महाराष्ट्रात अनेक पवित्र ठिकाणे आहेत. संस्कृतीचा वारसा जपणारी गावे, शहरे आहेत. संत वाङ्मय आणि वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारी गावे आहेत .आळंदी (Alandi) हे असेच गाव आहे. या आळंदीत संत ज्ञानेश्वर यांची समाधी [Samadhi Of Saint Dnyaneshwar] आहे त्या आळंदी विषयी आणि त्यांच्या समाधी (Tomb) विषयी आपण माहिती घेणार आहोत.
आळंदीची संक्षिप्त माहिती: Brief Information of Alandi:
ठिकाणाचे नाव: ज्ञानेश्वरांची समाधी
ठिकाण : आळंदी.
समाधी तारीख : निश्वित संगता येत नाही.
जिल्हा : पुणे
राज्य : महाराष्ट्र
स्वारगेट पासून अंतर : 24 किमी
ठिकाणाचा प्रकार : सांस्कृतिक
आळंदीला कसे जायचे? How to go to see Alandi?
1.आळंदी हे पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यातील स्वारगेट पासून आळंदी 24 किलोमीटर अंतरावर आहे. येथून बसने जाता येईल.
2. पुण्यातील पिंपरी-चिंचवड बस स्थानकापासून 10 किमी अंतरावर आळंदी आहे. येथून आळंदीला बसने जाता येते.
3. मोशीपासून आळंदी अगदी जवळ आहे तुम्ही नाते- वाईकांकडे मोशीला आला असाल तर तेथून आळंदी 6 किलोमीटर आहे.येथून कॅबने, सायकलने, बाईकने आळंदीला जाता येते.
4. चाकणचा किल्ला पाहून आळंदीला जाता येते. चाकण ते आळंदी अंतर 12 किलोमीटर आहे.
आळंदीचे जुने नाव काय आहे? What is the old name of Alandi?
प्राचीन काळापासून आळंदीला वेगवेगळी नावे आहेत. आळंदीला कपिल, अलका, वारुण, आनंदविपिन, सिद्धक्षेत्र अशी नावे आहेत. याशिवाय अलंकापुरी, अलंकापूर, अलकावती या नावानेही आळंदी ओळखली जाते .कपिल किंवा सिद्धक्षेत्र या नावावरून कधी काळी आळंदीला बळीराजाचे चुलते आणि दत्तात्रेयांचे सासरे कपिलमुनींचे वास्तव्य असावे असे वाटते.
अलंकापुरी या नावाचाच अपभ्रंश आळंदी असा झालेला असून सध्या आळंदी हेच स्थायी (Permanent) नाव आहे.
आळंदी कशासाठी प्रसिद्ध आहे? What is Alandi famous for ?
आळंदी या गावात संत ज्ञानेश्वरांची समाधी (Tomb of Dnyaneshwar) आहे. या गावात संत चांगदेव संत ज्ञानेश्वरांना भेटायला आले होते. त्या वेळी येथे ज्ञानेश्वर , निवृत्तीनाथ ,सोपानदेव , मुक्ताबाई एका पडक्या भिंतीवर बसले होते. आणि तेथेच त्यांनी चांगदेवाचे स्वागत केले होते. आज भिंतीला सुरक्षित बांधकाम केले आहे.
आम्ही मित्रमंडळी 1983/84 च्या दरम्यान आळंदीला गेलो होतो. त्यावेळी संत ज्ञानेश्वर आणि भावंडे ज्या भिंतीवर बसले होते, ती भिंत प्रत्यक्ष पाहता आली. पण अंधभक्त त्या भिंतीची चिमुटभर माती घेऊन जाऊ लागले. त्यामुळे भिंत हळूहळू कमी होऊ लागली. त्यामुळेच त्या जागेवर नवीन भिंत बांधून घेतली. संत ज्ञानेश्वर चमत्कारिक नव्हते. चांगदेवाच्या भेटीसाठी त्यांनी भिंत चालवली. ही गोष्ट, खोटी आहे. संतांना चमत्कारिक ठरवणे चुकीचे आहे.
