जगातील सर्वोच्च शिखर Mount Everest कुणाला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणार नाही असे म्हटले जाते. भारताच्या उत्तरेला असलेला भारतातील सर्वांत मोठा पर्वत म्हणजे हिमालय होय. या हिमालयातच माऊंट एव्हरेस्ट [ Mount Everest] हे शिखर आहे. जगातील अनेक गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी येतात, पण त्यांतील काहीच शिखरावर पोहोचतात. हे शिखर सर्वात प्रथम कोणी सर केले ? या सर्वोच्च शिखराला माऊंट एव्हरेस्ट हे नाव कसे पडले? काय आहे या माऊंट एव्हरेटचा इतिहास? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे या लेखातून आपण पाहणार आहोत.
माऊंट एव्हरेस्टची संक्षिप्त माहिती: Brief Information Of Mount Everest.
ठिकाणाचे नाव : माऊंट एव्हरेस्ट
ठिकाण कोठे ? : हिमालय पर्वत
समुद्र सपाटीपासून उंची : 8848.86 मीटर
कोणत्या देशाच्या हद्दीत: नेपाळ, चीन
चढाईचा मार्ग : नेपाळ, तिबेट
काठमांडूपासून अंतर : सुमारे 250 किमी
माऊंट एव्हरेस्टला कोणी जावे ? Who should go to Mount Everest ?
माऊंट एव्हरेस्टला कोणी पण जाऊ शकत नाही.माऊंट एव्हरेस्टला फक्त गिर्यारोहक [Mountaineer] जाऊ शकतात. तेही अनुभवी गिर्यारोहक जाऊ शकतात. ज्यांनी लहान लहान शिखरे सर केली आहेत, ज्यांना कळसुबाई, माऊंट बाबू आणि हिमालयातील इतर लहान-मोठी शिखरे सर करण्याचा अनुभव आहे, त्यांनी निश्चितपणे माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करावा. सुरेंद्र चव्हाण या महाराष्ट्रातील गिर्यारोहकाने Mount Everest सर केला आणि त्याने ‘On the Top of the World’ या पुस्तकात सविस्तर अनुभव कथन केला आहे. सुरेंद्र चव्हाण यानेही Reference, Books वाचूनच प्रवासाची योजना आखली होती. ज्यांना Mount Everest सर करायचा आहे. त्यांनी निश्चितच सुरेंद्र चव्हाण यांच्या सारख्या अनेक गिर्यारोहकांनी लिहिलेले अनुभव निश्चित वाचावेत.
कसे जायचे माऊंट एव्हरेस्ट पाहायला ? How to go to see Mount Everest?
माऊंट एव्हरेस्ट शिखरावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
1) पहिला मार्ग: First Way: From the Nepal side:
बहुतांश पर्यटक म्हणजे गिर्यारोहक नेपाळमार्गे माउंट एव्हरेस्टला जाणे पसंत करतात. या मार्गाने जाताना नेपाळ मधील काठमांडूतून विमान, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने लुक्ला [Lukla ] या पर्वतीय गावापर्यंत जाता येते. काही हेलिकॉप्टर्स बेस कॅम्प वन [ Base camp one] पर्यंत जातात. तेथून पुढचा प्रवास बर्फाच्छादित पर्वत शिखरातून करावा लागतो. Base camp हा 5500 मीटर उंचीच्या दरम्यान असतो. येथून पुढे सर्वसाधारणपणे 10 ते 15 दिवस ट्रेकिंग [Trekking] करावे लागते. हवामान अनुकूल असेल तर 10 दिवसांत ट्रेकिंग [Trekking] पूर्ण होते.
2) दुसरा मार्ग: Second way: From the Tibetan chinese side.
माऊंट एव्हरेस्ट [Mount Everest ] सर करण्यासाठी From the Tibetan-Chinese side हा मार्ग विशेषत: कोणी निवडत नाही . हा मार्ग खूप धोक्याचा आहे. धाडसी आणि होतकरू पर्यटकच तिबेटी-चीनी बाजूने जे जाण्याचे स्वप्न बाळगतात आणि ते पूर्ण करतात. या मार्गाने जाण्यासाठी सहा ते सात कॅंप करावे लागतात. बेस कॅम्प 5600 meters वर असतो. Second camp 6000 meters वर असतो. Third Camp 6400 Meters वर असतो. Fourth Camp 7000 meters वर असतो, तर Fifth camp 7600 Meters च्या दरम्यान असतो. सहावा म्हणजे sixth camp 8300 Meters च्या दरम्यान असतो. हा कॅम्प Mount Everest सर करण्यापूर्वीचा शेवटचा कॅम्प आहे. यानंतर एकाच कॅम्पमध्ये शिखरावर जावे लागतेः
माऊंट एव्हरेस्टवर जाताना कोणते साहित्य जवळ असावे? What Materials to take While going to Mount Everest?
