भारतात अनेक ठिकाणी तारांगण केंद्रे आहेत. बिर्ला समुहाने भारतात जशी सुंदर मंदिरे बांधली आहेत. त्याच प्रमाणे विज्ञान सेंटर्स, प्लॅनेटेरिअम्स सुद्धा निर्माण केले आहेत. या माध्यमातून विज्ञान विषयक संशोधनाला आणि खगोल विषयक जिज्ञासेला चालना मिळाली आहेत. बिर्ला समुहाने भारतात अनेक ठिकाणी तारांगण उभारलेली आहेत. ही तारांगणे बिर्ला तारांगणे [Birla Planetariums] या नावाने ओळखली जातात. हैद्राबाद येथील बी .एम. बिर्ला तारांगणा विषयी (BM Birla Planetarium] आपण माहिती घेणार आहोत.
बिर्ला तारांगण,संक्षिप्त माहिती.Birla Planetarium, Brief Information
ठिकाणाचे नाव : बीएम बिर्ला विज्ञान केंद्र
ठिकाण : बीएम बिर्ला प्लॅनेटेरियम
शहर : हैद्राबाद
जिल्हा : हैद्राबाद
राज्य : तेलंगणा
स्थापना : 8 सप्टेंबर 1985
उद्घाटन हस्ते : एन.टी. रामाराव
बी एम बिर्ला प्लॅनेटेरिअम: B.M. Birla Planetarium, Hyderabad
बी. एम बिर्ला या नावाने बिर्ला समुहाने विज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक तारांगण स्थापन केली आहेत. 8 सप्टेंबर 1985 साली हैद्राबाद शहरात बी एम बिर्ला प्लॅनेटेरिअम B.M. Birla Planetarium सुरु केले. बी. एम बिर्ला विज्ञान केंद्रातच तारांगण हा एक भाग आहे. आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री एन टी रामाराव यांच्या हस्ते या तारामंडळाचे उद्घाटन झाले. लहान मुलांपासून ते विज्ञान, खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी हे एक प्रेरणादायी ठिकाण आहे. एका घुमटाकार इमारतीत आपल्याला अगदी जवळून ब्रह्मांडातील घटना पाहायला मिळतात. ऑप्टो मेकॅनिकल प्रोजेक्शन प्रणालीद्वारे आपल्याला ब्रह्मांडातील घडामोडी या तारांगणात पाहायला मिळतात.येथील बैठक व्यवस्था अशी केली आहे की आपल्याला मान वर करून आकाश पाहावे लागत नाही. विश्वातील अनेक रहस्यमय कथा या तारांगणाच्या माध्यमातून उलगडून दाखवण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे. आपण जणू अंतराळात प्रवेश करून अगदी जवळून सर्व काही पाहात आहोत असे वाटते.
sky Show:
बिर्ला समुहाच्या माध्यमातून उभारलेल्या या तारामंडलाला 2024 अखेर 1कोटीहून अधिक प्रेक्षकांनी भेट देऊन तारामंडळाचा आनंद लुटला आहे. बिर्ला समुहाने sky show दाखवण्यासाठी जवळ जवळ 34 हून अधिक शो तयार केले आहेत, खगोलशास्त्रीय तथ्ये, घटना, तारकांचे स्थान यावर आधारित या फिल्म्स आहेत. अवकाशातील धूमकेतू तारकापुंज, दीर्घिका, कृष्णविवर , राशी ,नक्षत्रे, ताऱ्यांचा स्फोट, आकाशगंगा तेजोमेघ क्लस्टर्स, विश्वाची उत्क्रांती, मंगळ अभियान शो, चांद्रयान, चांद्रमोहीम शो, अशा विविध प्रकारच्या 34 फिल्म्स पाहताना डोळ्यांचे पारणे तर फिटतातच. ह्याच बरोबर आपल्याला ज्ञान नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा होतो.
बिर्ला प्लॅनेटेरिअम शो पाहण्यासाठी सकाळी 11:30, सायंकाळी 4:00 वाजता आणि 6:00 वाजता जायला चालते. हे शो इंग्रजी माध्यमातून दाखवले जातात. सायंकाळी 7:30 वाजता हिंदी माध्यमातून शो पाहता येतो, तर तेलुगू माध्यमातून दुपारी 12:15, दुपारी 3:00 सायंकाळी 5:00, सायंकाळी 6. 45 वाजता शो दाखवला जातो.
sky Show सर्वाना निश्चितच आवडेल लहान मुलांसोबत स्काय शो चा आनंद सर्वांनी घ्यायला हरकत नाही.