संत ज्ञानेश्वर जन्म कथा: Birth Story of Dnyaneshwar
संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे यांचे आईवडील म्हणजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी होय. विठ्ठलपंतांनी विवाहानंतर अचानक संन्यास घेतला.ते विरक्त जीवन जगू लागले. काही वर्षांनी त्यांच्याच गुरुंच्या आज्ञेवरून त्यांनी संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात प्रवेश केला आणि त्यांचा संसार सुरु झाला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांना चार मुले झालीत. ती चार मुले म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई होय. तत्कालीन चालीरीतीनुसार सना- तन्यांना ही गोष्ट रुचली नाही. त्यांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांना अक्षरशः छळले.मानसिक छळ केला. या सनातन्यांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीला देहांत प्रायचित्ताची शिक्षा दिली. किमान आपली मुले तरी सुखाने जगतील म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी कड्यावरुन उड्या टाकून जीव दिला.देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली ; पण मुलांच्या वाट्यालाही तेच आले. संन्याशाची पोरे म्हणून सगळे हिणवू लागले त्यांना कोणी घड भिक्षा सुद्धा देत नव्हते. या चार मुलांना अक्षरशः वाळीत टाकले होते.
संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना सनातन्यांनी खूप छळते. त्यांना जीव नकोसा केला. अशा परिस्थितीवर मात करून ज्ञानेश्वर संस्कृत शिकले. आणि गीता प्राकृत भाषेत लिहिली. त्यांनी सर्वसामान्य लोकांना ज्ञानाची कवाडे खुली केली. हेही सनातन्यांना रूचले नाही.त्यामुळे त्यांचा छळ आणखी वाढला.
पैठणला काय घडले ? What’s happened in Paithan about Dnyaneshwar?
संत ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. त्यांना आता ज्ञानेश्वरी लिहायची होती. त्यासाठी गुरु म्हणून कोणी तरी दीक्षा द्यायला लागत होती. म्हणून ते पैठणला गेले. तेथील पंडितांनी विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. त्यांची तोंडे बंद केली; पण तरी सुद्धा त्यांना संन्याशाचे पोर म्हणून दीक्षा दिली नाही.
संत ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसह नेवासे या ठिकाणी आले. तेथे त्यांनी आपले ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ यांना गुरु मानले. त्यांचा आशीर्वाद घेतला आणि ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली.येथेच त्यांनी ज्ञानेश्वरी पूर्ण केली. सर्व साधारणपणे वयाच्या पंचवीसाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला.
आळंदीत ज्ञानेश्वर: Dnyaneshwar in Alandi.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केल्यानंतर ती सर्व भावंडे अलंकापुरीत आलेत. आळंदीतही तेच वाट्याला आले. संन्याशाची पोरे म्हणून हिणवायला सनातनी कमी पडले नाहीत. त्यांना तुच्छतेची वागणूक दिली. भिक्षा दिली नाही. एक वेळ तर अशी आली की चारही भावंडांना जिवंत समाधी घेण्यास (आत्महत्या करण्यास) सनातन्यांनी भाग पाडले. शेवटी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. सासवड येथे सोपानदेवाने समाधी घेतली.निवृत्तीनाथाने त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली तर मुक्ताबाईने कोथळी, जिल्हा जळगाव येथे समाधी घेतली. चार भावंडांना चार ठिकाणी जाऊन समाधी (आत्महत्या suicide) घ्यावी लागते. यापेक्षा वाईट ते काय ?
संत ज्ञानेश्वर मंदिर, आळंदी Dnyaneshwar Temple, Alandi
संत ज्ञानेश्वरांनी ज्या ठिकाणी समाधी घेतली. त्या ठिकाणी मंदिर बांधले आहे .हे मंदिर खूप जुने आहे. काही ठिकाणी नवीन सुधारणा केली आहे. संत तुकाराम यांनी सतराव्या शतकात मंदिराच्या समोरील मंडप बांधून घेतला आहे. तो सभामंडप आजही पाहायला मिळतो.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका ग्रंथ लिहून पूर्ण केल्यावर चार भावंडे आळंदीला आले होते. आळंदीतील सनातन्यांनी प्रचंड त्रास दिल्यामुळे ज्ञानेश्वरांना समाधी घेणे भाग पडले. समाधीच्या ठिकाणीच मंदिर उभारलेले आहे.
छान लेख
छान वास्तव लेख…