Maharashtra Assembly Election 2024 – बारामती मतदारसंघात कोण मारणार बाजी काका की पुतण्या, शरद पवारांचा करिश्मा चालणार का?

बारामती विधानसभा मतदारसंघ – Baramati Assembly Constituency:

महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत.त्यांतील पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघ 1962 साली स्थापन झाला आहे. या मतदार संघावर शरद पवार घराण्याचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. निव्वळ वर्चस्व नाही, तर निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. बारामती विधानसभा मतदार संघ स्थापन झाल्यावर या मतदार संघातून प्रथमच मालतीताई शिरोळे या महिला आमदार झाल्या. त्यानंतर 1967, 1972, 1978, 1980, 1985, 1990 अशा सलग सहा पंचवार्षिक विधानसभा निवड‌णुकीत शरद पवार आमदार झाले. त्यांनी या मतदार संघातील सर्व निवड‌णुका एकतर्फी जिंकल्या.

1991 साली शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणात गेल्याने त्यांनी हा बारामती विधानसभा मतदारसंघ आपला पुतण्या अजित पवार यांच्याकडे सोपवला. 1991 साली अजित पवार यांनी पहिली निवडणूक बारामती विधानसभा मतदार संघातून लढवली. त्यावेळ पासून आजतागायत अजित पवार यांनी आपल्या काकाच्या आशीर्वादाने ,पण आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवून बारामती मतदारसंघावर एकतर्फी वरचष्मा निर्माण केला. 1991, 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग सात वेळा बारामती मतदार संघातून अजित पवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले.

2019 च्या निवडणुकीत तर अजित पवार यांनी आपला प्रतिस्पर्धक गोपीचंद पडळकर यांचा 1,65, 265 मतांनी पराभव केला. अजित पवार यांना या 2019 च्या निवड‌णूकीत 1,95,641 मते मिळाली, तर गोपीचंद पडळकर यांना 30,376 मते मिळाली. अजित पवार यांना एकूण मतांच्या 86% मतदान झाले; तर गोपिचंद पडळकर यांना केवळ 12% मनदान मिळाले. महाराष्ट्रात अशा पद्धतीने एकतर्फी झालेली बारामतीची ही एकमेव निवडणूक होय.

2019 च्या निवड‌णुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी आघाडी करुन सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले; पण काही क्षणांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेले भाजपा राष्ट्रवादी फुटीर असे सरकार दीड दिवसातच कोसळले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस डूख धरून होते. त्यांनी ‘रात्रीस खेळ चाले’ सुरु केले आणि अडीच वर्षातच आघाडीचे सरकार पाडले. एकनाथ शिंदे 40 आमदारांसह गुवाहाटीला गेले. (गेले की नेले हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे.) या घडामोडीने नवीन सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली, तर वरिष्ठांच्या दडपणामुळे देवेंद्र फडणवीस यांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागली. ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले.भाजपाने पुढे सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उकरून काढून अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक आमदारांच्या पाठीमागे ED, CBI चा ससेमिरा लावला. त्यामुळे अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार सरकारमध्ये सामील झाले.

एप्रिल 2024 ची लोकसभा निवडणूक: Loksabha Election of April 2024

शिंदे गटाचा गुवाहाटी प्रवास, अजित पवार गटाचा सरकारमधील सहभाग महाराष्ट्रातील जनतेला आवडला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी हे दोन मुख्य पक्ष फोडण्यासाठी ED, CBI चा वापर केला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. April, 2024 च्या निवडणुकीत पुरोगामी विचाराचा विजय झाला. महा विकास आघाडीचे 48 पैकी 31 खासदार निवडून आलेत, तर 45+ चा डंका वाजवणाऱ्या युतीला केवळ 17 खासदारांवर समाधान मानावे लागले. सरकारमध्ये जे काही चालले आहे, ते पुरोगामी महाराष्ट्राला रुचले नाही.

2024 ची बारामती विधानसभा निवडणूक: Baramati Assembly Election-2024

एप्रिल 2024 मध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या एकाच कुटुंबातील नणंद-भावजय यांच्यात लढत झाली.सामना अटीतटीचा होईल असे वाटत असताना सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर एकतर्फी विजय मिळवला. अजित पवार यांनी स्वतः सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्याचा आटापिटा केला होता, पण खुद्द बारामती विधानसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांना 48,000 मतांचे मताधिक्य मिळाले. त्यावेळी विधान‌सभेला दादा, लोकसभेला ताई असे वातावरण होते; पण आता युगेंद्र पवार या तरुण पुतण्याने काकाविरूद्ध दंड थोपटले आहेत. अजित पवार यांनी पक्ष काढून घेतल्याचा रोष त्यांच्यावर आहे. लोकसभेला जे वातावरण होते, तेच वातावरण विधान सभेला राहिले तर अजित पवार यांना निवडणूक जिंकायला निश्चितच घाम फुटणार. जाणकार लोकांना काय वाटते? त्यांनी आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवावी.

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक – America [US] President Election-2024

Leave a comment