चाकणचा किल्ला: Chakan Fort / Sangramgad

छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘ज्याचे किल्ले,त्याचे राज्य’ हे सूत्र लक्षात ठेवून स्वराज्याची वाटचाल केली होती. स्वराज्यात लहानमोठे 350 किल्ले होते. पुणे जिल्ह्यातील Chakan Fort हा त्यांतीलच एक. फिरंगोजी नरसाळेने देदीप्यमान पराक्रम याच किल्ल्यावर केला होता.हा किल्ला Sangramgad’ म्हणूनही ओळखला जातो. शाहिस्ताखान आणि फिरंगोजी नरसाळा यांच्या इ.स. 1663 मध्ये जोरदार धुमश्च‌क्री साली होती. यांत फिरंगोजी नरसाळेचा पराभव झाला होता. तोच हा चाकणचा किल्ला, चाकणच्या या संग्रामगडाचा आपण परिचय करून देणार आहोत.

गडाचे नावः चाकणचा किल्ला

गडाचे दुसरे नावः संग्रामगड

समुद्र सपाटीपासून उंची: 675 मीटर

जवळचे गाव: चाकण

जिल्हा. : पुणे

पुण्यापासून अंतर : 35 किमी

गडाची सध्याची स्थिरी :बिकट. दुरुस्ती आवश्यक

किल्ल्याचा प्रकार : भुईकोट किल्ला,

पुणे जिल्ह्यातील चाकण या गावी असलेल्या संग्रामगडला कसे जायचे ते पाहू.

चाकणला कसे जायचे ? How to go to see Chakan Fort ?

पुण्याहून चाकणला जाता येते. पुण्याच्या स्वारगेट पासून चाकणचा किल्ला 35 किलोमीटर अंतरावर आहे. येथून बसने चाकणला जाता येते.

पिंपरी चिंचवड बस स्थानकापासून चाकणला जाता येते. पिंपरी- चिंचवड बसस्थानक ते चाकणचा किल्ला 18 किलोमीटर अंतर आहे.

देहूला संत तुकाराम महाराजांचे मंदिर आहे. ते पाहून चाकणला जाता येते. देहू ते चाकण अंतर 16 किलोमीटर आहे.

मोशीतून चाकणचा किल्ला 10 किलोमीटर अंतरावर आहे.

आळंदीपासून चाकणचा किल्ला 12 किलोमीटर अंतरावर आहे.

अंजदीव किल्ला: गोवा: Anjediva island

चाकणच्या संग्रामगडचा इतिहास: History of Sangramgad / Chakan

इ.स. 1347 मध्ये दक्षिण भारतात गुलबर्गा येथे हसन गंगू या सुलतानने बहमनी सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी चाकणचा किल्ला बहमनी सल्तनतकडे होताः पुढे विजयनगरचे साम्राज्य आणि बह‌मनी साम्राज्य यांच्यात वर्चस्व वादातून सत्ता संघर्ष सुरु झाला. पुढे इ.स. 1527 मध्ये बहमनी सल्तनत पाच नवीन सत्तांमध्ये विभागली गेली. अहमद‌न‌गरची निजामशाही, गोवळ‌कोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही, वऱ्हाडची इमाद‌शाही आणि बीदरची बरीद‌शाही अशा पाच नवीन सत्तांमध्ये बहमनी सत्तेचे तुकडे झाल्यावर चाकणचा किल्ला अहमद‌नगरच्या निजामशाहकडे गेला.

इ.स. 1590 मध्ये अह‌मद‌नगरच्या निजामशाहाने चाकणचा किल्ला आणि शिवनेरी किल्ला शहाजी राजे यांना जहागिरी म्हणून दिला होता. त्यापूर्वी शहाजी राजे यांचे पणजोबा बाबाजी भोसले हे वेरुळला वास्तव्य करून होते. त्यांना दौलताबादचा सुभेदार अमरिशा याने चाकण आणि चाकणचा परिसर अशा 84 परगण्यांची जहागिरी दिली होती. इ.स. 1630 मध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला.
त्यावेळी चाकणचा किल्ला आणि शिवनेरी हे किल्ले आदिलशाहीकडे होते. हे किल्ले शहाजीराजांना जहागिरी म्हणून मिळाले होते. शिवरायांचा जन्म झाल्यावर किमान दोन वर्षांत जिजाऊ आणि बाल शिवबा शहाजीराजांकडे गेले. शहाजीराजे यांनी तेथे शिवबाला युद्धकला, युद्धनीती, राज्यकारभाराचे धडे दिले. पुन्हा शिवराय आणि जिजाऊ पुण्याला आले आणि तेथे लालमहालात त्यांचा विवाह फलट‌णच्या नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यातील सई‌बाईशी झाला. जिजाऊ आणि शहाजी राजे यांच्या प्रेरणेने शिवरायांनी इ.स. 1647 साली तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण बांधले होते. त्याच वर्षी म्ह‌णजे 1647 साली चाकणचा किल्ला जिंकून घेतला आणि स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून फिरंगोजी नरसाळा याला नेमले. किल्ला जिंकण्यांवर शिवरायांनी या गडाचे नाव ‘संग्रामगड’ असे ठेवले होते.

फिरंगोजी- शाहिस्ताखान लढाई: Battle of Chakan

इ.स. 1660 साल हे शवरायांसाठी कठीण काळ होता.त्यावेळी शिवराय पन्हाळगडावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले होते.तर औरंगजेबने शाहिस्ताखानला (मामा) स्वराज्यावर पाठवले होते.

23 जून 1630 रोजी शाहिस्ताखानाने चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला होता.त्यावेळी चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा होता.तो चतुर, धाडसी किल्लेदार होता. शाहिस्ताखानाच्या 20000 से 25000 सैनिकांनी चाकणचा किल्ला घेरला होता. गडावर केवळ 300 ते 500 मावळे होते; पण ते डगमगले नाहीत. शाहिस्ताखान 56 दिवस गडाला वेढा टाकून बसला होता.

14 ऑगस्ट 1660 रोजी शाहिस्तानाच्या सैन्याने गडाच्या ईशान्येकडे भुयार पाडले आणि हातघाईची लढाई सुरु झाली. शाहिस्ताखानाच्या बलाढ्य सैन्यापुढे 300-400 मावळे कसे तग धरणार ? शेवटी मावळयांनी बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला. आणि एक दिवस पुढे ढकलला. शेवटी नाइलाजाने मावळ्यांनी चाकणचा किल्ला 15 ऑगस्ट 1630 रोजी शाहिस्ताखानाकडे सोपवून आपली सुटका करून घेतली. चाकणच्या या लढाईत शाहिस्ताखानाचा विजय झाला होता.

शाहिस्ताखानाची फजिती: Shahistakhan’s Fajiti

शिवराय पन्हाळगडावरून सुटून आल्यावर त्यांनी शाहिस्ताखानाला धडा शिकवण्यासाठी 5 एप्रिल 1663 रोजी अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेऊन शिवराय लाल महालात घुसले. खान बेसावध होता. जनानखान्यात घुसून शिवरायांनी खानाची बोटे छाटली आणि शिवराय तातडीने माघारी फिरले.इकडे कात्रज घाटात बैलांच्या शिंगाना मशाली बांधून खानाची दिशाभूल केली. त्यामुळे मुघलांचा पाठलाग फसला; पण या घटनेमुळे खान घाबरला आणि त्याने पुणे सोडले.

शाहिस्ताखान गेल्यावर शिवरायांनी चाकणचा किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. पुढे 1665 साली मिर्जा राजे जयसिंगाच्या रुपाने स्वराज्यावर मोठे संकट आले. पुरंदरच्या किल्ल्यावर घनघोर लढाई झाली. यांत फिरंगोजी नरसाळ्याला प्राण गमवावा लागला. शेवटी शिवरायांनी माघार घेऊन 11 जून 1665 रोजी पुरंदरचा तह केला. या तहात शिवरायांनी चाकणचा किल्ला मुघलांना दिला. पुढे आग्ऱ्याहून सुटका (1666) झाल्यावर शिवरायांनीच चाकणचा किल्ला पुन्हा ताब्यात घेतला.

चाकणच्या गडावरील प्रेक्षणीय स्थळे: Spectacular Places Of Chakan

(1) प्रवेशद्वार: Gate of Chakan Fort:

चाकणचा किल्ला पडझ‌डीत आला असला तरी काही अवशेष अजून आहेत. गडाचे प्रवेशद्वार नागमोडी आकाराचे आहे. शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी प्रवेशद्वारावरच आगीची धुराडे धोंड्याची व्यवस्था करण्याची सोय आहे. येथून बालेकिल्ल्यापर्यंत जाण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात.

(2) तटबंदी आणि बुरूज : Wall and Towers:

भुईकोट किल्ल्याचे तट भक्कम असावे लागतात. तसेच बुरुजही भक्कम बांधावे लागतात. फिरंगोजीने शाहिस्ताखानाच्या 25000 फौजेला 56 दिवस या तटबंदीच्या आणि बुरु‌जांच्या जीवावर लढले होते; पण या चाकणमधील काही ग्रामस्थांना या ऐतिहासिक ठेव्याचे काही देणे-घेणे नव्हते. त्यामुळे त्यांनी बुरुजांचे आणि तटबंदीचे दगड लंपास केले आहेत.

2017 साली महाराष्ट्र राज्य सरकारने ‘राज्य संरक्षित स्मारक’ यादीन चाकणच्या संग्राम‌दुर्गाचे नाव घातल्यामुळे आता थोडी चोरी कमी झाली आहे.

3) खंदक: Ditch of Chakan:

प्रत्येक भुईकोट किल्ल्याला खंदक असतेच, या किल्ल्यावरही खंद‌काची सोय सुरक्षितता म्हणून आहे. आज तटबंदीची, गडवरील बुरुजांची माती पडून खंद‌काचे अस्तित्व संपत चालले आहे.

2013 साली चाकणच्या गडाची दुरुस्ती करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने 1 कोटीहून अधिक निधी दिला होता. पण निकृष्ट कामामुळे कंत्राटदाराने बांधलेली तटबंदी ढासळली.

चाकणचा किल्ला स्वराज्याच्या इतिहासातील एक सुवर्णपर्ण आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे. इतिहास घ्यायला गडकोटांची माहिती उप‌युक्त ठरते.

हे सुद्धा आवर्जून वाचा

  1. आग्वाद किल्ला / Aguada Fort, Goa
  2. दिल्लीचा लाल किल्ला: Red Fort

Leave a comment