मध्य प्रदेश राज्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे Pachmarhi होय. भारतात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. आणि हो बहुतांश ठिकाणे इंग्रजांच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा असलेली आहेत. पचमढी त्याहून नवीन नाही. येथेही उन्हाळ्यात इंग्रजाचे वास्तव्य असायचे. या पचमढी परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील सर्वात उंच शिखर (भूपगड) हे सुद्धा या सातपुडा पर्वतातच आहे. शिवाय पावस धबधबा, जटाशंकर अप्सरा विहार, महादेव गुफा, चौरागढ़ असे कितीतरी पॉईंट पाहण्यासारखे आहेत. त्यांची आपण ओळख करून घेऊया –
पचमढीची संक्षिप्त माहिती: Brief Information of Pachmarhi:
ठिकाणाचे नाव : पचमढ़ी
प्रसिद्धी : थंड हवेचे ठिकाण
ठिकाणाचा प्रकार : गिरिस्थान
पर्वतरांग: सातपुडा
जिल्हा :होशंगाबाद
राज्य : मध्यप्रदेश
होशंगाबाद पासून अंतर: 119 किलोमीटर
समुद्र सपाटीपासून उंची : 1352 मीटर.
पचमढीला कसे जायचे? How to go to see Pachmarhi?
1. मध्यप्रदेश ची राजधानी भोपाळ येथून पचमढ़ी 190 किलोमीटर अंतरावर आहे
2. होशंगाबाद या मध्य प्रदेशच्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून पचमढ़ी 119 किलोमीटर अंतरावर आहे.
3. भोपाळला विमान किंवा रेल्वेने प्रवास केल्यानंतर तेथून बसने जाता येते.
4. पिपरिया हे पचमढीच्या जवळचे रेल्वेस्थानक आहे पिपरिया ते ते पचमढी अंतर केवळ 49 किलोमीटर आहे. येथून बसने पचमढीला जाता येते.
पचमढ़ी कशासाठी प्रसिद्ध आहे ? What is Pachmarhi famous for?
पचमढी हे थंड हवेच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध आहे. मध्य- प्रदेशातील भूपगड हे सर्वोच्च शिखर पचमढ़ी परिसरातच आहे. याशिवाय पचमढीच्या परिसरात महादेव गुफा, पावसा धबधबा, जटाशंकर, अप्सरा विहार इत्यादी अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत त्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊया-
1 धूपगढ़ : Dhupgadh: Pachmarhi
सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर म्हणून धूपगढ़ या गिरिस्थानाकडे पाहिले जाते. महादेव डोंगरावरील सर्वांत उंच असलेले धूपगढ़ (Dhupgadh) हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 1352 मीटर उंचीवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई (1626 मीटर) पेक्षा धूपगडची उंची कमी आहे. पचमढीपासून केवळ 5 किलोमीटर अंतरावर असलेले धूपगड शिखर सर करण्यासाठी आणखी काही अंतर वाहनाने जाऊन मग चालत जाऊन सर्वोच्च शिखर सर करता येते. धुपगढ़ावर गेल्यानंतर सर्वोच्च शिखर सर करण्याचा आनंद आहे, तो आनंद आपल्याला मिळतो. येथून सातपुड्याच्या डोंगररांगांचे अप्रतिम दृश्य कॅमेरात टिपता येते.
2. जटाशंकर गुफा : Jatashankar Cave, Pachmarhi
पचमढी या ठिकाणापासून केवळ 1.5 किलोमीटर अंतरावर जटाशंकर गुहा (Jata Shankar cave) आहे. येथे या गुहेत अशी एक शिला आहे की ती कोणत्याही आधाराशिवाय झुलत असते. कदाचित गुहेत निर्माण होणाऱ्या हवेच्या दाबाचा हा परिणाम असेल . या शिलच्या बाबतीत कोणत्याही चमत्काराशी संबंध न जोडता वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण पहिले पाहिजे. येथे नैसर्गिक स्वरुपात शिवलिंग पाहायला मिळते.
3.पावस धबधबा :Pavas falls Pachmarhi
पचमढीतील हा छोटासा पण सौंदर्य संपन्न धबधबा आहे. या धबधब्यालाच अप्सरा विहार [Apsara Vihar] असेही म्हणतात. या धबधब्याची रचना इतकी सुंदर आहे की येथे वरून पडणाऱ्या पावस (पाऊस) सदृश पाण्यात अंघोळ करण्याची मजा काही वेगळीच येते.
4) पांडव गुफा / पाच गुहा / बौद्ध गुहा /:- Pandav cave Five caves/ Buddha caves
या पाच गुहांच्या बाबतीत अनेक तर्क-वितर्क केले जातात.येथे पाच गुहा आहेत . म्हणून या गुहांना पांडव गुहा असे म्हणतात. वनवास काळात पाच पांडव द्रौपदीसह या गुहांमध्ये राहिले होते असे मानले जाते. एक हजार वर्षांपूर्वी बौद्ध भिख्खूंनी या ठिकाणी गुहा खोदल्या असल्याचेही म्हटले जाते. भारतातील बहुतांश गुहा (caves) बौद्धांनी आणि जैनांनी निर्माण केल्या आहे. बौद्ध विचार रुजवणे आणि जतन करून ठेवणे हा बौद्ध अनुयायांचा मुख्य उद्देश होता.
5) प्रियदर्शिनी पॉईंट: Priyadarshani Point Pachmarhi
सातपुडा पर्वतातील सर्वात उंच पॉईंट प्रियदर्शिनी पॉईट म्हणून ओळखला जातो .येथून सातपुडा पर्वत रांगा, सूर्यास्त इत्यादी नजारे पाहण्याचा आनंद लुटता येतो. येथे खूप सुंदर वातावरण आहे. हा पॉईंट पचमढीला गेल्यानंतर पाहूनच यावा.
हे सुद्धा आवर्जून वाचा