Assembly Election-2024: राधानगरी विधानसभा मतदारसंघात लढत तिरंगी की दुरंगी ? कोण मारणार बाजी ? आबिटकर, केपी की ए. वाय ?

20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक होत आहे. महाविकास आघाडी, महायुती यांच्यातच खरी लढत होणार, असे चित्र दिसत असले तरी तिसरी आघाडी आपले अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडत असल्याचेही जाणवत आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघात राधानगरी तालुक्यातील पाच, भुदरगड तालुक्यातील चार आणि आजरा तालुक्यातील एक असे दहा जिल्हा परिषद मतदार संघ आहेत. राधानगरी विधानसभा मतदारसंघ [Radhanagari Assembly Constituency] हा डोंगराळ मतदारसंघ असून विकसित मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख अजून तरी निर्माण झालेली नाही. सध्या या निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र दिसत असले तरी हे चित्र कायम ठेवण्यासाठी ए. वाय. पाटील यांना कंबर कसावी लागेल.

सध्या महायुतीमार्फत शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर आपले भविष्य तिसऱ्यांदा अजमावत आहे. प्रकाश आबिटकर हे ठाकरे गटातून फुटून गुवाहाटीला गेलेल्या 40 आमदारांपैकी एक असले तरी हा मु‌द्दा आता मागे पडत चालला आहे. प्रकाश आबिटकर गेली दहा वर्षे राधानगरी मतदारसंघात संपर्कात राहिले आहेत. त्यांनी मंदिरे, ग्रामपंचायत इमारती, समाज मंदिरे, रस्ते बांधणी इत्यादी माध्यमांतून तालुक्यात म्हणजे मतदारसंघात विकास कामे केली आहेत.संपर्क आणि विकास कामे या दोन मु‌द्द्यांवरच प्रकाश आबिटकर निवडणूक लढवत आहेत.लाडकी बहीण योजनेला न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने काही अंशी ही योजना क्षीण झाली आहे.प्रकाश आबिटकर यांना या मतदार संघातील भाजपा आाणि राधानगरीतील वि‌ठ्ठलराव खोराटे गटाची साथ आहे. याशिवाय इतर छोट्यामोठ्या गटांचा पाठिंबा आहे.

संपर्काच्या आणि विकास कामाच्या जोरावर आपलाच विजय निश्वित आहे, असे आबिटकर गटात बोलले जात आहे. महा विकास आघाडीमार्फत माजी आमदार के पी पाटील यांना तिकीट मिळाले आहे. नुकतीच झालेली बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक के. पी. पाटील यांनी एक हाती जिंकली. ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे; पण गेल्या दहा वर्षात त्यांचा मतदार संघातील संपर्क तुटल्याने त्यांना काही अडचणी येत आहेत.

के पी. पाटील यांना सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचा भक्कम पाठिंबा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदपवारगट), जनता दल (शंकर धोंडी पाटील गट), पुरोगामी विचाराची चळवळ,शेतकरी कामगार पक्ष, आणि इतर छोट्या मोठ्या गटांचा पाठिंबा आहे. लढणारच आणि जिंकणारच ! हे वाक्य मी खरे करणारच. असे के पी. पाटील म्हणतात.

राधानगरी मतदारसंघात (Radhanagari Constituency) अपक्ष उमेद‌वार म्हणून ए. वाय. पाटील उभे आहेत. ते प्रथमच आमदारकीची निवडणूक लढवत आहेत. असे असले तरी राधानगरी मतदारसंघात गावागावत त्यांची ओळख आहे. के.डी.सी.सी बँकेचे संचालक म्हणून ते गेली 25 वर्षे काम पाहात आहेत. सेवा संस्थांच्या माध्यमातून त्यांचे गावागावात गट आहेत. 2009 पासून ते आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत; पण के.पी. पाटील यांच्यामुळे दर वेळी थांबावे लागले असा त्यांचा दावा आहे.

गेली 30 वर्षे राधानगरीचा आमदार नाही. याच मु‌द्द्यावर आणि अन्यायाच्या भावनेवर ए. वाय. पाटील निवडणूक लढवत आहेत. राधानगरी तालुक्याने मला चांगली साथ दिली तर मी ही निवडणूक जिंकू शकतो. असा ए. वाय. पाटील यांचा विश्वास आहे. इतर दोन उमेद‌वारांकडून ए-वाय पाटील यांनी माघार घेऊन आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. यावरून ए. वाय. पाटील यांचे महत्त्व लक्षात येते.

Radhanagari Assembly Constituency: राधानगरी विधानसभा मतदारसंघ – परंपरा :

Radhanagari Assembly Election-1972.

1) कृष्णराव मोरे- ‘अपक्ष–25195 मते.

2) बाळासाहेब पाटील (कौलव) काँग्रेस – 16891 मते.

3) काका देसाई-[CPI]– 13739 मते.

4) गोविंदराव कलिकते – शेकाप—9773 मते.

1972 च्या निवडणुकीत किसनराव मोरे 8300 मताधिक्याने विजयी झाले.

Radhanagari Assembly Election-1978:

1) दिनकरराव जाधव- काँग्रेस — 29397 मते

2) शंकर धोंडी पाटील – जनता दल – 27435 मने

3). हरिभाऊ कडव काँग्रेस (U) 19643 मते

4. साताप्पा भांदिगरे – CPI – 11446 मते.

