साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
रूडॉल्फ युकेन
Rudolf Euken
जन्म : 5 जानेवारी 1846
मृत्यू : 14 सप्टेंबर 1926
राष्ट्रीयत्व : जर्मन
पुरस्कार वर्ष: 1908
रूडॉल्फ युकेन हे जर्मनीचे सुप्रसिद्ध तत्त्वज्ञानी होते. ते तत्त्वज्ञानाचे अध्यापक सुद्धा होते. जीवनात नवीन तात्त्विक विचार आणले पाहिजेत, असे त्यांना वाटत होते. त्यांच्याकडे अलौकिक बुद्धिमत्ता होती. ते आदर्शयुक्त तत्त्वज्ञानाचे समर्थक होते. तत्त्वज्ञानावर आधारित त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी आपल्या जीवनात ‘सत्यम्, शिवम् सुंदरम्’ हे तत्त्व स्वीकारले होते.