साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
हेन्रिक पोंटोपिडान (Henrik Pontoppidan)
जन्म : 24 July 1857
मृत्यू: 21 August 1943
राष्ट्रीयत्व : डॅनिश
पुरस्कार वर्ष: 1917
हेन्रिक पोंटोपिडान हे डेन्मार्कमधील सुप्रसिद्ध लेखक होते. त्यांचे लेखन वास्तववादी होते. ते कादंबरीकार आणि कथाकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या लेखनशैलीतून डेन्मार्कमधील जीवनपद्धती व्यक्त होते. त्यांचे लेखन म्हणजे डेनिश लोकांचे वास्तव चित्रण होय. ‘क्लिप्डविंग्ज’, ‘द प्रॉमिस्ड् लँड’, ‘लकी पीटर’, ‘ईगल्स फ्लाइट’ इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या समग्र लेखनाबद्दल १९१७ चा नोबेल पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला.