Assembly Election-2024 कोल्हापूर दक्षिण विधानस‌भा मतदार संघ. खटक्यावर बोट – जाग्यावर पलटी, कोण मारणार दक्षिणचे मैदान ? ऋतुराज पाटील अमल महाडिक?

कोल्हापूर जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक हाय व्होल्टेज ड्रामा [High Voltage Drama] असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातों तो म्हणजे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ [Kolhapur South Constituency ] होय. कोल्हापूर जिल्ह्याचे आणि कोल्हापूर काँग्रेस पक्षाचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. सध्या या मतदार संघाचे विद्यमान आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील (काँग्रेस) हे नेतृत्व करत आहेत, तर त्यांच्या विरुद्ध त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धक महाडिक कुटुंबातील अमल महाडिक भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. असे असले तरी खरी लढत सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक या पारंपरिक स्पर्धकांमध्येच आहे.

कोल्हापूर दक्षिण Assembly Election- 2009

सतेज पाटील 2004 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवून 42000 मतांनी निवडून आले होते. 2008 साली मतदार संघाची पुनर्रचना झाल्यावर कोल्हापूर दक्षिण व कोल्हापूर उत्तर असे नवीन मतदारसंघ निर्माण झाले. 2009 साली कोल्हापूर दक्षिण मधून ते निवडणूक लढण्यासाठी उतरले. यांच्या विरुद्ध धनंजय महाडिक अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आणि कोल्हापूर, दक्षिणमध्ये High Voltage Drama सुरु झाला. प्रचंड संघर्षातून सतेज पाटील 5800 मताधिक्याने निवडून आले. या निवड‌णुकीत उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे—–

1) सतेज पाटील – काँग्रेस – 86,949 मते

2) धनंजय महाडिक – अपक्ष 81,182 मते

3 ) सूर्यकांत पाटील- भाजपा 10,008 मते

4) दिग्विजय खानविलकर अपक्ष 7,868 मते

Assembly Election-.2014

पुन्हा पाटील विरुद्ध महाडिक?

2009 च्या निवडणूकीत सतेज पाटील यांना विजय प्राप्त झाल्यानंतर त्यांनी राज्य मंत्रिपद मिळाले.मंत्रिपदामुळे त्यांची शक्ती वाढली; पण त्यांच्या हातून काही चुका घडल्या. कोल्हापुरात टोलला प्रचंड विरोध असताना सतेज पाटील यांनी स्वतः टोल नाक्यावर जाऊन आपल्या वाहनाचा टोल भरला. या घटनेमुळे जनतेत त्यांच्याबद्दल नाराजी पसरली. राज्यमंत्री असताना त्यांनी गुटखा बंदी केली. हे चांगले काम केले; पण गुटखा उत्पाद‌कांनी कंबर कसून त्यांच्या विरुद्ध मतदान केले. त्याचा परिणाम असा झाला की सतेज पाटलांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्शी अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचा 8,528 मतांनी पराभव केला. 2014 च्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे –

1) अमल महाडिक – भाजपा – 1,05, 489 मते

2) सतेज पाटील काँग्रेस – 96,961 मते

3) विजय देवणे शिवसेना – 9,048 मने

Assembly Election-2024- कोल्हापूर उत्तर मतदारसंघ. महाडिक-लाटकर नाराज ? कोण जिंकणार ही लढाई.

Assembly Election- 2019

पुन्हा पाटील विरुद्‌ध महाडिक..?

2015 साली सतेज पाटील महादेवराव महाडिक यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव करून पुन्हा आमदार झाले. यापूर्वी 3 वेळा महादेवराव महाडिक विधान परिषदे‌चे आमदार होते. त्यांचा सतेज पाटील यांनी पराभव करुन 2014 च्या पराभवाचे उट्टे काढले.

2019 साली सतेज पाटील यांनी आपला पुतण्या ऋतुराज पाटील यांना अमल महाडिक यांच्याविरुद्‌ध उभे केले. वयाच्या 29 व्या वर्षी आमदारकीच्या मैदानात उतरलेल्या ऋतुराज पाटील यांचा अमल महाडिक सहज पराभव करतील. असे सुरुवातीला चित्र होते, पण सतेज पाटील यांनी ही लढाई आपली समजून निवड‌णुकीत उडी घेतली.या संघर्षमय लढाईत अमल महाडिक यांचा 42,709 मतांनी दारु‌ण पराभव झाला. 2019 च्या निवडणुकीत उभेदवारांना पड‌लेली मते पुढीलप्रमाणे-

1) ऋतुराज पाटील काँग्रेस- 1,40,103 मते

2) अमल महाडिक भाजपा- 97, 394 मते

2019 च्या निवड‌णुकीत ऋतुराज पाटील यांचा द‌णद‌णीत विजय झाला.

कोल्हापूर दक्षिण-Assembly Election 2024:

पुन्हा पाटील विरुद्ध महाडिक!

2024 च्या विधानसभेत पुन्हा महाडिक-पाटील यांच्यातच काट्याची लढाई होत असून महाविकास आघाडीतर्फे कोल्हापूर दक्षिण काँग्रेसच्या वाट्याला आल्याने ऋतुराज पाटील पुन्हा रिंगणात उतरले आहेत; तर महायुतीच्या वतीने भाजपाचे उमेदवार अमल महाडिक आहेत. कोल्हापूर दक्षिण मध्ये पाटील- महाडिक यांच्यात तीन वेळा सामना झाला, त्यांत पाटील यांनी 2-1 ने आघाडी घेतली आहे. यावेळी अमल महाडिक सामना बरोबरीत सोडतात की ऋतुराज पाटील 3-1 ने आघाडी घेतात? याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे. एप्रिल 2024 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मधून शाहू छत्रपती यांना खूप मोठे असे मताधिक्य मिळालेले नाही. त्यामुळे ऋतुराज पाटील यांना ही निवडणूक चांगलीच जड जाणार असे चित्र दिसत असले तरी अमल महाडिक यांच्यासाठी ही विधानसभा निवडणूक एवढी सोपी राहिलेली नाही. घोडा मैदान जवळ आले आहे. तुम्हाला काय वाटते ? आपले मत Comment Box मध्यये जरूर कळवावे.

हे सुद्धा आवर्जून वाचा

  1. Assembly Election-2024- कोल्हापूर उत्तर मतदारसंघ. महाडिक-लाटकर नाराज ? कोण जिंकणार ही लढाई.
  2. Assembly Election 2024 – कागल मतदारसंघात वातावरण टाईट. हसन मुश्रीफांवर समरजीत घाटगे भारी पडणार का?
  3. Assembly Election-2024: राधानगरी विधानसभा मतदारसंघात लढत तिरंगी की दुरंगी ? कोण मारणार बाजी ? आबिटकर, केपी की ए. वाय ?

Leave a comment