साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
रुडयार्ड किपलिंग
Rudyard Kipling
जन्म: 30 डिसेंबर 1865
मृत्यू : 18 जानेवारी 1936
राष्ट्रीयत्व : ब्रिटिश
पुरस्कार वर्ष: 1907
रूडयार्ड किप्लिंग यांचा जन्म भारतात झाला होता. त्यांच्या लेखनातून ब्रिटिश साम्राज्यवादाची झलक जाणवते. त्यांच्या साहित्याचा आधार भारतीय जन्मभूमी राहिली. त्यांनी अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या, कविता लिहिल्या. लहान मुलांसाठी लिहिलेले ‘द जंगल बुक’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. पहिल्यांदाच ब्रिटिश नागरिकाला साहित्याचा नोबेल पुरस्कार रूडयार्ड यांच्या रूपाने मिळाला होता.