1978 च्या विधानसभा निवडणुकीत दिनकरराव जाधव 1962 मताधिक्य घेऊन निवडून आले.

Assembly Election 2024 – कागल मतदारसंघात वातावरण टाईट. हसन मुश्रीफांवर समरजीत घाटगे भारी पडणार का?

राधानगरी – Assembly Election-1980

1) हरिभाऊ कडव-काँग्रेस – 36820 मते.

2) हिंदुराव बळवंत पाटील-काँग्रेस (U) – 25162 मते

3 ) शंकर धोंडी पाटील – जनता दल – 23339 मते.

या निवडणुकीत हरिभाऊ कडव यांचा सुमारे 11600 मतांनी विजय झाला.

Radhanagari Assembly Election-1985

1) बजरंग देखाई-काँग्रेस- 37002 मते

2) के पी. पाटील अपक्ष- 33026 मतेः

3) सरोजिनी कडव – काँग्रेस (U)-17706 मते

4) गोविंद पानसरे – CPI -4023 मते.

1985 च्या विधानसभा निवडणुकीत राधानगरी मतदार संघातून काँग्रेसचे बजरंग देसाई सुमारे 4000 मतांनी निवडून आले.

Radhanagori Assembly Election-1990

1. शंकर धोंडी पाटील- जनता दल – 58803 मते.

2. दिनकरराव जाधव -काँग्रेस– 51090 मेते.
1990 च्या राधानगरीतील निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग सरवडे येथे आले होते. त्याचा परिणाम म्हणून शंकर धोंडी पाटील 7700 मताधिक्याने निवडून आले.

राधानगरी – Radhanagari Assembly Election-1995

1) नामदेवराव भोईटे – अपक्ष – 43173 मते.

2) बजरंग देसाई-अपक्ष– 40158 मते

3) शंकर धोंडी पाटील–जनता दल– 31056 मते.

4) उद‌यसिंह पाटील-काँग्रेस– 14258 मते
5.राजू सावंत-शिवसेना–5240 मते.

1995 च्या निवड‌णुकीत बिद्री कारखान्यातून सूत्रे हालली आणि नामदेवराव भोईटे अपक्ष म्हणून 3000 च्या मताधिक्याने निवडून आले.

Radhanagar Assembly Election-1999.

1) बजरंग देसाई – काँग्रेस – 59938 मते

2) के. पी. पाटील – NCP – 52283 मते

3) प्रवीण सावंत- शिवसेना – 11187 मते.

5. विठ्ठलराव खोराटे – जनतादल -6350 मते.

1999 च्या राधानगरी विधानसभा निवडणुकीत बजरंग देसाई सुमारे 3000 च्या मताधिक्याने निवडून आले.

Radhanagari Assembly Election-2004

1) के. पी. पाटील NCP – 95235 मते

2) बजरंग देसाई काँग्रेस – 39895 मते.

3) सुधाकर साळोखे – शिवसेना – 9136 मते

2004 च्या राधानगरी विधानसभा निवडणुकीत के पी. पाटील सुमारे 56000 च्या मताधिक्याने निवडून आलेत.

Radhanagari Assembly Election-2009

1) के. पी. पाटील-NCP- 86843 मते

2) बजरंग देसाई अपक्ष-45121 मते

3. प्रकाश आबिटकर अपक्ष-36359 मते

4.जालंधर पाटील-शेतकरी संघटना- 24802 मते.

5.विजयसिंह मोरे अपक्ष- 15597 मते.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत के. पी. पाटील 41700 मत्ताधिक्याने निवडून आले.

राधानगरी – Radhanagari Assembly Election-2014

1) प्रकाश आबिटकर – शिवसेना – 1,32,488 मते

2) के. पी. पाटील – NCP- 93,077 मते.

3) जालंदर पाटील – शेतकरी संघटना – 5922 मते.

2014 च्या राधानगरी विधानसभा मतदार संघातून प्रकाश आबिटकर सुमारे 40,000 मताधिक्याने निवडून आले.

Radhanagari Assembly Election-2019

1. प्रकाश आबिटकर – शिवसेना- 1,05, 881 मते

2) के. पी. पाटील – NCP- 87451 मते.

3) अरुण डोंगळे-अपक्ष -15414 मते.

4) राहूल देसाई – अपक्ष -13895 मते

2019 च्या निवडणुकीत प्रकाश आबिटकर, सुमारे 18000 मताधिक्याने निवडून आले.

2024 च्या निवडणुकीत कोण मारणार राधानगरीचे मैदान? आबिटकर हॅटट्रिक करणार? की के पी पाटील जिंकणार? या दोघांनाही चितपट करण्यास ए वाय पाटील यशस्वी होतील का?

तुम्हास काय वाटते? आपले मत Comment Box मध्ये जरूर कळवा.

हे सुद्धा आवर्जून वाचा

  1. Assembly Election-2024- कोल्हापूर उत्तर मतदारसंघ. महाडिक-लाटकर नाराज ? कोण जिंकणार ही लढाई.
  2. Assembly Election 2024 – कागल मतदारसंघात वातावरण टाईट. हसन मुश्रीफांवर समरजीत घाटगे भारी पडणार का?

Leave a comment