माऊंट एव्हरेस्टवर जाताना सर्वांत महत्त्वाची गोष्ट न्यावी लागते, ती म्हणजे तंबू होय. तंबू चांगल्या दर्जेदार कंपनीचा हलका-फुलका आणि मजबूत पाहिजे. थंडीपासून संरक्षण करणारा पाहिजे. सूर्यप्रकाशाचे बर्फातून मोठ्या प्रमाणात परावर्तन (reflection) होत असते. अशा वेळी सूर्य किरणे डोळ्यांत गेल्यास अंधत्व येऊ शकते. म्हणून डोळ्यांच्या संरक्षणासाठी काळा गॉगल आवश्यक आहे. अंगात मजबूत स्वेटर हवे. संपूर्ण चेहरा झाकेल असे लोकरीचे मफलर हवे. शूज हवेत, सॉक्स हवेत. पाणी, ऊर्जा निर्माण करणारे पेय हवेत. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ऑक्सिजन सिलिंडर oxygen cylinder हवे.
बेस कॅम्प ते शिखर प्रवास: Journey from Base Camp to on the Top of the World.
माऊंट एव्हरेस्टचे शिखर सर करण्यासाठी बेस कॅम्प ते शिखरावर जाण्यासाठी केवळ 3000 मीटर अंतर जावे लागते. पण हेच अंतर कापण्यासाठी 12 ते 15 दिवस लागतात. यावरून गिर्यारोहण करणे किती अवघड आहे याची कल्पना आली असेल.
माऊंट एव्हरेस्ट चा प्रवास करताना हाडे गोठवणारी थंडी सहन करावी लागते. 0 अंश पेक्षा किती तरी उन्हे (-) तापमान सहन करावे लागते. हवा विरळ असल्यामुळे बरोबर ऑक्सिजनचे सिलिंडर घ्यावे लागते. प्रचंड थंडी असल्याने सर्दी येऊन आजारी पडण्याची शक्यता असते. कितीही अडचण आली तरी इच्छाशक्ती जिवंत ठेवावी लागते. प्रत्येक कॅम्पचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. बर्फांचे डोंगर अचानक कोसळत असतात, त्याची माहिती असावी लागते. प्रत्येक कॅम्पच्या टप्प्यावर खाली-वर फेऱ्या माराव्या लागतात. बर्फावर पडलेल्या तीव्र प्रकाशापासून बचाव करावा लागतो. अचानक वर्फाचे वादळ सुरु होते. त्याला सामना करावा लागतो. बर्फाळ डोंगरावरून चढण्याचे कौशल्य प्राप्त करावे लागते.अशा अनेक समस्यांना गिर्यारोहकांना तोंड द्यावे लागते. या सर्व समस्यांवर जो मात करतो. त्याचे नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कायमचे कोरले जाते.
महाराष्ट्रातील सुरेंद्र चव्हाण या गिर्यारोहकाने 18 मे 1998 मध्ये रोजी प्रथमच माऊट एव्हरेस्ट शिखर सर केले.हा महाराष्ट्रातील पहिला माऊंट एव्हरेस्ट सर करणारा गिर्यारोहक होय.
जगातील सर्वात उंच शिखराला माउंट एव्हरेस्ट असे नाव का ठेवले? Why is the world’s highest peak named Mount Everest?
भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यावेळी कर्नल जॉर्ज एव्हरेस्ट हे भारताचे सर्वेअर होते. त्यांच्या सर्वे क्षेत्रातील उत्तम योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारने जगातील सर्वांत उंच शिखराला सर एव्हरेस्ट यांचे नाव दिले. 1865 पासून हे शिखर माउंट एव्हरेस्ट या नावाने ओळखले जाते.
माउंट एव्हरेस्ट शिखर प्रथम कोणी सर केले ? Who climbed the peak Mount Everest the first?
माउंट एव्हरेस्ट या शिखरावर सर्वांत प्रथम नेपाळचा शेर्पा तेनसिंग नोर्गे आणि न्यूझिलंडचा गिर्यारोहक एडमंड हिलरी यांनी पावले ठेवलेत. एडमंड हिलरी याने शेर्पा तेनसिंगला वाटाड्या म्हणून नेले होते. शेर्पा तेनसिंग आपल्या बरोबर ऑक्सिजनचे सिलिंडर न घेता एव्हरेस्टच्या टॉप वर गेला होता. शेर्पा तेनसिंग मुळेच एडमंड हिलरी शिखराच्या टॉपवर जाऊ शकला. त्यामुळे माऊंट एव्हरेस्टवर सर्वांत प्रथम जाण्याचा मान शेर्पा तेनसिंगला जातो. आणि त्यानंतर हेडमंट हिलरीला जातो.1953 साली शेर्पा तेनसिंग आणि एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले.
एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला भारतीय पुरुष कोण? Who is the first Indian man to climb Mount Everest?
अवतार सिंग चीमा
एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? Who is the first Indian woman to climb Mount Everest ?
बचेंद्री पाल.
माउंट एव्हरेस्ट शिखराची मूळ नावे: Native names of Mount Everest
माउंट एव्हरेस्टला तिबेटी लोक चोमो बुंगमा [Qqomolangma] म्हणतात. ज्याचा उच्चार क्कोमो लुंगमा आहे. क्कोमोलुंगमा ही जगाची देवी आहे. जी सर्वोच्च स्थानावर आहे. माउंट एव्हरेस्टला नेपाळी लोक सगरमाथा किंवा सागर माथा म्हणतात. सगर म्हणजे नेपाळी भाषेत आकाश. नेपाळी लोक म्हणतात की ती आकाशाची देवी आहे.
हे सुद्धा आवर्जून वाचा