Amazon rainforest : Spider Monkey

दक्षिण अमेरिकेतील Amazon Rainforest मध्ये आढळणाऱ्या अनेक 430 सस्तन प्रकारच्या प्राण्यांपैकी Spider Monkey हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे. माकडाच्या विविध प्रजातीपैकी स्पायडर मंकी ही एक अत्यंत दुर्मिळ अशी प्रजाती असून पृथ्वीतलावर या माकडांची संख्या खूप कमी आहे. ही स्पायडर माकडे अमेझॉनच्या जंगलात आढळत असली तरी मेक्सिको आणि बोलिव्हिया या देशांतील जंगलात यांचे अधिक प्रमाणात वास्तव्य आहे. मेक्सिको आणि बोलिव्हिया हे ॲमेझॉनच्या जंगलाचेच भाग आहेत.

या माकडाला spider monkey हे नाव पड‌ण्याचे कारण म्हणजे याची लांबलचक शेपूट, काटेरी केस आणि अंगी असलेली चपळता होय. या स्पायडर माकडाची शेपूट सुमारे 80 ते 90 सेमी लांब असू शकते. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत जात असताना spider man जातो की काय असे वाटते. या माकडांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शेपटी खूप मजबूत असते. त्यांना अंगठा नसतो. हा एक सामाजिक प्राणी आहे.

  1. Amazon Rainforest Animals: ॲमेझॉनच्या जंगलातील प्राणी

Leave a comment