साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
कार्ल जेलरप
Karl Gjellerup
जन्म : 2 जून 1857
मृत्यू : 11 ऑक्टोबर 1919
राष्ट्रीयत्व : डॅनिश
पुरस्कार वर्ष: 1917
कार्ल जेलेरप हे डेन्मार्कचे सुप्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार होते. त्यांनी कला आणि संगीत या विषयांवरही पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी डेन्मार्कमधील धनिक लोकांवर आपल्या लेखणीतून विडंबनात्मक हल्ला केला. ‘द पिलग्रिम कामनिता’ हे गौतम बुद्धांवर लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांच्याबरोबर 1917 साली डेन्मार्कचे दुसरे लेखक हेन्निक पोंटोपिडान यांनाही साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला.