद्रमार्गे बोटीने प्रवास करुन पाहता येते.
कडक उन्हाळ्यातील एप्रिल, मे महिना आणि पावसाळ्यातील जून, जुलै, ऑगस्ट हे तीन महिने वगळता अन्य कोणत्याही महिन्यात घारापुरीची एलिफंटा लेणी पाहण्याचा आनंद घेता येतो.
दक्षिण भारतात राष्ट्रकुट घराण्याची सत्ता होती. त्यावेळी एलिफंटा लेणी खोदण्याचे काम सुरू झाले आणि पूर्ण पण झाले. इ.स.9 वे ते 11 वे शतक या काळात ही लेणी निर्माण झाली आहेत. संपूर्ण लेणी बेसॉल्ट खडक खोदून निर्माण केली आहेत.
घारापुरी लेण्यांचे वैशिष्ट्य :
घारापुरी बेटावर Elephanta Caves म्हणून प्रसिद्ध असलेली लेणी पाहण्यासाठी तिकीट काढावे लागते. परदेशी पाहुण्यांना ज्यादा तिकीट असते. येथे एकूण पाच लेणी खोदलेली आहेत.
लेणे क्रमांक 1:
ही गुहा मुख्य लेणे म्हणून ओळखले जाते. हे लेणे थोडे विस्तीर्ण आहे. या लेण्यात 729 चौरस मीटरचा मंडप आहे. येथे दालनात सुमारे 15 फुट उंचीची त्रिमुखी शिवाची मूर्ती आहे. ही तीन मुखे म्हणजे उमा, शिव आणि रुद्र (शिवाचा अवतार) हे होय.
लेणे क्रमांक 2:
या लेण्यात रावण आपल्या वीस भुजांनी कैलास पर्वत हालवण्याचा प्रयत्न करीत आहे. येथे शिव आणि पार्वती कैलास पर्वतावर बसलेले आहेत. शिवाची मुद्रा शांत आणि निश्चल आहे. पार्वती बावरलेली आहे. तिला शंकर खांद्यावर हात ठेवून आधार देत असल्याचे शिल्प उभारलेले आहे.
या लेण्याला रावणानुग्रह म्हणतात.
लेणे क्रमांक 3:
हे लेणे सुद्धा खूप सुंदर लेणे असून या लेण्यात शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचे दृश्य आहे. हे दृश्य खूप बोलके असून शिव-पार्वती या दोन भिन्न संस्कृतीतील विवाहाला अनेक देवदेवता आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा देत आहेत ,असे सुंदर दृश्य रेखाटले आहे.
लेणी क्रमांक 4/5 व इतर
इतर लेण्यांमध्ये महायोगी तपस्वी शिव, गंगा अवतरण, अर्धनारी, भैरव-महाबलीची मूर्ती अशी अनेक शिल्पे आहेत.
आयुष्यात एकदा तरी घारापुरीची लेणी पाहावीत. येथे शोकेसमध्ये ठेवण्यासाठी समुद्रातील खूप सुंदर वस्तू मिळतात. वस्तू खूप महागड्या असल्या तरी आठवण म्हणून एखादी वस्तू घेण्यास हरकत नाही.
4. नेहरु तारांगण Nehru Planetarium: Mumbai
लहान मुलांनी आणि खगोल शास्त्राच्या अभ्यासकांनी, तसेच आकाश निरीक्षणाची आवड असलेल्या लोकांनी नेहरू तारांगण पाहायला आवश्य जावे. भारतात नेहरू तारांगण या नावाने मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळूरु आणि प्रयागराज अशी पाच तारांगण आहेत. त्यांतील मुंबई येथील तारांगणाबद्दल माहिती घेऊया—–
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून 12 किलो मीटर अंतरावर नेहरू तारांगण आहे. येथून कॅबने किंवा ट्रॅव्हल बसने (मुंबईदर्शन) नेहरू तारांगणला जाऊ शकतो.
नेहरू तारांगणमध्ये सुमारे 1 तासाचा शो असतो.
या कालावधीत आपण जणू रात्रीच्या वेळी अवकाश निरीक्षण करत आहोत, असा भास होतो.अवकाशातील गृह, तारे धूमकेतू, तारकापुंज, कुष्णविवरे, उल्कापात अशा कितीतरी घटना आपण प्रत्यक्ष पाहत आहोत असे वाटते.
बारा राशी, त्यांची अवकाशातील ठिकाणे, सप्तर्षी, 27 नक्षत्रे व त्यांची अवकाशातील ठिकाणे अगदी सुरेखपणे दाखवले जाते. मी 30 वर्षांपूर्वी नेहरू प्लॅनेटेरिअम पाहिले होते. आजही मला ते अवकाश निरीक्षण आठवते.
म्हणून नेहरू प्लॅनेटेरिअमला आवश्य भेट दयावी, असेच ते ठिकाण आहे.
आवर्जून वाचावे असे काही