Why does soil smell after the first rain ?/ पहिल्या पावसानंतर मातीचा सुगंध का येतो ?

पहिला पाऊस म्हणजे काय? What is the first rain?

पहिला पाऊस म्हणजे उन्हाळ्यात जमीन चांगली खरपूस तापल्यानंतर मृगाच्या वेळी किंवा मृगाच्या पूर्वी रोहिणी नक्षत्रात पाऊस लागतो. त्याला पहिला पाऊस असे म्हणतात.

कधी कधी उन्हाळात अचानक वळवाचा पाऊस पडतो.त्यापूर्वी बरेच दिवस जमीन चांगली खरपूस तापली असेल आणि अचानक वळवाचा पाऊस पडला तर, अशावेळी आपण मृद्‌गंध अनुभवला असेल. पहिल्या पावसाच्या वेळी आणि अशा अचानक येणाऱ्या वळवाच्या पावसाच्या वेळी येणारा मृद्‌गंध सर्वांनीच अनुभवला आहे; पण हा मृद्‌गंध का येतो? तेच आपल्याला जाणून घ्यायचे आहे.

आकाश निळे का दिसते?/ Why does the sky look blue?

मृद्‌गंध म्हणजे काय ?What is meaning of soil-smell?

First Rain

मृद् + गंध = मृद्‌गंध. मृद् म्हणजे माती आणि गंध म्हणजे वास मृद्‌गंध म्हणजेच मातीचा येणारा वास किंवा मातीतून येणारा वास होय.

पाऊस पडल्यावर मृद्‌गंध का येतो? Why does soil smell after the first rain?

पहिल्या पावसानंतर मातीतून गंध यायला सुरुवात येते. अर्थात पाऊस पडायला सुरुवात होताच मातीतून गंध यायला सुरुवात होते. हा गंध येतो याचे कारण म्हणजे जमिनीत असलेला एक प्रकारचा बॅक्टेरिया होय. या बॅक्टेरियाचे नाव आहे स्ट्रेप्टोमायसिस [Streptomyces]. हे स्ट्रेप्टोमायसिस प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे उन्हाळ्यात बीजाणू (spores) तयार करण्याचे काम करतात. हे बीजाणू मातीत पडून राहतात आणि रुजण्यासाठी योग्य परिस्थितीची
वाट पाहतात, पाऊस सुरु झाला की त्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण होते . मग हे बॅक्टेरिया [ Bacteria] इतरत्र पसरण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते जिवोस्मिन [Jiosmin ] नावाचे रसायन बाहेर टाकतात. या जिवोस्मिनला [Jiosmin ] सुगंध असतो . पाऊस पडला की हे जिवोस्मिन पाण्यात एकजीव होतात आणि त्यातून सुगंध यायला सुरुवात होते . यालाच आपण मृद्‌गंध असे म्हणतो. मृद्‌गंध का येतो ? आणि तो केव्हा येतो? या प्रश्नाचे उत्तर निश्चितच तुम्हाला आवडले असेल.

Leave a comment